Kusum Yojana: कुसुम सौर पंप योजनेतील खुल्या प्रवर्गातील लाभार्थ्यांना १५ कोटीचा निधी आला.

Kusum Solar Pump Yojana New Update


ओपन कॅटेगिरी साठी सौर कृषी पंप लवकरच मिळणार आहेत. या संदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. ( Kusum Solar Yojana New Update)

जाणून घेऊयात या संदर्भातील सविस्तर माहिती


ओपन कॅटेगिरी साठी सौर पंप लवकर वितरित केले जाणार आहे. कारण या सौर पंपासाठी लागणारा निधी संदर्भातील शासन निर्णय नुकताच काढण्यात आलेला आहे. जे खुल्या प्रवर्गातील शेतकरी आहेत त्यांना आता लवकरच सौर कृषी पंप मिळणार आहे. प्रधानमंत्री किसान ऊर्जा व  (mahaurja)महाभिमान म्हणजेच कुसुम योजना (kusum solar pump yojana) अंतर्गत सर्वसाधारण घटकांचा सौर कृषी पंपाच्या लाभार्थीच्या हिस्यापोटी अनुदान वितरित करण्यात आलेले आहे.


अनेक शेतकरी बांधवांनी त्यांच्या शेतामध्ये सौर कृषी पंप (meda) बसण्यासाठी अर्ज केलेले आहेत. परंतु निधी अभावी हे पंप शेतकरी बांधवांना वितरित करण्यात येत नव्हते. आता ओपन कॅटेगिरी साठी सौर कृषी पंप खरेदी करण्यासाठी शासनाच्या वतीने निधी मिळाला आहे. याच संदर्भात शासन निर्णय देखिल 16 नोव्हेंबर 2022 रोजी काढण्यात आलेला आहे.

कुसुम सौर पंप योजनेचा घटक ब अंतर्गत एकूण 1 लाख कृषी पंपाने मंजुरी देण्यात आलेली आहे. कुसुम सौर पंप योजनेचा टप्पा दोन अंतर्गत अनेक शेतकऱ्यांनी सोलर पंपासाठी ऑनलाईन अर्ज केलेले आहेत. अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या 46997 एवढी आहे. सौर कृषी पंप साठी लागणारे स्वहिस्सा देखील या लाभार्थ्यांनी भरलेला आहे. सर्वसाधारण प्रवर्गातील जे शेतकरी आहेत या गटासाठी राज्य शासनाच्या अर्थसंकल्पीय अनुदानातून दहा टक्के हिस्सा देण्यात येणार आहे. तसेच दहा टक्के लाभार्थी 30 टक्के केंद्रशासनाचे अर्थसहाय्य व उर्वरित जी 30% रक्कम लागणार आहे ती महावितरण खालील वाढीव वीज विक्रीतील करा मधून परस्पर जमा होणाऱ्या रकमेतून दिली जाणार आहे. मंजूर झालेले एक लाख सौर कृषी पंपासाठी दहा टक्के शासन निधी 15 कोटी 27 लाख 54 हजार महाऊर्जाला (Mahaurja) वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे.


या संदर्भातील हा शासन निर्णय पाहण्यासाठी या पोस्ट च्या शेवटी एक लिंक दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही हा शासन निर्णय संदर्भातील इतर माहिती जाणून घेऊ शकता.


शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी विजेची समस्या शेतकरी बांधवांना सतत सतवत असते. अशावेळी सौर कृषी पंप द्वारे शेती पिकास पाणी देणे सोयीचे होते यामुळे अनेक शेतकऱ्यांनी सौर कृषी पंपासाठी अर्ज केलेले आहेत. आणि काहीजण कोटा कधी उपलब्ध होतो यासाठी वाट बघून आहेत. तुम्हाला देखील सौर कृषी पंप हवा असेल तर लगेच ऑनलाईन अर्ज करून घ्या ऑनलाईन अर्ज कसा करावा या संदर्भातील लिंक देखील या पोस्ट च्या शेवटी दिलेली आहे त्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही ऑनलाईन अर्ज संदर्भातील महत्त्वाची माहिती जाणून घेऊ शकता धन्यवाद.

डाउनलोड शासन निर्णय


अर्ज कसा करावा व्हिडीओ👇👇


Leave a Comment