Namo Shetkari Yojana: नमो शेतकरी महासन्मान योजनेचे वार्षिक 6 हाजार लाभ घेण्यासाठी या 3 अटी पूर्ण करा

Namo Shetkari Yojana: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या आधारावर महाराष्ट्र सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना यावर्षी सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना महाराष्ट्र सरकारकडून दर चार महिन्याला दोन हजार रुपये असे वर्षात तीन वेळेस सहा हजार रुपये देण्यात येणार आहेत. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे.

केंद्र सरकारच्या पी एम किसान योजने (Pm Kisan Yojana) प्रमाणेच, राज्याच्या योजनांची रूपरेषा समान असेल. तथापि, करदाते, सरकारी कर्मचारी, अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यासारख्या व्यक्ती या योजनांच्या लाभासाठी पात्र नसतील. 1 फेब्रुवारी 2019 पूर्वी ज्यांच्याकडे शेतजमीन होती ते या योजनेसाठी पात्र आहेत. PM किसान सन्मान निधीचा 2,000 चा हप्ता प्राप्त करण्यासाठी, बँक खाते आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांकाशी लिंक करणे अनिवार्य आहे.

राज्यात 12 लाख शेतकरी आहेत ज्यांनी अद्याप आपले बँक खाते आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांकाशी लिंक केलेले नाही. त्यामुळे अशा शेतकऱ्यांनी ताबडतोब त्यांचे बँक खाते (जेथे पीएम किसान योजनेचे पैसे जमा केले जातात) त्यांच्या आधार आणि फोन नंबरशी लिंक करावेत. अन्यथा ते राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनांचा (Namo Shetkari Yojana) लाभ मिळण्यास पात्र राहणार नाहीत.

वर्ष २०२३-२४ साठी महाराष्ट्र राज्य सरकारने केंद्र सरकार कडून शेतकरी लाभार्थ्यांची माहिती मागविली आहे. लाभार्थ्यांना महाराष्ट्र सरकारच्या पहिला हप्ता व केंद्राचा 14 वा हप्ता जुलैमध्ये अथवा मेअखेरीसमध्ये मिळेल. यात ८३ लाख लाभार्थ्यांची जाहीर आहेत. त्यांना वार्षिक १६६० कोटींची तरतूद करावी लागेल.

Namo Shetkari Yojana हे काम करा तरच मिळणार लाभ

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतील जे लाभार्थी आहेत तेच लाभार्थी नमो शेतकरी महासन्मान (Namo Shetkari Yojana) निधी योजनेसाठी पात्र राहणार आहेत. ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेले नाही त्यांनी लवकरात लवकर आपल्या बँक खात्याशी आधार लिंक करून घ्यावेत. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलैमध्ये पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा चौदावा हप्ता ( Pm Kisan 14th Installment) आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. म्हणजे शेतकऱ्यांना आता 4 हजार रुपये मिळणार आहेत.

Punjab Dakh: पुढील 3 दिवस ‘या’ जिल्ह्यात पडणार मुसळधार पाऊस

‘नमो शेतकरी महासन्मान’ योजनेसाठी पात्रता निकष खालीलप्रमाणे आहेत.

  • 1 फेब्रुवारी 2019 पूर्वी जमिनीची मालकी असलेले जमीन मालक शेतकरी पात्र आहेत.
  • मानधन प्राप्त करण्यासाठी, पात्र शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे.
  • लाभार्थ्याने त्यांच्या नावाखाली त्यांच्या मालमत्तेची माहिती देणे आवश्यक आहे.
  • बँक खाते आधारशी लिंक करणे अनिवार्य आहे.

1 thought on “Namo Shetkari Yojana: नमो शेतकरी महासन्मान योजनेचे वार्षिक 6 हाजार लाभ घेण्यासाठी या 3 अटी पूर्ण करा”

Leave a Comment