Mahajyoti Free Tablet Yojana: दहावी पास विद्यार्थ्यांसाठी फ्री टॅबलेट योजना, असा करा ऑनलाईन अर्ज

Mahajyoti Fre Tablet Yojana केंद्र सरकार व राज्य सरकार देशांमधील विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी नेहमीच वेगवेगळ्या पद्धतीच्या योजना राबवीत असते. यामधीलच एक योजना म्हणजे महाज्योती ही टॅबलेट योजना (Mahajyoti Free Tablet Yojana) ही योजना महाराष्ट्रामधील विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी राबविण्यात येते. या योजनेचे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 2023-24 साठी सुरू झालेले आहेत. या योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनाने महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (Mahajyoti) या संस्थेसोबत मिळून इयत्ता दहावीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांना फ्री मध्ये टॅबलेट देण्याची संधी दिलेली आहे.

दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना MHT-CET/JEE/NEET या परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी ओबीसी(OBC), वी.जा.भ.ज. (VJNT), वि मा प्र (SBC), या प्रवर्गांमधील नॉन क्रिमी प्लेयर उत्पन्न गटामधील इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्याकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येतात. हे अर्ज करण्याकरता 2023-24 या वर्षासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरू झालेले आहे. जर आपण एक दहावी पास विद्यार्थी असाल किंवा आपला मुलगा असो किंवा मुलगी असो यावर्षी म्हणजे 2023 मध्ये परीक्षा देणार असेल तर त्यांनाही फ्री टॅबलेट (Mahajyoti Free Tablet Yojana) मिळण्याची सुवर्णसंधी आहे.

दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर बऱ्याच साऱ्या विद्यार्थ्यांना इंजिनियर किंवा मेडिकल ची तयारी करायची असते परंतु आर्थिक परिस्थिती किंवा अन्य दुसऱ्या कारणामुळे किंवा ट्युशनच्या जास्त फीस असल्यामुळे त्यांना क्लासमध्ये क्लास लावता येत नाही. तर अशा विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासनाने महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (Mahajyoti) मार्फत ऑनलाइन कोचिंग प्रशिक्षण उपक्रम सुरू केलेला आहे. Mahajyoti Free Tablet Yojana

महाराष्ट्रामधील इतर मागासवर्गीय, भटक्या जमाती, विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गामधील विद्यार्थ्याकडून MHT-CET/JEE/NEET 2025 करता या योजनेअंतर्गत अर्ज मागविण्यात येत आहेत. महाज्योती मार्फत MHT-CET/JEE/NEET या परीक्षा पूर्ण प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने देण्यात येते. तसेच ऑनलाईन प्रशिक्षणासाठी महाज्योतीतर्फे विद्यार्थी ऑनलाइन अर्ज करतील अशा विद्यार्थ्यांना मोफत मध्ये टॅबलेट देण्यात येतो व 6 जीबी इंटरनेट डेटा ही पुरविण्यात येतो.

Mahajyoti Free Tablet Yojana योजनेच्या लाभासाठी पात्रता

 • विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
 • तसेच विद्यार्थी इतर मागासवर्गीय विमुक्त जाती भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्ग यापैकी असावा.
 • विद्यार्थी हा नॉन क्रिमिलियर उत्पन्न गटातील असावा.
 • जे विद्यार्थी 2023 मध्ये दहावीची परीक्षा देत आहेत ते विद्यार्थी अर्ज करण्यासाठी पात्र असून त्या विद्यार्थ्यांना अर्ज करताना दहावीचे प्रवेश पत्र व नववीची गुणपत्रिका अपलोड लागणार.
 • तसेच विद्यार्थी हा विज्ञान शाखेमध्ये प्रवेश घेणारा असावा याबाबतची कागदपत्रे त्यांनी भविष्यात सूचनानुसार अपलोड करणे आवश्यक आहे.

अर्ज करण्यासाठी महत्त्वाची कागदपत्रे Mahajyoti.org.in registration

 • नववीची गुणपत्रिका
 • दहावीचे परीक्षेचे ओळखपत्र (Hallticket)
 • आधार कार्ड
 • रहिवासी दाखला
 • जातीचे प्रमाणपत्र
 • नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र

महाज्योती फ्री टॅबलेट योजना अटी व शर्ती

 • अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 31 मार्च 2023 आहे.
 • पोस्टाने किंवा ईमेल द्वारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही.
 • जाहिरात रद्द करणे मुदतवाढ देणे अर्ज नाकारणे व स्वीकारणे याबाबतचे सर्व अधिकार संचालक महाज्योती यांच्याकडे राहतील.
 • अर्ज भरताना कोणत्याही प्रकारच्या अडचणी जर आपल्याला आल्यास तर Mahajyoti कॉल सेंटरवर संपर्क करावा. संपर्क क्रमांक- 0712-2870120/21
 • दहावीचा रिझल्ट लागल्यानंतर विद्यार्थ्याकडून दहावीची गुणपत्रिका, विज्ञान शाखेमध्ये प्रवेश घेतल्याचा दाखला टीसी किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट व MHT-CET/JEE/NEET या परीक्षेची तयारी करत आहोत असे एक हमीपत्र मागवण्यात येईल.

mahajyoti.org.in registration

ऑनलाइन अर्ज कसा करावा पाहण्यासाठी येथे क्लिक करा

4 thoughts on “Mahajyoti Free Tablet Yojana: दहावी पास विद्यार्थ्यांसाठी फ्री टॅबलेट योजना, असा करा ऑनलाईन अर्ज”

Leave a Comment