Mahajyoti Registration 2023 खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. https://mahajyoti.org.in/application-for-mht-cet-jee-neet-2025-training/
वेबसाईट वरती आल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला तीन ऑप्शन पाहायला मिळतील Advertisement, तपशील आणि रजिस्ट्रेशन लिंक (Registration Link) त्यासाठी आपल्याला रजिस्ट्रेशन लिंक Mahajyoti Registration 2023 या पर्यायावर क्लिक करायचे.

Registration लिंक वर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपला मोबाईल नंबर टाकावा लागेल आणि त्यावर ती आलेला ओटीपी टाकल्यानंतर खालील पद्धतीचा ॲप्लिकेशन फॉर्म आपल्या PC किंवा मोबाईल मध्ये ओपन होईल.
त्या फॉर्ममध्ये दाखवल्या पद्धतीने आपल्याला कोणत्या कोर्ससाठी ऍडमिशन करायचे जसे की MHT-CET/JEE/NEET ज्या परीक्षेची आपल्याला तयारी करायची आहे ती परीक्षा या ठिकाणी आपल्याला निवडायची आहे. परीक्षा निवडल्यानंतर आपल्याला आपले नाव, वडिलांचे नाव, जन्मतारीख, आधार नंबर, नॅशनॅलिटी आणि इतर काही माहिती व्यवस्थित भरायचे आहे.
Mahajyoti Registration 2023
ही सर्व माहिती भरवल्यानंतर आपल्यासमोर आपल्याला सध्याचा ऍड्रेस त्या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्यानंतर शेवटी आपला जर अल्टरनेट नंबर असेल तर तो नंबर टाकून ही माहिती सेव करायचे आहे. ही सर्व माहिती सेव केल्यानंतर वरील दाखवल्याप्रमाणे चे आवश्यक कागदपत्रे आहेत हे सर्व कागदपत्रे आपल्याला 200 kb च्या आत मध्ये अपलोड करायचे आहे आणि आपला अर्ज सबमिट करून त्याची प्रिंट काढून घ्यायची आहे.
अशा पद्धतीने मित्रांनो आपण दहावी उत्तीर्ण असाल किंवा दहावी परीक्षा देत असाल तर आपण महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था अंतर्गत म्हणजेच महाज्योती अंतर्गत फ्री मध्ये टॅबलेट मिळू शकतात आणि आपले परीक्षेची ऑनलाईन पद्धतीने तयारी करू शकता.