Lumpy Disease : लम्पी रोग पसरवणाऱ्या किटकांचे नियंत्रण कसे कराल?

Lumpy Skin Disease


राज्यात सध्या बऱ्याच जिल्ह्यांमध्ये लम्पी स्किन रोगाचा (Lumpy Skin Disease) प्रादुर्भाव झालाय. संसर्गजन्य असल्यामुळे रोगाचा प्रसार हा अनेक मार्गाने होतो त्या पैकीच चावा घेणारा कीटकवर्गीय माशा प्रमुख आहेत यामध्ये स्ट्यामनस स्टोबोसीस, हिमोटोबिया स्टुलिकोयडस, डास व काही प्रजातींचे गोचीडे यांचा समावेश होतो. 


या कीटकांच्या नियंत्रणासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने पुढील उपायांची शिफारस केली आहे.

काय शिफरशी आहेत तेच आपण पाहू


हे पण वाचा : राज्यात नवीन सातबारा, तुमच्या जमिनीला मिळाला नवीन ULPIN आधार नंबर लगेच चेक करा.

सर्वसाधारणपणे जनावराला प्रखर उन्हात चारण्यासाठी सोडू नये. जनावरांना सकाळी दहा ते पाच पर्यंत गोठ्यातच ठेवावं. शेणाचा उक्रीडा किंवा खंडात शेन टाकल्यानंतर प्लास्टिक पेपरने किंवा ताडपत्रीने झाकावा. गोठ्यात स्वच्छता ठेवावी, जनावरांच्या शरीरावर कमीत कमी एक आठवणीच्या अंतराने 5 टक्के निम अर्क किंवा वनस्पतीजन्य 10 मिली निम तेल + 10 मिली निलगिरी तेल +10 दहा मिली करंज तेल + 2 ग्रॅम अंगाचा साबण एक लिटर पाण्यात मिसळून हे द्रावण फवारावे.


गोठ्याची स्वच्छता करून गोचड्याची अंडी गोळा करून शेकोटीमध्ये जाळावीत. गोठ्यातील पृष्ठभागावरील आणि भिंतीवरील भेगा हेमगन जाळावे जेणेकरून भागांमध्ये कीटकांनी घडलेली अंडी जाळली जातील. आजार सदृश्य लक्षण आढळल्यास जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क साधावा. रोग नियंत्रणासाठी पशुवैद्यकाच्या सल्ल्याने जनावरांचे लसीकरण करून घ्यावं.


या माहिती सोबत इथेच थांबूया अशाच माहिती साठी अपडेट लवकर मिळवण्यासाठी आम्हाला गूगल न्यूज (Google News) ला स्टार ⭐ बटणावर क्लिक करून फॉलो करा. 🙏😊

👇👇👇👇👇

https://news.google.com/publications/CAAqBwgKMLC6tAswvdXLAw?ceid=IN:en&oc=3

Leave a Comment