Magel Tyala Vihir Yojana: मागेल त्याला विहीर योजना अर्ज सुरू, विहिरीसाठी आता 4 लाख रुपय अनुदान. असा करा अर्ज.

Magel Tyala Vihir Yojana सिंचन विहीर अनुदान योजना, आता मागेल त्याला विहीर अनुदान योजना (Magel Tyala Vihir Yojana) सुरु झालेली आहे. चार लाख रुपये अनुदान, अंतराची आट रद्द, तसेच आता प्रत्येकाला अर्ज करता येणार. अशाच प्रकारच्या नव्या बदलासह आता ही विहीर अनुदान योजना राबवली जाणार आहे. याच्या संदर्भातील नवीन शासन निर्णय तसेच नवीन मार्गदर्शक सूचना राज्य शासनाच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आल्या आहेत.( शासन निर्णय शेवटी पहा.)

आपण आज या टॉपिक मध्ये अर्ज कसा करावा? अंतराच्या अट रद्द झाली बाबत, तसेच अर्जाचा नमुना याचबरोबर याच्यामध्ये दिलं जाणार अनुदान, लाभार्थ्याची निवड, त्याच्यासाठी असणाऱ्या पात्रता, लागणारी जमीन या सर्व संबंधातील सविस्तर अशी माहिती या माध्यमातून घेणार आहोत. मित्रांनो सर्वांना एक विनंती माहिती अतिशय महत्वाची सर्वांच्या कामाची आहे. Magel Tyala Vihir Yojana आपल्याला जर संपूर्ण माहिती समजून घ्यायची असेल तर सर्व माहिती व्यवस्थीत वाचा, बरेचसे मुद्दे जे तुम्हाला समजने व तुम्हाला माहीत होणे अतिशय आवश्यक आहे.

तर मनरेगाच्या( MRGS) माध्यमातून मी समृद्ध तर गाव समृद्ध, गाव समृद्ध तर तालुका समृद्ध, तालुका समृद्ध तर जिल्हा समृद्ध, जिल्हा समृद्ध तर राज्य समृद्ध अर्थातच राज्य समृद्ध करण्यासाठी शेतकरी समृद्ध होणे अतिशय गरजेचे आहे. विहिरींच्या (Magel Tyala Vihir Yojana) योजनेमध्ये सुद्धा बदल करण्यात आले आहेत. 2020 मध्ये 2021 मध्ये विहिरीचे योजनेमध्ये बदल करण्यात आले होते. त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर 2020 च्या परिपत्रकानुसार गावाच्या लोकसंख्येनुसार विहिरीची संख्या निर्धारित करण्यात आलेली होती आणि ज्या गावाची लोकसंख्या जास्त असेल त्या गावाला विहिरी जास्त ज्या गावाची लोकसंख्या कमी असेल त्या गावाला विहिरी कमी अशा प्रकारचे निकष त्याच्यामध्ये बदलण्यात आलेला होते.

परंतु अंतराची अट असेल किंवा 60:40 रेशो असेल, सर्व आणि अनेक इतर कारणांमुळे या विहिरीचे योजना प्रभावीपणे राबवल्या जात नव्हत्या. बऱ्याच साऱ्या अडचणी याच्यामध्ये होत्या विहिरीचे ( Magel Tyala Vihir Yojana ) लक्षांक पूर्ण होत नव्हते. आजच्या स्थितीमध्ये राज्यामध्ये तीन लाख 85 हजार पेक्षा जास्त विहिरी खोदल्या जाऊ शकतात. अशा डाटा शासनाच्या निदर्शनास आला आहे. आणि या सर्वांच्या पाठीमागे महत्वपूर्ण अशा मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेले आहेत कशाप्रकारे योजनेची अंमलबजावणी आता केली जाणार आहे. magel tyala vihir yojana online apply

Magel Tyala Vihir Yojana

या संदर्भातील नियोजन विभागाचा 4 नोव्हेंबर 2022 रोजी झाला जी आर आपण पाहू शकता. 

सिंचन विहिरीचे काम गतीने पूर्ण करण्यासाठी एसओपी अर्थात मानक ऑपरेटिंग प्रक्रिया निर्गमित करण्याबाबत.

