Namo Shetkari Yojana : नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळण्यात बँक खात्याचा अडथळा, हे काम करा

Namo Shetkari Yojana ; केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्य सरकारने ‘नमो शेतकरी’ महा सन्मान निधी योजना सुरू केली. राज्यात ही योजना सुरू करण्यात आली असून शेतकऱ्यांना वार्षिक ६ हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे. या योजनेच्या पहिल्या हप्त्याचा लाभ अनेक शेतकऱ्यांना अद्याप मिळालेला नाही. यामागे बँक खात्यांशी संबंधित विविध कारणे असल्याचे समोर आले. Namo Shetkari Yojana

जेव्हा खराब खात्याची माहिती गोळा केली जाते तेव्हा विविध समस्या समोर येतात. यामध्ये संबंधित बँक खाते बँकेने बंद केले आहे किंवा गोठवले (डॉर्मंट) आहे, बँकेने NPCI पोर्टलवरून आधार क्रमांक रद्द केला आहे, आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक केलेला नाही, बँक खाते बंद केले आहे, बँक खाते खात्यावर कमाल क्रेडिट मर्यादा सेट केली आहे, बँक खाते बंद, निष्क्रिय, अवैध बँक खाते, KYC प्रतीक्षेत, हक्क न केलेले बँक खाते, कोणत्याही प्रकारची कारणे, बँकेने ती बर्याच काळापासून वापरली नाही, अशी बरेच करणे आहेत.

डॉर्मंट खाते म्हणजे 2 वर्षापर्यंत बँक खात्यावर कोणताही व्यवहार न करणे. या कारणामुळे बँक खाते डॉर्मंट म्हणून ओळखले जाते.

Namo Shetkari Yojana लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांना काय करावे?

शेतकऱ्यांनी बँकेत जाऊन तपासणी करावी. खाते व्यवहार का बंद झाला किंवा अन्य कोणत्या कारणाने झाला हे शोधून तातडीने दुरुस्त करणे आवश्यक आहे. आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक नसल्यास किंवा बँकेने NPCI पोर्टलवरून आधार क्रमांक जोडला नसल्यास, तुम्हाला बँकेशी संपर्क साधावा लागेल व आपले आधार NPCI (National Payments Corporation of India) व DBT ( Direct Benefit Transfer) ला जोडून घ्यावे लागेल.

बँक खाते सुरु असल्याची खात्री करा

राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली असून या योजनेची राज्यात अंमलबजावणी सुरू झाली आहे. अशा प्रकारे शेतकर्‍यांना रु.6000 देण्यात येतात. ज्या शेतकऱ्यांना योजनेच्या पहिल्या हप्त्याचा लाभ मिळणे बाकी आहे. त्यांनी काही मुद्दे तपासावेत. या वेळी बँक खाती सुरु ठेवण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले.