Kusum Solar Pump Yojana: असा पहा तुमचा कुसुम सोलर पंप योजनेचा अर्ज पात्र आहे की अपात्र

Kusum Solar Pump Yojana मित्रांनो शेतकऱ्यांना दिवसाचा सिंचन शक्य व्हावं याच्यासाठी शासनाच्या माध्यमातून 90 ते 95 टक्के अनुदानावरती शेतकऱ्यांना सोलर पंप दिल्या जातात. देशांमध्ये व राज्यांमध्ये याच्यासाठी कुसुम सोलर पंप योजना राबवली जात आहे. मित्रांनो याच योजनेच्या अंतर्गत तुम्ही जर अर्ज केलेला असेल तर तुमचा अर्ज पात्र आहे की अपात्र आहे हा ऑनलाइन पद्धतीने कशाप्रकारे पाहायचं याच्याबद्दल ची माहिती आजच्या टॉपिकच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Kusum Solar Pump Yojana आपलिकेशन वरती लॉगिन करून तुम्हाला सेल्फ सर्व्ह दाखवते का हे सुद्धा पाहू शकता परंतु बऱ्याच साऱ्या अपात्र लाभार्थ्यांना देखील सेल्फ सर्वे दाखवत आहे. त्याच्यामुळे तुम्ही पात्र आहात की अपात्र आहात हे चेक करण्यासाठी तुम्ही कुसुम सोलर वेबसाईटच्या माध्यमातून सुद्धा चेक करू शकता.

याच्यासाठी तुम्हाला महाऊर्जेच्या Maharashtra Energy Development Agency (MEDA) वेबसाईट वरती लॉगिन करावे लागेल ज्याची लिंक पुढीलप्रमाणे https://kusum.mahaurja.com/beneficiary/

Kusum Solar Pump Yojana

Kusum Solar Pump Yojana याच वेबसाईट वरती आपण आपला युजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करू शकता आणि पाहू शकता. आपला mk पासून सुरू होणारा लॉगिन आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन केल्यानंतर आपला अर्ज जर पात्र असेल तर त्या ठिकाणी आपल्या अर्जाची स्थिती, जर आपण पेमेंट केलेला असेल तर पेमेंटची स्थिती, सेल्फ सर्विस साठी ऑप्शन आलेला असेल तर सेल्फ सर्वे अशा पद्धतीची माहिती दाखवलेली दिसेल. त्यानंतर त्याच्या खाली एक टीप दिलेली असेल आपण केलेला अर्जाची निवड झालेली आहे आणि आपण मेडा Maharashtra Energy Development Agency (MEDA) आपलिकेशन वरून सेल्फ सर्वे करा. तुम्ही जर सेल्फ सर्व केलेला असेल आणि पेमेंट सुद्धा केलेले असेल तर त्याची डिटेल सुद्धा लॉगिन केल्यानंतर यामध्ये आपल्याला दाखवली जाईल.

परंतु मित्रांनो यामध्ये जर एखादा अर्ज अपात्र झालेला असेल किंवा त्याची छाननी अजून महाऊर्जाकडून झालेली नसेल तर अशा लाभार्थ्यांना लॉगिन केल्यानंतर your application has been not shortlisted, login will be resumed soon म्हणजेच आपल्या अर्जाची अद्याप देखील निवड झालेली नाही आणि लवकरच आपले लॉगिन सुरू केले जाईल अशा पद्धतीचा मेसेज त्या ठिकाणी आपल्याला दर्शवला जाईल. अशा प्रकारचा जर आपल्याला मेसेज दाखवला तर याचाच अर्थ आपला अर्ज अजून पर्यंत पात्र झालेला नाही. Kusum Solar Pump Yojana

Kusum Solar Pump Yojana

परंतु जर आपल्या अर्जाची निवड झालेली असेल तर आपल्या अर्जाची स्थिती आपल्याला व्यवस्थित पद्धतीमध्ये दाखवली जाईल आणि निवड झालेले अर्ज हे यशस्वीरित्या लॉगिन ही होत आहेत आणि यामध्ये आपल्या अर्जाची निवड झालेली आहे हे पण खाली टीप मध्ये दाखवले जाईल आणि सेल्फ सर्वे करण्यासाठी सुचवले जाईल. Kusum Solar Pump Yojana

Kusum Solar Yojana – कुसुम सोलर पंप योजना जिल्हा निहाय पात्र लाभार्थी यादी

जर आपल्याला मेढा Maharashtra Energy Development Agency (MEDA) म्हणजेच महाऊर्जाच्या कुसुम सोलर Kusum Solar Pump Yojana पंपामध्ये काही अडचण वाटत असेल तर या वेबसाईटच्या माध्यमातून लॉगिन करून तुम्ही आपल्या अर्जाची स्थिती ही वरील पद्धती नुसार चेक करू शकता.

1 thought on “Kusum Solar Pump Yojana: असा पहा तुमचा कुसुम सोलर पंप योजनेचा अर्ज पात्र आहे की अपात्र”

Leave a Comment