त्याच्यामध्ये आपण प्रस्तावनामध्ये पाहू शकता राज्यांमध्ये तीन लाख 87 हजार 500 विहिरी पूर्ण सध्या स्थितीला शक्य आहे. आणि याच्यामुळे दारिद्र्य रेषेखालील कुटुंब असतील किंवा इतर कुटुंब असतील या सर्वांना या ठिकाणी लखपती करण्याच्या हेतून समृद्ध करण्याचे हेतून ही सिंचन विहीर योजना (Sinchan Vihir Yojana) राबवण अतिशय गरजेचे आहे. आणि याच पार्श्वभूमीवर ते 17 डिसेंबर 2012 आणि 28 ऑगस्ट 2020 चे दोन्ही जीआर निर्गमित करून हा जिआर काढण्यात आलेला आहे. Magel Tyala Vihir Yojana

जीआर मध्ये आपण पाहू शकता मनरेगाच्या अंतर्गत सिंचन विहिरीचे काम करताना कार्यालयास येत असलेल्या अडचणी दूर करण्याचे हेतून नवीन मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात येत आहे. Magel Tyala Vihir Yojana

१) लाभार्थ्याचे निवड.

लाभार्थ्याचे निवडीसाठी आपण जर पाहिलं तर सिंचन विहिरीचे काम घेत असताना अनुसूचित जातीचे लाभार्थी हे प्राधान्याने पहिले राहतील. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती, निराली सूचित जमाती विमुक्त जाती, दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी, स्त्री करता प्राधान्य असलेले कुटुंब ज्या कुटुंबामध्ये स्त्रीप्रधान असेल असे स्थिर कुटुंब, शारीरिक रित्या विकलांग कुटुंब, असे कुटुंबाच्या कुटुंबामध्ये दिव्यांग बांधव असलेले कुटुंब, जमीन सुधारणांचे लाभार्थी, इंद्रा आवास योजनेखालील लाभार्थी याचबरोबर अडीच एकर पर्यंत एक हेक्टर पर्यंत शेती असलेले सर्व प्रकारचे शेतकरी आणि अल्पभूधारक शेतकरी त्याच्या मध्ये दोन हेक्टर पर्यंतचे जमीनदार असणार असलेले अशा प्रकारचे सर्व शेतकरी यांच्यामध्ये लाभार्थी म्हणून पात्र असणार आहेत मग ते एस. टी. ओपन, ओबीसी ज्या प्रवर्गाच्या असतील त्या सर्व प्रवर्गाचे लाभार्थी याच्यामध्ये या अटीनुसार पात्र असणार आहेत.

२) लाभार्थी पात्रता.

  • अर्ज केलेल्या शेतकऱ्याकडे कमीत कमी 0.40 आर (एक एकर) जमीन असणे गरजेचे आहे.
  • भूजल नियम जो आहे या नियमानुसार पिण्याच्या पाण्याची जी विहीर असेल पेयजल सर्वोच्च असलेल्या गावाचा त्या विहिरीपासून 500 मीटरचा परिसरामध्ये विहीर खोदता येणार नाही.

 (ही महत्वाची अट लक्षात घ्या ज्या ठिकाणी आपल्या पिण्याचे पाण्याची विहीर आहे अशा विहिरीपासून 500 मीटरच्या अंतरापर्यंत विहीर खोदता येणार नाही.) 

  • दोन सिंचन विहिरी मधील 150 मीटरचे आट ही पुढील लाभार्थ्यांना रद्द करण्यात आलेली आहे. (याच्यामध्ये आपण पाहू शकता दोन सिंचन विहिरीमधील किमान 150 मीटर अंतराचे अट हि अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, दरिद्री रेषे खालील कुटुंब यांच्या करता लागू करण्यात येणार नाही.)
  • मनरेगाच्या अंतर्गत सिंचन विहीर मंजूर करताना खाजगी विहिरीपासून दीडशे मीटर अंतराचे अट आता लागू राहणार नाही.
  • लाभधारकाच्या ७/१२ वरती या आधीच विहिरीची नोंद असू नये.
  • लाभधारकाकडे एकूण क्षेत्राचा दाखला असावा. (म्हणजेच आठ अ उतारा असावा.)
  • एका पेक्षा अधिक लाभधारक संयुक्त विहीर घेऊ शकतील परंतु त्याची एकूण सलग जमिनीचा क्षेत्र हे एक एकर पेक्षा जास्त असाव.
  • तसेच ज्या लाभार्थ्यांला विहिरीचा लाभ देण्यात येणार आहे, तो लाभार्थी जॉब कार्ड धारक असला पाहिजे.

Magel Tyala Vihir Yojana 2023 विहिरी साठी अर्ज कसा करावा.

 इच्छुक लाभार्थ्याने अर्ज करायचे अर्ज चे दोन नमुने आहेत ते दोन्ही नमुने तुम्हाला खाली  लिंक देण्यात आलेली आहे. त्या लिंक वरून डाऊनलोड करून घ्यावेत.

