Mahadbt Farmer: महाडीबीटी फार्मर पोर्टलवर खरीप हंगाम 2023 करता बियाणे अर्ज सुरू.

Mahadbt Farmer महाडीबीटी फार्मर पोर्टलच्या माध्यमातून या वर्षीच्या खरीप हंगाम 2023 करिता कृषी विभागांतर्गत खरीप पिकाचे बियाणे घेण्यासाठी अर्ज सुरू झालेले आहेत. Mahadbt Farmer seed application

महाडीबीटी फार्मर पोर्टल (Mahadbt Farmer) वरती अनुदानावर बियाणे घेण्यासाठी व प्रात्यक्षिक अंतर्गत बियाणे वितरण साठी खरीप हंगाम 2023 साठी अर्ज स्वीकारणे सुरू झालेले आहेत. ज्या शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी बियाण्यासाठी अर्ज करायचा आहे त्या शेतकऱ्यांनी महाडीबीटी फार्मर पोर्टलवर बियाणे या घटकाच्या माध्यमातून आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.

Mahadbt Farmer महाडीबीटी फार्मर पोर्टल मध्ये उडीद, मका, मुग, तूर, सोयाबीन इत्यादी पिकांच्या बियाणे करिता ऑनलाईन अर्ज सादर करू शकता. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 25 मे 2023 अशी आहे तरी इच्छुक शेतकऱ्यांनी 25 मे अगोदर आपला अर्ज महाडीबीटी फार्मर पोर्टल वरती सादर करावा. या तारखेनंतर अर्ज केलेल्या शेतकऱ्यांचे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही याची देखील शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी.

(Mahadbt Farmer) महाडीबीटी फार्मर पोर्टलवर बियाणे अनुदानासाठी अर्ज कसा करावा.

  1. सर्वप्रथम शेतकऱ्यांनी महाडीबीटी फार्मर पोर्टल खाली लिंक वरून लॉगिन करावे.
  2. त्यानंतर अर्ज करा हा पर्याय त्या ठिकाणी दिसेल तो पर्याय वरती क्लिक करावे.
  3. अर्ज करा या पर्यायांमध्ये केल्यानंतर बियाणे औषधे व खते हा पर्याय त्या ठिकाणी दिसेल त्याच्या समोरील बाबी निवडा या पर्यायावर क्लिक करावे.
  4. त्यानंतर आपला तालुका आपले गाव व गट क्रमांक निवडून घ्यावा.
  5. ज्या बियाणीसाठी आपल्याला अर्ज करायचा आहे ते पीक बियाणे निवडून घ्यावे.
  6. पिक बियाणे निवडल्यानंतर पिकाचे वाण निवडावे.
  7. ज्या गट क्रमांक मध्ये आपल्याला लाभ घ्यायचा आहे ते गट क्रमांक निवडून घ्यावे.
  8. वरील सर्व स्टेप पूर्ण केल्यानंतर आपला अर्ज जतन करावा व त्यानंतर मुखपृष्ठ या पर्यायावर क्लिक करावे.
  9. मुख्यपृष्ठ या पर्यायावर ती क्लिक केल्यावर त्या ठिकाणी आपल्याला अर्ज सादर करा हा पर्याय दिसेल त्या पर्यायावर क्लिक करावे.
  10. आपला अर्ज सादर केल्यानंतर प्राधान्य क्रमांक देऊन आपला अर्ज सादर करा या बटन वर क्लिक करून आपला अर्ज सादर करून घ्यावा.

वरील पद्धतीच्या सर्व स्टेप ऑफ करून आपण आपला अर्ज हा यशस्वीरित्या ऑनलाईन पद्धतीने सादर करून घेऊ शकता. अर्ज सादर करण्यासाठी काही अडचणी येत असेल तर खालील व्हिडिओच्या मदतीने आपण आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरू शकता.

महाडीबीटी फार्मर पोर्टल लिंक

Mahadbt Farmer

Leave a Comment