लंपी रोगामुळे जनावरे मृत झाले? नुकसान भरपाई साठी असा करा ऑनलाईन अर्ज |mhpashuaarogya

mhpashuaarogya: कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर नवीन आलेला संकट म्हणजे लंपी आजार. लंबी मुळे जनावरांचा अतोनात नुकसान झालं शेतकऱ्यांचं पशुधन खूप मोठ्या प्रमाणात दगावलं. त्या नंतर केंद्र शासनाने या आजारसाठी नुकसान भरपाई (Lampi Nuksan Bharpai) देण्यासाठी निश्चित करण्यात आली.

याच्यासाठी ऑगस्ट मध्ये पहिला शासन निर्णय काढण्यात आला सप्टेंबर मध्ये पहिला शासन निर्णय काढण्यात आला ज्याच्यामध्ये जनावरांसाठी तीस हजार रुपये, 25 हजार रुपये, 16 हजार रुपये अशी नुकसान भरपाई (Lampi Nuksan Bharpai)देखील जाहीर केली. परंतु नुकसान भरपाई देत असताना अल्पभूधारक, अत्यल्प भूधारक आट घालण्यात आली. एकाच जनावरासाठी नुकसान भरपाई देण्यासाठी निश्चित करण्यात आले. परंतु ऑक्टोबर 2022 रोजी एक महत्त्वपूर्ण असा दुसरा शासन निर्णय घेऊन याच्यामध्ये आल्पभूधारक हटवण्यात आले त्याच्या अंतर्गत ज्या शेतकऱ्यांचा जनावर मयत (lampi disease) पावले अशा शेतकऱ्यांना मग तो ग्रामीण भागातील असेल, नगरपालिका क्षेत्रातील असेल, महानगरपालिका क्षेत्रातील असेल सर्व क्षेत्रातील असलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या पशुपालकांच्या सर्व प्रकारच्या जनावरांसाठी हे नुकसान भरपाई देण्यासाठी निश्चित करण्यात आलं.

ही नुकसान भरपाई देत असताना प्रत्येक कुटुंबामध्ये एका जनावराची जी आट घालण्यात आलेली होती, ती देखील आट हटवण्यात आली. आणि एका घरातील जर तीन ते चार जनावर जरी दगावले तरी त्या जनावरांना सुद्धा नुकसान भरपाई देण्यासाठी निश्चित करण्यात आलं. (lampi Skin disease)

लम्पी मदतीसाठी जवळच्या डॉक्टर कडून पंचनामे करून घ्यावे अशा प्रकारच्या अटी घालण्यात आल्या होत्या. ऑफलाइन पद्धतीने अर्ज होते, ऑफलाइन पद्धतीने अर्ज सहज उपलब्ध होत नव्हते शेतकऱ्यांना त्याच्याबद्दलचा जास्त काही माहीत नव्हते. या सर्व बाबी लक्षात घेता, शेतकऱ्यांना सहजपणे अर्ज भरण्यासाठी उपलब्ध करून देण्यासाठी डिसेंबर मध्ये एमएच पशु आरोग्य डॉट कॉम (www.mhpashuaarogya.com) नावाचा वेबसाईट पोर्टल व एक मोबाईल ॲप्लिकेशन (Pashu sahayata app) बनवण्यात आले.

या माध्यमातून शेतकऱ्यांना तसेच पशुपालकांनी स्वतःची नोंदणी करून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची मुभा देण्यात आली.

आजच्या माहिती मध्ये आपण या पोर्टल वरती ऑनलाईन पद्धतीने अर्जदार नोंदणी कशी करायची अर्ज कसा करायचा या संदर्भातील माहिती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी एमएच पशु आरोग्य डॉट कॉम (www.mhpashiaarogya.com) नावाचा जायचे आहे किंवा Android App डाऊनलोड करून सुद्धा अर्ज करू शकता. (येथे क्लिक करा लिंक)


वेबसाईटवर आल्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकता 36 जिल्हे 357 तालुक्यांमध्ये ही योजना राबवली जात आहे.

  • गाई म्हशींसाठी 30 हजार रुपये
  • बैलासाठी 25 हजार रुपये
  • लहान वासरा साठी 16 हजार रुपये


वरीप्रमाने नुकसान भरपाई दिली जात आहे.

अर्ज करताना घ्यावयाची महत्वाच्या बाबी

सूचना

  • केंद्र शासनाच्या प्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम, २००९ अन्वये लम्पी चर्मरोग हा अनुसूचित रोग आहे.
  • महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, नगरपालिका, कटकमंडळे या कार्यक्षेत्रातील रहिवाश्यांना आणि ग्रामीण भागातील रहिवाश्यांना त्यांच्या जनावरांचा लम्पी मुळे मृत्यू झाला तर नुकसान भरपाई (Lampi Skin Disease Nuksan Bharpai) चा लाभ घेता येईल.
  • जनावराचा लम्पी आजारामुळे मृत्यू झाल्यानंतर नजीकच्या पशु वैद्यकीय दवाखान्यातून पंचनामा करून घेणे बंधनकारक आहे.
  • जनावराचा लम्पी आजारामुळे (Lampi Skin Disease) मुळे मृत्यू झाल्यानंतर लाभार्थीने तात्काळ नजीकच्या दवाखान्यात माहिती द्यावी अथवा ऑनलाईन भरपाई अर्ज सबमिट करणे बंधनकारक राहील.
  • ज्या व्यक्तीच्या नावे नुकसान भरपाई अर्ज कराल त्याच व्यक्तीचे बँक खात्याचे तपशील द्यावे अन्यथा नुकसान भरपाई मिळणार नाही.

शासन निर्णय


याच्या संदर्भातील जे जीआर आहे ते जीआर सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेले आहेत आणि याच्यातीलच 12 ऑक्टोबर 2022 रोजीच्या जीआर नुसार आता हे नुकसान भरपाई शेतकऱ्यांना दिले जात आहे.

शासन निर्णय डाउनलोड लिंक- येथे क्लिक करा

नुकसान भरपाई मिळण्यासाठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा ?

Leave a Comment