Land Record: डीजीटल ई-फेरफार उतारा काढा घरी बसल्या.

Land Record

शेतकरी म्हटलं की सातबारा (Land Record) आठ अ या बाबी आल्याच, कधी कधी जमिनीची संपूर्ण डिटेल्स बघण्यासाठी फेरफार वापरला जाऊ शकतो अशावेळी तुम्हाला जर फेरफार काढायचा असेल तर अशावेळी तुम्हाला तलाठी साहेबांकडे जावं लागतं. तलाठी साहेबांचे कार्यालय असतं ते एक तर तालुक्याचे ठिकाण असतं किंवा तुमचं जे गाव आहे त्या गावाजवळ एखाद्या मोठ्या गावांमध्ये असते. अशा वेळेस तुम्हाला जर तलाठी साहेबांकडे जायला नाही जमलं तर तुम्हाला फेरफार ( Digital Ferfar Utara) मिळू शकत नाही आणि तुमची नक्कीच या ठिकाणी कुचंबणा होऊ शकते. land record

मित्रांनो आजच्या टॉपिक मध्ये आपण जाणून घेणार आहोत की, हा जो फेरफार आहे तो मोबाईल वरती कसा बघायचा. मोबाईल वरच डाउनलोड कसा करायचा. हा जो फेरफार आहे याला ई फेरफार म्हणतात आणि हा ई फेरफार (Digital Ferfar) कसा काढला जातो या संदर्भातील माहिती आपण पाहुयात.

डिजिटल ई फेरफार (PROPERTY CARD)  काढण्यासाठी सगळ्यात अगोदर तुम्हाला गुगलमध्ये टाईप करायचा आहे डिजिटल सातबारा ( Digital Satbara) त्यावेळेस https://digitalsatbara.mahabhumi.gov.in ही लिंक दिसेल (Digital Satbara) डिजिटल सातबारा तर या लिंक वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे.

जसे तुम्ही या लिंक वरती क्लिक करा तर खालील प्रकारचा इंटरफेस तुमच्या मोाईलवर/कॉम्प्युटर स्क्रीन वरती दिसेल.

OWNLOAD FACILITY FOR DIGITALLY SIGNED 7/12, 8A AND PROPERTY CARD

या ठिकाणी दोन पर्याय तुम्हाला दिसतील रेगुलर लॉगिन (Regular Login)आणि ओटीपी बेस्ड लॉगिन (OTP Based Login) रेगुलर लॉगिन करण्यासाठी तुम्हाला लॉगिन आयडी आणि पासवर्ड हवाय आणि ओटीपी बेस्ट लॉगिन साठी ज्यावेळेस तुम्ही रजिस्टर कराल त्यावेळेस जो नंबर तुम्ही त्या ठिकाणी टाईप केला होता किंवा त्या ठिकाणी रजिस्टर केला होता तो नंबर टाकून त्या नंबर वर जो ओटीपी आलेला आहे तो ओटीपी टाकून या ठिकाणी तुम्ही लॉगिन करू शकता.

land record

तुम्ही जर अजूनही या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलं नसेल तुमच्याकडे युजर आयडी आणि पासवर्ड नसेल तर तुम्हाला या ठिकाणी न्यू युजर रजिस्ट्रेशन (New User Registration) या लिंक वर क्लिक करायचं आहे आणि तुमचे नोंदणी (Registration) करायचे आहे. जसं तुम्ही या लिंक वरती क्लिक कराल एक फॉर्म या ठिकाणी ओपन होईल. (New User Registration) 

New User Registration

न्यू युजर रजिस्ट्रेशन फॉर्म न्यू युजर रजिस्ट्रेशन करताना जी माहिती टाकायची आहे ती आहे. तुमचं फर्स्ट नाव, मिडल नेम, लास्ट नेम, जेंडर म्हणजेच तुम्हाला तुमचं लिंक सिलेक्ट करायचा आहे. नॅशनॅलिटी, मोबाईल नंबर, टाकायचा आहे, तुम्ही जे काम करतात ते टाकायचे, ईमेल आयडी असेल तर तो टाका जन्म तारीख (डेट ऑफ बर्थ) टाकायचे आहे. त्यानंतर जो एड्रेस आहे तो पत्ता या ठिकाणी टाकायचे तुमच्याकडे फ्लॅटमध्ये राहतात फ्लॅट नंबर, फ्लोर नंबर, बिल्डिंगचं नाव, पिन कोड, रस्त्याचा जे लोकेशन असेल ते लोकेशन या ठिकाणी टाकायचे. त्यानंतर तुम्हाला महाराष्ट्र निवडायचे आहे. land record ही सगळी माहिती निवडल्यानंतर लॉगिन इन्फॉर्मेशन मध्ये तुम्हाला जो लोगिन आयडी हवा आहे तो या ठिकाणी चेक अवेलेबिलिटी करायचा आहे. आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या पासवर्ड टाकून या ठिकाणी सेव करायचे आहे. 

