LPG Subsidy: गॅस सिलिंडरवर पुन्हा सुरू होणार सबसिडी, किती मिळणार सबसिडी वाचा सविस्तर माहिती

LPG Subsidy: केंद्र सरकारने प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलेंडर वर सबसिडी (LPG Subsidy Ujjwala Yojana) देण्याची घोषणा केली आहे. या केंद्र सरकारच्या निर्णयामुळे सर्वसामान्य लोकांना स्वस्त मध्ये आता गॅस सिलेंडर मिळणार आहे.

प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्या नवीन अधिसूचनेनंतर उज्वला योजनेमधील 9.59 कोटी लाभार्थ्यांना प्रतिवर्ष 14.2 किलो एलपीजी गॅस सिलेंडर वर दोनशे रुपये सबसिडी LPG Subsidy दिले जाणार आहे. यानंतर सरकारने वर्षभरामध्ये बारा सिलेंडर भरण्यासही परवानगी दिली आहे म्हणजेच आता आपल्याला एका वर्षामध्ये 12 स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरवर दोनशे रुपये प्रति सिलेंडर सबसिडी मंजूर करण्यात येईल.

LPG Subsidy

केंद्र शासनाच्या या निर्णयामुळे 2022-23 आर्थिक वर्षासाठी एकूण 6100 कोटी रुपये आणि 2023-24 आर्थिक वर्षासाठी 7680 कोटी रुपये खर्च केला जाणार आहे. हा खर्च केंद्र सरकारच्या तिजोरी मधून केला जाणार आहे. मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर हे अनुदान लवकरच मंजूर केले जाणार आहे.

LPG Price

आज आर्थिक वर्षाचा पहिला दिवस आणि या आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी आपल्याला एक आनंदाची बातमी आहे. गॅस सिलेंडरच्या किमती कमी झालेले आहे. पेट्रोलियम कंपन्या महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी केरोसीन तेल इत्यादींच्या किमती चा आढावा घेत असते आणि त्यामध्ये बदल करतात.

पेट्रोलियम कंपन्यांनी आज आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी व्यवसाय सिलेंडरच्या किमती कमी केल्या आहेत. 19 किलोच्या व्यवसायिक गॅस सिलेंडरची किंमत आता 92 रुपयांनी कमी करण्यात आली आहे तसेच दिल्ली मुंबई कोलकत्ता चेन्नई या शहरांमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दारात कपात करण्यात आली असून ती आता स्वस्त झाले आहेत.

व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या नवीन किमती


दिल्ली – 2028
कोलकत्ता – 2132
मुंबई – 1980
चेन्नई – 2192

Onion Subsidy: कांदा अनुदानासाठी या तारखेपर्यंत येथे करा अर्ज, जाणून घ्या सविस्तर माहिती

व्यवसाय सिलेंडरच्या जुन्या किमती


दिल्ली – 2119
कोलकत्ता – 2221
मुंबई – 2071
चेन्नई – 2268

घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही आणि त्याच्या किमती पुढील प्रमाणे स्थिर आहेत दिल्लीमध्ये घरगुती गॅस सिलेंडरची किंमत अकराशे तीन रुपये प्रति सिलेंडर आहे 14.2 किलोचा घरगुती गॅस सिलेंडर गेल्या महिन्यामध्ये पन्नास रुपयांनी तर 19 किलोचा व्यवसाय गॅस सिलेंडर 350 रुपयांनी मागला होता.

Tag,

lpg subsidy status, lpg subsidy check by mobile number, indane gas subsidy check, lpg subsidy not received,hp gas subsidy check, indane gas subsidy amount, lpg subsidy online, bharat gas subsidy,

Leave a Comment