mahadbt farmer scheme: आता शेतकऱ्यांना मिळणार अनुदानावर खते बियाणे औषधे? असा करा ऑनलाईन अर्ज.

मित्रांनो महाडीबीटी पोर्टल mahadbt farmer scheme योजना म्हणजेच, अर्ज एक योजना अनेक महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या महाडीबीटी पोर्टल वरती भरपूर साऱ्या योजनांचा आपण लाभ घेत असतो. त्यामध्ये कांदाचाळ असो किंवा ट्रॅक्टर, ठिबक सिंचन, तुषार सिंचन, यांत्रिकरण मध्ये पावर टिलर, मळणी यंत्र, कडबा कुट्टी मशीन,अजून बरेच काही अशा भरपूर योजनांचा आपण लाभ घेत असतो त्या मध्येच आता आपल्याला बियाणे खते तसेच औषधे याचाही लाभ घेता येणार आहे.

राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टल mahadbt portal वर शेतकरी योजना या शीर्षकांतर्गत बियाणे घटकाचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे या सुविधा अंतर्गत शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान या योजनेअंतर्गत सोयाबीन भात तूर मूग उडीद मका बाजरी इत्यादी बियाणे अनुदानावर उपलब्ध होणार आहेत यासाठी शेतकऱ्यांना अर्ज करणे बंधनकारक असणार आहे.

राज्यात केंद्र सरकार पुरस्कृत राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान सन 2007-2008 पासून राबविण्यात येत आहे. सदर अभियानांतर्गत भात गहू कडधान्य भरडधान्य अशा पिकाचा समावेश करण्यात आला आहे. 2014 15 पासून बाराव्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत मार्गदर्शक सूचनांनुसार या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात आली आहे. केंद्र सरकारने वर्ष 2018-19 व 2019 -20 वर्ष पोस्टीक तृणधान्य वर्ष म्हणून जाहीर केली आहे. त्या अंतर्गत 2018-19 पासून केंद्र शासनाने पूर्वीच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान भरडधान्य अभियानांतर्गत बदल करून दोन स्वतंत्र अभियान राबविण्याचे धोरण आखले आहे. त्या अंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान भरडधान्य अंतर्गत मका पीक राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान पोस्टीक तृणधान्य अंतर्गत ज्वारी बाजरी व रागी या पिकासाठी स्वतंत्र योजना सुरू केली आहे या दोन अभियानासाठी नव्याने स्वतंत्र अर्ज सुरु केले आहेत. बियाणे तसेच वान, अनुदान याविषयी माहिती पाहण्यासाठी खालील पीडीएफ तपासा :

योजनेचा लाभ पाहण्यासाठी येथे क्लिक करा. Click Here

केंद्र सरकारने पीक निहाय निवडलेले जिल्हे खालील प्रमाणे आहेत:

भात – पुणे, नाशिक, सातारा, गोंदिया, भंडारा, नागपूर, चंद्रपूर, व गडचिरोली गहू – सोलापूर, बीड, नागपूर कडधान्य – सर्व जिल्हे मका – औरंगाबाद, जालना, सांगली, अहमदनगर, नाशिक, धुळे व जळगाव. पौष्टीक तृणधान्ये – ज्वारी, बाजरी, रागी अ) ज्वारी – नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, बुलडाणा, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, औरंगाबाद, बीड, जालना, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली, पुणे, अकोला, वाशिम, अमरावती व यवतमाळ. ब) बाजरी – नाशिक, धुळे, जालना, सांगली, जळगाव, अहमदनगर, बीड, औरंगाबाद व उस्मानाबाद. क) रागी – नाशिक, पुणे, ठाणे (पालघर सह), सातारा, कोल्हापूर, रायगड व रत्नागिरी. ड) कापूस – बुलढाणा,अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ,वर्धा,नागपूर,चंद्रपूर. इ) ऊस – औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली.

ऑनलाइन अर्ज कसा करावा ?

Website – https://mahadbtmahait.gov.in/

आवश्यक कागदपत्रे :

  • ७/१२
  • ८-ए
  • जात प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास)

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील व्हिडिओ पाहावा 👇👇 किंवा आपल्या जवळच्या 🙏सीएससी केंद्राशी संपर्क साधावा.

वरील लेख आपल्याला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा तसेच आपल्या सर्व मित्रांना शेअर करायला विसरू नका.

अशाच पद्धतीच्या नवनवीन पोस्ट साठी खाली दिलेल्या आमच्या राज्यस्तरीय WhatsApp  तसेच Telegram ग्रुप ला जॉईन करा..🙏👇

Leave a Comment