हे सर्व सेव केल्यानंतर तुम्हाला एक युजर आयडी आणि पासवर्ड तुमच्या मोबाईल वरती मिळेल तो युजर आयडी आणि पासवर्ड टाकून या ठिकाणी लॉगिन करायचं आहे. काही दिवसानंतर तुम्हाला जर तुमचा पासवर्ड या ठिकाणी लक्षात राहिला नाही तर अशावेळी तुम्ही ओटीपी बेस्ट लॉगिन ( OTP Based Login) या पर्यायावर क्लिक करून तुमचा मोबाईल नंबर टाकून या ठिकाणी लॉगिन करू शकता.

 

लॉगिन केल्यानंतर खालील प्रकारचे पेज तुम्हाला दिसेल या ठिकाणी तुम्ही बघू शकता. या ठिकाणी तुम्हाला Digitally signed eFerfar या पर्यायावर क्लिक करायचे आहे. land record

Digitally signed eFerfar

त्यानंतर या तुमचा जिल्हा निवडा तालुका निवडा गाव निवडा आणि जो फेरफार नंबर आहे तो फेरफार नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. सातबाराच्या नावाच्या शेवटी हा फेरफार क्रमांक (Land Record) दिलेला असतो सुरुवातीला खाता नंबर असतो त्यानंतर खातेदाराचे नाव असतं आणि त्याच्यानंतर जे कंसात आकडा असतो तो फेरफार क्रमांक असतो. तर तो फेरफार क्रमांक या ठिकाणी भरायचा आहे. 

त्यानंतरच डाउनलोड या पर्यावर क्लिक करायचं आहे. 

आता हा डिजिटल ई फेरफार काढण्यासाठी आपल्याला १५ रु चार्ज लागणार असल्या मुळे आपल्याला Recharge Account या पर्यायावर क्लिक करून त्या मध्ये १५ रु किंवा त्या पेक्षा जास्त रक्कम जमा करायची आहे. land record तर रिचार्ज अकाउंट क्लिक करा अकाउंट रिचार्ज करण्यासाठी या ठिकाणी बरेच पर्याय दिलेले आहेत upi आहे नेट बँकिंग आहे अनेक प्रकारचे पर्याय या ठिकाणी दिलेले आहेत. यापैकी कोणताही पर्याय वापरून तुम्ही अकाउंट रिचार्ज करू शकता. अकाउंट रिचार्ज झाल्यानंतर तुमचा डिजिटल सातबारा (Digital Satbara, Land Record) असो डिजिटल ८ अ असो किंवा डिजिटल ई फेरफार (Digitally signed eFerfar) असो ही संपूर्णपणे कागदपत्र घरी बसल्या अगदी काही वेळातच काढू शकता.

राज्यात नवीन सातबारा, तुमच्या जमिनीला मिळाला नवीन ULPIN आधार नंबर लगेच चेक करा

मित्रांनो हे सर्व करण्यासाठी असं काही नाही की तुमच्याकडे विशेष लायसन्स पाहिजेत किंवा विशेष परवाना पाहिजेत. किंवा तुमच्याकडे CSC पाहिजे तुम्ही शेतकरी असाल तर तुम्ही वैयक्तिकरित्या सुद्धा हे डाऊनलोड करू शकता. तुम्हाला ही प्रोसेस माहिती असणे गरजेचे आहे. जी की मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेली आहे. land record

बघू शकता की अशा प्रकारचा हा जो ई फेरफार आहे तो डाउनलोड झालेला आहे 

Digitally signed eFerfar

संपूर्ण माहिती या ठिकाणी आलेली आहे. जमीन कोणी विकली, कोणी घेतली त्यानंतर तुम्हाला जर बँकेमध्ये कर्ज घ्यायचं असेल तर, हा ई फेरफार तुम्ही प्रिंट करून त्या दस्तऐवज सोबत लावू शकता. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण या टॉपिक मध्ये जाणून घेतलेला आहे की कशा पद्धतीने फेरफार डाऊनलोड केला जाऊ शकतो. 

हाच ई फेरफार कसा काढावा माहिती व्हिडियो स्वरूपात पहायची असेल तर खालील व्हिडिओ पाहू शकता.

1 thought on “Land Record: डीजीटल ई-फेरफार उतारा काढा घरी बसल्या.”

Leave a Comment