Mustard Crop: मोहरी या पिकाची लागवड करा आणि मिळवा लखो चा नफा…

       महाराष्ट्रात रब्बी हंगामात हरभरा गहू ज्वारी बाजरी उन्हाळा भुईमूग सूर्यफूल यांचे उत्पादन घेतलं जातं. मोहरी हे रब्बी हंगामातील तेलबिया वर्गातील महत्त्वाचे पीक आहे मात्र त्याची लागवड राज्यात केली जात नाही. उत्तर भारतात मुलीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जात होतं मात्र त्यात अलीकडे पूर्व पश्चिम आणि दक्षिण भारतातही मोहरीचे उत्पादन घेऊ लागलेत महाराष्ट्रातही मोहरी पिकाला पोषक वातावरण आहे त्यामुळे मोहरी लागवडीला वाव आहे.

याविषयी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने दिलेली माहिती पाहूयात.


महाराष्ट्रातही मोहरीचे पीक फायदेशीर आहे का तर ते सुरुवातीला पाहून घेऊ या


हे पण वाचा- Irrigation Scheme : ठिबक सिंचन योजनेचा कोणत्या राज्यांना निधीचा हप्ता मंजूर ?


महाराष्ट्रात ऑक्टोबर चा शेवटचा आठवडा ते फेब्रुवारी पर्यंत 10 ते 30 अंश सेल्सिअस तापमान असते. ते मोहरी पिकाला पोषक असं वातावरण आहे. मोहरी हे पीक मध्यम खोल जमीन किंवा खारवट जमिनीत घेता येतं. ग्रस्त जमिनीत या पिकाचे उत्पादन इतर पिकांपेक्षा जास्त मिळतं. साधारणता दोन किंवा तीन पाणी  दिल्यास चांगलं उत्पादन देते व उत्पादन खर्च कमी लागतो तसेच मोहरी पिकाला पाणीही कमी लागतं.

मोहरी, गहू, हरभरा, जवस या पिकांमध्ये आंतरपीक म्हणून घेता येतं. बदलते वातावरणामध्ये या पिकाला भरपूर वाव असल्याचं सांगितलं जातं, योग्य वेळी पेरणी केली तर तीळ आणि रोगांचा फार काही परिणाम होत नाही. त्याचा प्रादुर्भाव कमी होतो त्यासोबतच या पिकाच्या शेंगा परिपक्व होण्याच्या अवस्थेमध्ये पक्षांपासून संरक्षण करण्याची आवश्यकता नसते. पीक परिपक्व होताना झाडाची सर्व पान जमिनीवर गळून पडतात आणि ते जमिनीत कुजल्यामुळे जमिनीतील सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण वाढतं

मोहरी या वाणाची निवड कशी करायची तर ते पाहूया. 


डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने प्रती एक ते बारा क्विंटल उत्पादन देण्याची क्षमता असलेलं टीएएम 1081 (TTM 1081) हे वाण विकसित केले आहे. मोहरी हे परंपरागत घेतल्या जाणाऱ्या गहू, हरभरा, जवस या पिकाला पर्याय पीक म्हणून उपलब्ध होऊ शकतं. सोयाबीन नंतर नेहमीच्या पिकांपेक्षा लागवड खर्च कमी आणि अधिक उत्पादन मिळत असल्यामुळे मोहरी पिकाची लागवड करता येऊ शकते. भात पिकाच्या लवकर येणाऱ्या जातींची लागवड करून रब्बी मध्ये मोहरी पिकाची लागवड करणे अधिक फायद्याचे ठरू शकतं. परंपरागत सलग गहू पीक घेण्यापेक्षा गहू पिकामध्ये ९:१  किंवा ६:१  या प्रमाणात आंतरपीक घेणे आर्थिक दृष्ट्या अधिक फायदेशीर ठरू शकतो.


त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा ताजा अपडेट साठी आमचा व्हॉट्स ॲप ग्रुप नक्की जॉईन करायला विसरु नका.

Leave a Comment