PMMVY: ‘या’ हेल्पलाईनच्या मदतीने मातृत्व वंदना योजनेतून महिलांना मिळणार 6000 रुपये | PM Matritva Vandana Yojana Online Application

Matritva Vandana Yojana (PMMVY) : मोदी सरकार देशांमधील प्रत्येक समाजातील वर्गासाठी कोणती ना कोणती नवीन योजना नेहमीच घेऊन येत असते. असंघटित क्षेत्रातील कर्मचारी आणि शेतकऱ्या व्यतिरिक्त केंद्र सरकार विवाहित महिलांना आर्थिक पाठबळ देते. महिलांसाठी अनेक योजना या अगोदर राबविण्यात आलेले आहेत त्यानंतर आता पुन्हा एकदा असेच एक महिलांसाठी नवीन योजना मोदी सरकार घेऊन आले आहेत. त्यात महिलांना 6 हजार रुपये मिळतात या योजनेचा फायदा विवाहित महिलांना मिळतो या योजनेअंतर्गत महिलांना आर्थिक सहाय्य मिळते पाहूयात कोणती योजना आहेत त्याविषयी सविस्तर माहिती.

या योजनेचे नाव आहे मातृत्व वंदना योजना ( PM Matritva Vandana Yojana). या योजनेमध्ये गर्भवती महिलांना केंद्र सरकार आर्थिक मदत देते. महिला आणि तिच्या अपत्याला या योजनेअंतर्गत ही मदत मिळते. देशामध्ये कुपोषित मुलं जन्माला येऊ नाही यासाठी मोदी सरकारने ही योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत केंद्र सरकार महिलांना सहा हजार रुपयांचे आर्थिक मदत करणार आहे. सहा हजार रुपये याप्रमाणे ही रक्कम मिळणार आहे.

मातृत्व वंदना कशी मिळणार रक्कम

मातृत्व वंदना (Matritva Vandana Yojana) या योजनेअंतर्गत महिलांना पहिल्या टप्प्यामध्ये 1 हजार रुपये त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये 6 हजार रुपये आणि तिसऱ्या टप्प्यांमध्ये 2 हजार रुपये गर्भवती महिलांना देण्यात येणार आहेत या योजनेतून एकूण रक्कम महिलांना 6 हजार रुपये मिळतात. त्यानंतर बाळाचा जन्म झाल्यानंतर 1 हजार रुपये मिळतात त्यामुळे या योजनेचा लाभ महिलांना आणि त्यांच्या बाळांना देखील होतो. देशामध्ये कोणतेच मूल कुपोषित होऊ नये यासाठी मातृत्व वंदना योजना मोदी सरकारने सुरू केलेली आहे.

हेल्पलाइन क्रमांक

PM Matritva Vandana Yojana या योजनेची रक्कम मोदी सरकार थेट महिलांच्या खात्यामध्ये जमा करणार आहेत या योजनेचा अर्ज भरण्यासाठी तुम्हाला काही अडचण येत असेल तर तुम्ही हेल्पलाइन क्रमांक 7998799804 संपर्क करू शकता. मातृत्व वंदना योजनेमध्ये गर्भवती महिलांना केंद्र सरकार आर्थिक मदत करणार असल्यामुळे महिला आणि तिच्या बाळाला योजनेअंतर्गत आर्थिक लाभ मिळणार आहे. या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी https://wcd.nic.in/schemes/pradhan-mantri-matru-vandana-yojana दिलेल्या वेबसाईट संपर्क साधा.

मातृत्व वंदना योजना अटी

  1. गर्भवती महिलेचे वय कमीत कमी 19 वर्ष इतके असावे.
  2. गर्भवती महिलांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा लागतो.
  3. हा ऑफलाईन अर्ज आपण आपल्या गावांमधील आशा स्वयंसेविका यांच्यामार्फत करू शकता.
  4. केंद्र सरकार गर्भवती महिलांना सहा हजार रुपये हे तीन हप्त्यांमध्ये त्यांच्या खात्यामध्ये जमा करते.
  5. एक जानेवारी 2017 रोजी मातृत्व वंदना योजना सुरू करण्यात आली आहे.

Leave a Comment