Mahajyoti: दहावीच्या विद्यार्थ्यांना नीट सीईटीचे मोफत प्रशिक्षण, 31 मार्च अगोदर येथे करा अर्ज

Mahajyoti: महा ज्योती योजनेअंतर्गत मागासवर्गीय भटक्या विभक्त जाती जमाती आणि विशेष मार्ग मागास प्रवर्गांमधील विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय तसेच अभियांत्रिकी प्रवेश घेण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या नीट परीक्षा आणि सीईटी परीक्षेचे (NEET(UG), MAH-CET) प्रशिक्षण मोफत देण्यात येणार आहे.

राज्य शासनाच्या महात्मा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेकडून हे मोफत मध्ये प्रशिक्षण दिले जाणार आहे. यावर्षी दहावीचे परीक्षा दिलेले विद्यार्थी या योजनेसाठी पात्र राहणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च अशी आहे. अर्ज करण्यासाठी थोडे दिवस शिल्लक असल्याने विद्यार्थी आणि पालकांनी लवकरात लवकर अर्ज करून घ्यावा.

महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेअंतर्गत (mahajyoti) हे प्रशिक्षण मोफत मध्ये देण्यात येणारा असून त्यासोबत विद्यार्थ्यांना मोफत इंटरनेटची सुविधा देखील दिली जाणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करून या योजनेअंतर्गत सहभाग नोंदवता येईल.

Mahajyoti कोणते विद्यार्थी पात्र राहणार

विद्यार्थी हा महाराष्ट्रातील रहिवासी असणे आवश्यक आहे. अर्जदार विद्यार्थ्यांनी यावर्षी दहावीची परीक्षा उत्तीर्ण करून अकरावीसाठी विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असणे आवश्यक आहे. ओबीसी व भटक्या जाती जमाती आणि विशेष मागास प्रवर्गांमधील विद्यार्थी या योजनेसाठी लाभ घेण्यास पात्र आहेत. शहरी भागात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दहावीच्या परीक्षेमध्ये 70 टक्के तर ग्रामीण आदिवासी किंवा नक्षलग्रस्त भागांमधील विद्यार्थ्यांना 60 टक्के गुण असणे आवश्यक आहे.

NEET(UG), MAH-CET मोफत प्रशिक्षण

दहावीनंतर अनेक विद्यार्थ्यांना इंजीनियरिंग आणि मेडिकल या अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळवण्यासाठी तयारी करावयाची असते मात्र आर्थिक परिस्थिती मुळे काही विद्यार्थी महागडे कोचिंग क्लास लावणे शक्य होत नाही. अशा गरीब विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग आणि मेडिकलमध्ये प्रवेश घेण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी mahajyoti या योजनेच्या माध्यमातून अकरावीमध्ये प्रवेश देणाऱ्या विद्यार्थ्यांना जेईई नीट आणि सीईटी परीक्षेसाठी (MHT-CET/JEE/NEET) मोफत मार्गदर्शन दिले जाणार आहे.

प्रशिक्षणासाठी टॅब देखील मोफत

या ऑनलाइन प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांना परीक्षेची पुस्तके व मोफत टॅबलेट आणि दररोज 6जीबी इंटरनेट डाटा यामध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे.

कोणती कागदपत्र लागणार

या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना दहावी उत्तीर्ण गुणपत्रिका, अकरावी विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याची कागदपत्रे, बोनाफाईड, ओबीसी भटक्या जाती जमाती आणि विशेष मागास प्रवराचे जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र आवश्यक आहे.

असा करा ऑनलाईन अर्ज

Application for MHT-CET/JEE/NEET – 2025 Training विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करण्यासाठी mahajyoti मोफत प्रशिक्षणासाठी https://neet.mahajyoti.org.in/2023/mobile_verification.php या संकेतस्थळावर नोटीस बोर्ड या पर्यायावर क्लिक करून आपला अर्ज सादर करावा लागणार आहे. अर्ज सादर करण्याची शेवटचा दिनांक 31 मार्च 2023 असा आहे.

हे पण वाचा: Mahajyoti Free Tablet Yojana: दहावी पास विद्यार्थ्यांसाठी फ्री टॅबलेट योजना, असा करा ऑनलाईन अर्ज

योजने विषयी अधिक माहिती साठी येथे क्लिक करा

Leave a Comment