या जिल्ह्याचे मिनी ट्रॅक्टर व गटई स्टॉल करिता अर्ज सुरू. मिनी ट्रॅक्टरसाठी 90 टक्के अनुदान

Tractor Anudan Yojana


मित्रांनो समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून राज्यातील अनुसूचित जाती नवबौद्ध घटकातील बांधवांकरता विविध योजना राबवल्या जातात.  यामध्ये अनुदानावरती मिनी ट्रॅक्टर व गटई स्टॉल वाटप Tractor yojana योजनेच्या नवीन अर्जाच्या संदर्भातील दोन महत्त्वपूर्ण असे अपडेट आहेत. 

लातूर जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील स्वयं सहायता बचत गटांना 90% अनुदानावर  ट्रॅक्टर साठी अर्ज सुरू झालेले आहेत. हे अर्ज 15 जानेवारी 2023 पर्यंत स्वीकारले जाणार आहेत.

यामध्ये अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकाच्या जे स्वयंसहायता बचत गट आहे ज्याच्यामधील 80 टक्के सदस्य हे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील असतील अशा बचत गटांना 90% अनुदानावरती अर्थात तीन लाख पंधरा हजार रुपयापर्यंत अनुदान हे मिनी ट्रॅक्टरचा खरेदीसाठी दिले जातात. ज्याच्यामध्ये लाभार्थ्यांना 9 hp पासून 18 hp अश्वशक्ती पर्यंत ट्रॅक्टर खरेदी करता येतो.

 या ट्रॅक्टर खरेदीसाठी जास्तीत जास्त 3 लाख 15 हजार रुपये एवढा अनुदान या ठिकाणी दिले जाते. त्याच्यामध्ये ट्रॅक्टर खरेदी केल्यानंतर 50% आणि आरटीओ कडे नोंदणी झाल्यानंतर उर्वरित 50% अशा प्रकारांमध्ये हे अनुदान दिले जाते आणि याच्यापेक्षा जास्त जर खरेदी करायची असेल तर उर्वरित जो काही खर्च असेल तो त्या ठिकाणी लाभार्थ्यांना स्वतः करायचं असतो.  यासाठी 15 जानेवारी 2023 पर्यंत हे अर्ज स्वीकारले जाणार आहेत.


मागेल त्याला विहीर योजना सुरु, विहिरीसाठी आता 4 लाख रुपय अनुदान. असा करा अर्ज..


मित्रांनो याच प्रमाणे अनुसूचित जातीतील गटई कामगारांना 100  टक्के अनुदानावरती गटई स्टॉल साठी सुद्धा अर्ज याठिकाणी स्वीकारले जात आहेत. याची शेवटची तारीख 5 जानेवारी 2023 आहे. लातूर जिल्ह्यातील जे गटई कामगार असतील अशा गटई कामगारांना हा अर्ज करता येणार आहे याच्यासाठी अर्जदाराचे ग्रामीण भागासाठी उत्पन्न हे 40 हजार रुपये तर शहरी भागासाठी जो उत्पन्न 50 हजार रुपये असावं. तसेच गटई स्टॉल लावण्याच्या जागेचा 8 अ उतारा किंवा भाडे करार पत्र 100 रुपयांच्या बॉण्ड पेपर वरती नमुन्यातील करारनामा अशा प्रकारच्या काही महत्त्वपूर्ण अशा कागदपत्रासह आपल्याला हा अर्ज 5 जानेवारी 2023 पर्यंत आणि ट्रॅक्टरच्या अनुदानाकरता 15 जानेवारी 2023 पर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथील सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयामध्ये जमा करायचे आहेत. आपण जर या प्रवर्गातील असाल आपण जर योजनेसाठी पात्र असाल तर आपण या योजने करता अर्ज करू शकता.

ही योजना साधारणपणे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये राबवली जाते आणि प्रत्येक जिल्ह्याच्या माध्यमातून एक तारीख निश्चित करून अर्ज मागवले जातात. आता लातूर जिल्ह्याकरता अर्ज मागविण्यात आलेले आहेत इतर ज्या ज्या जिल्ह्याच्या अर्ज मागवले जातील त्याच्याबद्दलची माहिती सुद्धा आपण या माध्यमातून नक्की घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

2 thoughts on “या जिल्ह्याचे मिनी ट्रॅक्टर व गटई स्टॉल करिता अर्ज सुरू. मिनी ट्रॅक्टरसाठी 90 टक्के अनुदान”

Leave a Comment