Nuksan Bharpai 2024 : शेतकऱ्याना मिळणार हेक्टरी 36 हजार रुपये अवकाळी नुकसान भरपाई, 3 हेक्टर पर्यंत मर्यादा; शासन निर्णय जारी

Nuksan Bharpai 2024 Maharashtra: ऑक्टोबर ते नोव्हेंबर या काळात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेती आणि फळझाडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नोव्हेंबरमध्ये झालेल्या नुकसानीचा आढावा घेतल्यानंतर राज्य सरकारने मदत देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी राज्य सरकारने नवीन वर्षी म्हणजे 1 जानेवारी २०२४ रोजी एक शासन निणर्य जारी केला आहे. त्या विषयी सविस्तर माहिती पाहू . Nuksan Bharpai 2024

Nuksan Bharpai 2024 Maharashtra:

राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीनुसार, महसूल आणि वन विभागाने राज्यातील अवकाळी आणि गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना जिरायती पिकांसाठी प्रति हेक्टर 13,600 रुपये आणि शेतकऱ्यांना 13,600 रुपये प्रति हेक्टर मदत देण्याच्या सूचना जारी केल्या आहेत. या निर्णयामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. ऑक्टोबर ते नोव्हेंबर या काळात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेती आणि फळझाडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नोव्हेंबरमध्ये झालेल्या नुकसानीचा आढावा घेतल्यानंतर राज्य सरकारने मदत देण्याचा निर्णय घेतला.

निकषाबाहेर जाऊन मदत देण्याचे निर्देश

शासन निर्णयाची अंमलबजावणी करत नसल्याबद्दल शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. अनेक भागातील शेतकरी रस्त्यावरही उतरले. हे लक्षात घेऊन राज्य सरकारने आता बाधित शेतकऱ्यांना तीन हेक्टरच्या आत आपत्ती निवारण निधीच्या निकषांच्या पलीकडे मदत देण्याचे निर्देश दिले आहेत. maharashtra pik nuksan bharpai yadi

अशी मिळणार मदत

शासन निर्णय –
नोव्हेंबर, २०२३ मधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीत अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तींमुळे होणा-या शेतीपिकांच्या नुकसानीकरीता बाधित शेतकऱ्यांना राज्य आपती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर मदत करण्याकरिता खालीलप्रमाणे वाढीव दराने निविष्ठा अनुदान स्वरुपात मदत प्रदान करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे. Nuksan Bharpai 2024 Maharashtra list

राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधील विहित निकषाव्यतिरिक्त अथवा दरापेक्षा अधिक दराने देण्यात येणाऱ्या मदतीची रक्कम वरील विवरणपत्रात दर्शविण्यात आल्याप्रमाणे राज्य शासनाच्या निधीतून त्या त्या लेखाशीर्षाखाली खर्च करण्यात यावी.

मदतीची रक्कम प्रदान करण्यासाठी वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयामध्ये विहित केलेल्या इतर अटी व शर्ती लागू राहतील. तसेच शेतीपिकांचे नुकसानीकरिता संपूर्ण हंगामामध्ये एकाच वेळी अनुदान अनुज्ञेय आहे.

  • एसडीआरएफ नियमानुसार पूर्वी प्रदान केलेल्या मदतीची मर्यादा 2 हेक्टर होती.
  • महाविकास आघाडी सरकारच्या काळात ही रक्कम वाढवून तीन हेक्टरची कमाल मर्यादा करण्यात आली.
  • याच निर्णयानुसार राज्यात सत्तेवर आलेले महायुतीचे सरकार जिरायती शेतीसाठी हेक्टरी 8,500 रुपयांऐवजी 13,500 रुपये, बागायती पिकांसाठी 17,000 रुपयांऐवजी 27,000 रुपये आणि बहुवार्षिक पिकासाठी 22,500 रु. ऐवजी 36,000 रुपये प्रति हेक्टर अनुदान देणार आहे.

2 thoughts on “Nuksan Bharpai 2024 : शेतकऱ्याना मिळणार हेक्टरी 36 हजार रुपये अवकाळी नुकसान भरपाई, 3 हेक्टर पर्यंत मर्यादा; शासन निर्णय जारी”

Leave a Comment