विहीर अर्ज नमुने डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

वरील लिंक मध्ये अर्ज नमुने तुम्ही पाहू शकता हे दोन्ही नमुने तुम्हाला भरायचे आहे. त्याच्यामध्ये पहिला नमुना आहे प्रपत्र अ सिंचन विहीर मंजूर करण्यासाठी चा अर्ज. तसेच दुसरा जो अर्ज आहे प्रपत्र ब संमती पत्र याच्यामध्ये आपले स्वतःचे माहिती किंवा ज्या काही आपण सहमती देणार आहेत, या सर्व सहमती देऊन त्याठिकाणी लाभार्थ्याला शेतकऱ्याला अर्ज वर सही किंवा अंगठा करायचा आहे. हे दोन्ही अर्ज तुम्हाला भरायचेत आणि हा अर्ज भरल्यानंतर ग्रामपंचायतच्या अर्ज पेटीत टाकायच आहे.

ऑनलाइन व्यवस्था तयार झाल्यानंतर लाभार्थ्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. तरी सध्या आता ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया सुरू नाही.

अर्जा सोबत जोडायची कागदपत्र

१) ७१२ चा ऑनलाईन दाखला

२) ८ अ चा ऑनलाईन दाखला

३) जॉब कार्ड ची झेरॉक्स

वरील तीन कागद पत्र व दोन अर्ज अशी ५ कागदपत्र आपल्या अर्ज करण्यासाठी लागणार आहेत.

तसेच सामुदायिक विहीर असल्यावर सर्व लाभार्थी मिळुन ४० आर पेक्षा अधिक जमीन असल्याचा पंचनामा. सामुदायिक विहीर असल्यास वापरकर्ता ला पाणी वापर करण्यासाठी लाभार्थ्यांमध्ये एक करार पत्र करावे लागणारे ते करार पत्र सुद्धा द्यावा लागणार आहे. 

आता जे ऑफलाइन पद्धतीने अर्ज जाणार आहे, या ऑफलाइन पद्धतीचे अर्ज पेटी जी आहे ती दर सोमवारी उघडण्यात येईल. आणि याच्यामध्ये जे आलेले अर्ज असतील ते ग्रामपंचायतीच्या डाटा एन्ट्री ऑपरेटरने रोजगार सेवकाच्या मदतीने ऑनलाईन करायचे आहे.  आणि त्याची पोहच पावती शेतकऱ्यांना द्यायची आहे. 

हे सर्व अर्ज १ डिसेंबर पासून १४ जुलै पर्यंतचे अर्ज आहेत हे अर्ज त्या ठिकाणी घेतले जातील. आणि त्याच्यामध्ये ग्रामसभेत जे काही महिन्याचे पंचायत सभा असेल या महिन्याच्या पंचायत सभेमध्ये हे अर्ज मांडले जातील. त्या नंतर जे काही एकूण अर्ज येतील त्याला ग्रामसभा मधील त्याच्या ग्रामसभे मध्ये मान्यता द्यायची आहे. ग्रामसभा आणि ग्रामपंचायतच्या मान्यतेमध्ये एक महिन्याच्या आत प्रशासकीय मान्यता देण्याचे जबाबदारी ही गट विकास अधिकारी यांच्या वर राहील. आणि प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर पंधरा दिवसाची तांत्रिक मान्यता देण्याचे जबाबदारी तांत्रिक साहित्याचे राहणार आहे. 

अशा प्रकारचे सर्व मार्गदर्शक सूचना या जी आर मध्ये निर्गमित करण्यात आलेल्या आहेत.( Gr लिंक खाली दिलेली आहे आपण डाऊनलोड करू शकता.)

तर मित्रांनो अशा प्रकारे या मार्गदर्शक सूचनाच्या आधारे आता 1 डिसेंबर 2022 पासून हे अर्ज स्वीकारले जातील जुलै महिन्यापर्यंत हे अर्ज घेतले जाणार आहे. पुढील कालावधीमध्ये हे अर्ज लाभार्थ्याला ऑनलाइन पद्धतीने करण्याची सुविधा सुद्धा देण्यात येणार आहे.

अरे अशा प्रकारचा हा एक नाविन्यपूर्ण आणि महत्त्वपूर्ण असा बदल करून 4 लाख रुपये अनुदानासाठी आता ही विहीर योजना लाभली जाणार आहे.


रोजगार हमी योजना सिंचन विहीर अर्ज pdf

डाऊनलोड अर्ज नमुना 

डाऊनलोड GR 

1 thought on “Magel Tyala Vihir Yojana: मागेल त्याला विहीर योजना अर्ज सुरू, विहिरीसाठी आता 4 लाख रुपय अनुदान. असा करा अर्ज.”

Leave a Comment