Mahabms Scheme 2023 : शेळ्या/मेंढ्या, गाई/म्हशी वाटप योजना निवड झाली अशी करा कागदपत्र अपलोड | Mahabms Documents Upload

Mahabms Scheme मित्रांनो पशुसंवर्धन विभागाअंतर्गत गेल्यावर्षी म्हणजेच 2021 किंवा 2022 या वर्षांमध्ये Ah.mahabms या पोर्टल वरती आपण शेळ्या मेंढ्या, कुक्कुटपालन, गाई म्हशी पालन या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज केले होते. त्या केलेल्या अर्जामधूनच बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना या योजनेमध्ये गाई म्हशी शेळ्या मेंढ्या कुक्कुटपालन योजनेमध्ये निवड झाली आहे.

निवड झालेल्या लाभार्थ्यांना त्यांनी अर्ज करताना जो मोबाईल क्रमांक अर्जामध्ये टाकला होता त्यावर ती निवड झाल्याचा संदेशही Mahabms या पशुसंवर्धन विभागाच्या पोर्टलवरून त्यांच्या मोबाईल वरती आलेला आहे. Mahabms Scheme

संदेश खालील प्रमाणे:

Mahabms Scheme

जर आपल्याला असा संदेश आपल्या मोबाईल क्रमांक वर आलेला असेल तर आपण पशुसंवर्धन विभागाच्या पोर्टलवर जाऊन आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करून घ्यावीत.

ज्या लाभार्थ्यांना वरील दाखवल्याप्रमाणे संदेश आलेला आहे अशा लाभार्थ्यांनी पशुसंवर्धन विभागाच्या Mahabms Scheme https://ah.mahabms.com/ या वेबसाईट वरती जाऊन आपला आधार क्रमांक तसेच अर्ज करताना ज्या बँकेच्या खाते क्रमांक आपण टाकला होता त्या खाते क्रमांकाचे शेवटचे सहा अंक हे पासवर्ड मध्ये टाकून या वेबसाईट वरती लॉगिन व्हायचे आहे. आणि लॉगिन झाल्यानंतर ज्या घटकासाठी आपण अर्ज केलेला आहे त्या घटकासाठी आवश्यक किती कागदपत्रे अपलोड करावयाची आहे.

लॉगिन कसे करावे? Mahabms Scheme

आपण https://ah.mahabms.com/ या संकेतस्थळावर गेल्यानंतर या ठिकाणी कागदपत्र अपलोड करा हा पर्याय आपल्यासमोर दाखवला जाईल. त्या पर्यायावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपल्याला युजर आयडी आणि पासवर्ड टाकायचा आहे. यूजर आयडी मध्ये आपला आधार क्रमांक हा आपला युजरनेम असणार आहे आणि त्यानंतर आपण अर्ज करताना जे पासबुक अपलोड केले होते त्या बँकेचा खाते क्रमांकाचे शेवटचे सहा अंक हे आपला पासवर्ड असेल.

कागदपत्र अपलोड करण्याची मुदत Mahabms Scheme

पात्र झालेल्या लाभार्थ्यांनी पोर्टलवर कागदपत्र अपलोड करण्यासाठी 11 फेब्रुवारी 2023 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.

हे पण वाचा: Shettale Yojana 2023 : शेततळे अनुदान योजना सर्व माहिती, अनुदान, कागदपत्र, ऑनलाईन अर्ज पहा सर्व माहिती.

खालील कागदपत्रे अपलोड करावीत Mahabms Scheme

 1. फोटो ओळखपत्राची सत्यप्रत अनिवार्य
 2. सात बारा अनिवार्य
 3. 8 अ उतारा अनिवार्य
 4. अपत्य दाखला/ स्वंघोषणापत्र
 5. आधार कार्ड अनिवार्य
 6. सातबारा मध्ये लाभार्थीचे नाव नसल्यास कुटुंबाचे संमती पत्र किंवा दुसऱ्याची जमीन भाडे तत्त्वावर घेतली असल्यास त्याचा करारनामा Mahabms Scheme
 7. अनुसूचित जाती जमाती मध्ये असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत असल्यास अनिवार्य
 8. रहिवासी दाखला अनिवार्य
 9. दारिद्र रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र असल्यास अनिवार्य
 10. बँक पासबुक सत्यप्रत अनिवार्य
 11. राशन कार्ड किंवा कुटुंब प्रमाणपत्र अनिवार्य
 12. अपंग असल्यास दाखला अनिवार्य
 13. बचत गट सदस्य असल्याचे किंवा प्रमाणपत्र किंवा बचत गटाचे बँक खात्याचे पासबुकची पहिल्या पानाची झेरॉक्स
 14. वय जन्मतारखेचा पुरावा सत्यप्रत
 15. शैक्षणिक पात्रतेचा दाखला
 16. रोजगार संग रोजगार कार्यालयाचे नाव नोंदणी कार्ड ची सत्यप्रत
 17. प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित प्रत

कागदपत्रे अपलोड करण्या अगोदरच्या सूचना Mahabms Scheme

 • कागदपत्र अपलोड क्षमता 100 kb पर्यंत असावी म्हणजे कागदपत्र अपलोड करताना 100 kb आत मध्ये jpg किंवा jpeg किंवा png या फॉरमॅटमध्ये कागदपत्र अपलोड करावेत.
 • अर्ज प्रतीक्षाधिन ठरल्यानंतरच कागदपत्र विथ वेळेतच कागदपत्र अपलोड करता येतील.
 • अर्धा लोणीच्या वेळेस देण्यात आलेल्या आधार कार्ड नंबर व पासवर्ड भरून लोगिन करा या बटन वर क्लिक करणे.
 • निवडा या बटन वर क्लिक करून कागदपत्र अपलोड करण्यात यावीत. Mahabms Scheme
 • कागदपत्र अपलोड करताना चुस फाईल निवडून घ्यावी व त्यानंतर सेव करण्यापूर्वी शेजारी दिलेल्या विंडोमध्ये आपण अपलोड केलेल्या कागदपत्राची खात्री करून त्यानंतरच SAVE या बटन वर क्लिक करावे.
 • कागदपत्र जतन करण्यापूर्वी ते योग्य आहेत का नाहीत याची खात्री करून घ्यावी.
 • योजनेच्या लाभार्थी निवडीच्या निकषानुसार अपलोड केलेल्या कागदपत्रा व्यतिरिक्त अनुषंगिक अतिरिक्त करता त्याची मागणी पशुधन विकास अधिकारी किंवा पंचायत समिती किंवा पशुसंवर्धन अधिकारी यांनी केल्यास ती कागदपत्रे उपलब्ध करून देणे लाभार्थ्यास बंधनकारक असणार आहे. Mahabms Scheme

आपत्य दाखला डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

अपत्य स्वयंघोषणापत्र PDF (Apatya dakhla Pdf)

Mahabms Scheme

1 thought on “Mahabms Scheme 2023 : शेळ्या/मेंढ्या, गाई/म्हशी वाटप योजना निवड झाली अशी करा कागदपत्र अपलोड | Mahabms Documents Upload”

Leave a Comment