Kisan Credit Card: असा करा किसान क्रेडिट कार्ड साठी ऑनलाईन अर्ज – Kisan Credit Card Apply

Kisan Credit Card केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी किसान क्रेडिट कार्ड योजना सुरू केली आहे. मित्रांनो आपण आजच्या या लेखामध्ये पाहणार आहोत की, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत किसान क्रेडिट कार्ड कसे बनवायचे आहे त्यासाठी खालील लेख पूर्ण वाचा.

भारतामध्ये पूर्णपणे 6.95 कोटी शेतकरी हे किसान क्रेडिट कार्ड वापरत आहेत. परंतु अनेक शेतकरी या किसान क्रेडीट कार्ड वापरत असताना सुद्धा ते शेतकरी कर्जापासून अजूनही वंचित आहेत.  त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डचा लाभ मिळावा या हेतूने सरकारने पंतप्रधान किसान सन्मान निधी ( PM Kisan Credit Card ) च्या लाभार्थी असलेल्या शेतकर्‍यांना केसीसी ( Kisan Credit Card) म्हणजेच किसान क्रेडिट कार्ड मध्ये सामावून घेण्याचा निर्णय घेतला आहे.

या निर्णयामुळे शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड लाभ मिळावा यासाठी भारत सरकारने पीएम किसान वेबसाईटवर किसान क्रेडिट कार्ड Kisan Credit Card Apply चा फॉर्म ऑनलाइन भरण्याची सेवा ही सुरू केलेली आहे.

Abha Health Card: 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारासाठी आपले व परिवाराचे असे काढा आभा हेल्थ कार्ड

Kisan Credit Card किसान क्रेडिट कार्ड म्हणजे काय?

  • केसीसी एक योजना आहे म्हणजेच किसान क्रेडिट कार्ड Kisan Credit Card या योजनेचा उद्देश आहे की शेतकऱ्यांना शेती संबंधित जे काही कामे असतात या कामासाठी आर्थिक मदत करणे.  किसान क्रेडिट कार्डच्या kisan credit card benefits मदतीने शेतकऱ्यांना खते, बियाणे,  कीटकनाशके इत्यादी कामासाठी कर्ज दिले जाते.
  •  किसान क्रेडिट कार्ड साठी सर्व शेतकरी अर्ज करू शकतात यामध्ये  स्वतःची जमीन असणे आवश्यक आहे. किंवा इतर शेतकऱ्यांची जमीन भाडे तत्त्वावर असणाऱ्या शेतकऱ्यांना  पण योजनेचा लाभ मिळतो.
  • शेळी पालन मेंढी पालन कुक्कुटपालन आणि मत्स्यपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना पण या योजनेचा लाभ घेता येतो.

कसे असेल किसान क्रेडिट कार्डचे व्याजदर

किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सुमारे ३ लाखापर्यंत कर्ज हे दिले जाते तसेच त्याचे व्याज दर हे ७ टक्‍क्‍यापर्यंत आहे.  परंतु शेतकऱ्यांनी किसान क्रेडिट कार्ड चे कर्ज हे एका वर्षाच्या भरले तर त्यांना व्याज फक्त 4 टक्के भरावे लागेल.  म्हणजेच शेतकऱ्यांना यामध्ये ही 3 टक्के व्याज दर मध्ये सवलत मिळते.

शेतकऱ्यांना मिळणार किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत विमा

किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना अपघाती मृत्यू झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास तर किसान क्रेडिट कार्ड विमा योजने अंतर्गत शेतकऱ्याला 50 हजार रुपयाचे विमा संरक्षण मिळेल. तसेच इतर धोक्यासाठी 25 हजार रुपयाची विमा संरक्षण शेतकऱ्याला दिले जाणार आहे. 

असा करा किसान क्रेडिट कार्ड साठी ऑनलाईन अर्ज: (Kisan Credit Card Online Apply)  

  • प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी असतील त्यांनी किसान क्रेडिट कार्ड  साठी अर्ज करण्यासाठी जवळच्या CSC म्हणजेच कॉमन सर्विस सेंटर ( Common Service Center )  किंवा आपले सरकार सेवा केंद्र वर जाऊन आपला अर्ज भरावा.
  • किसान क्रेडिट कार्ड साठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी सीएससी सेंटर किंवा आपले सरकार सेवा केंद्र यांच्याकडून 50 रुपये  एवढे शुल्क आकारले जाईल.
  • जर तुमच्याकडे सीएससी सेंटरचा आयडी क्रमांक असेल तर खालील लिंक वरून आपण किसान क्रेडिट कार्ड साठी अर्ज करू शकता.

अर्ज करण्यासाठी लिंक – https://eseva.csccloud.in/kcc/Default.aspx

Kisan Credit Card किसान क्रेडिट कार्ड ची लिंक ओपन झाल्यानंतर Apply New KCC या ऑप्शन वर क्लिक करून लाभार्थ्यांचा आधार क्रमांक टाकून याठिकाणी सबमिट करायचे आहे.  त्यानंतर बाकीची प्रोसेस पूर्ण करून, किसान क्रेडिट कार्ड चे ऑनलाइन फॉर्म ची प्रिंट काढून घ्या आणि ती प्रिंट घेऊन आपल्या जवळच्या बँक शाखेमध्ये किसान क्रेडिट कार्ड संदर्भात चौकशी करावी.

वरील लेख आपल्याला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा तसेच आपल्या सर्व मित्रांना शेअर करायला विसर नका.

Leave a Comment