Kharip Msp 2023-24 केंद्र शासनाकडून खरीप हंगाम 2023-24 हमीभाव जाहीर

Kharip Msp 2023: केंद्र शासनाने आज दिनांक 7 जून 2023 रोजी खरीप हंगामासाठी म्हणजेच 2023 24 या खरीप हंगामासाठी सोयाबीन पिकांच्या किमान आधारभूत किमती जाहीर केले आहेत. यावर्षीच्या खरीप हंगाम 2023-24 या हंगामासाठी सोयाबीनचे आधारभूत किंमत प्रतिक्विंटल 4 हजार 600 रुपये अशी असेल. मागील हंगामामध्ये सोयाबीनचे आधारभूत किंमत 4300 होती.

कापसाची मध्यम धाग्याची आधारभूत किंमत 6 हजार 620 रुपये अशी असणार आहे. कापसाची मागील हंगामा मधील आधारभूत किंमत 6800 रुपये एवढी होती. लांब धाग्याच्या कापसाचे आधारभूत किंमत 6300 वरून यावर्षी 7020 रुपये एवढी करण्यात आली आहे. कापसाची लंब धाग्याची मागील वर्षाच्या तुलनेमध्ये यावर्षी आधारभूत किंमत कमी झाली असल्याचे या ठिकाणी पहावयास मिळते.

Kharip Msp 2023-24

तुरीचे आधारभूत किंमत मागील वर्षी सहा हजार सहाशे रुपये एवढी होती तर यावर्षी तुरीची आधारभूत किंमत प्रति क्विंटल सात हजार रुपये एवढी असणार आहे. तसेच मूग व उडदाच्या आधारभूत किमतीमध्ये अनुक्रमे 858 आणि सहा हजार नऊशे पन्नास रुपये एवढी आधारभूत किंमत यावर्षी असणार आहे. मागील वर्षी मूग आणि उडीद ची आधारभूत किंमत अनुक्रमे सात हजार 755 आणि सहा हजार सहाशे रुपये एवढी होती.

देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आधारभूत किमतींना मान्यता देण्यात आलेली आहे. केंद्रीय कृषी व मूल्य व किंमत आयोगाने आधारभूत किमती बाबत शिफारशीचे पत्र केंद्र सरकारला या अगोदर दिले होते. शेतकऱ्यांना याचा फायदा व्हावा यासाठी यावर्षी पिकांच्या आधारभूत किमान किमतीमध्ये भरी वाढ देण्यात आलेली आहे असा दावा केंद्रीय अन्न व ग्राहक व्यवहार मंत्री पियुष गोयल यांनी केला. Kharip Msp 2023

Leave a Comment