Nuksan Bharpai 2023: अवकाळी पाऊस व गारपीट मुळे झालेल्या 1 लाख 99 हजार हेक्टर बाधित क्षेत्राचे पंचनामे पूर्ण, जिल्हा निहाय प्रस्ताव मंजूर

Nuksan Bharpai: नमस्कार शेतकरी बांधवांनो राज्यामध्ये विविध जिल्ह्यांमध्ये गारपीट आणि अवकाळी पावसामुळे शेती पिकांना मोठा फटका बसला होता. यावकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या गहू, ज्वारी, हरभरा, कांदा अशा शेती पिकाचे खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले. याच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून लवकरात लवकर (Nuksan Bharpai) मदत वितरित करून दिलासा द्यावा असे प्रकारची मागणी मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांकडून होत होती.

याच पार्श्वभूमीवर मार्च मधील गारपीट व अवकाळी पावसामुळे झालेल्या शेती पिकाच्या फळ पिकांच्या बाधित क्षेत्रांचे पंचनामे पूर्ण झालेले आहेत. यासाठी राज्यामधील विविध जिल्ह्यांमधील 1 लाख 99 हजार 486 हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. या झालेल्या पंचनाम्यानुसार जिल्हा निहाय (Nuksan Bharpai List) जी निधीची मागणी आहे. त्याच्यासाठी चे प्रस्ताव तयार झालेले आहेत. या जिल्हा न्याय प्रस्तावाला निधी वितरण करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून मंजुरी दिली जाईल. अशा प्रकारची माहिती मदत व पुनर्वसन विभाग यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. ही माहिती त्यांनी त्यांच्या MAHARASHTRA DGIPR या ट्विटर हँडल वरून जाहीर केली आहे ती खालील प्रमाणे.

Nuksan Bharpai 2023

यामुळे राज्यांमधील विविध जिल्ह्यांमधील नुकसान ग्रस्त झालेल्या 1 लाख 99 हजार 486 हेक्टर वरील बाधित शेतकऱ्यांना मदतीचा वितरण दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.

Kisan Helpline: अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची माहिती मोबाईल वर पाठवा, कृषी मंत्र्यांनी जारी केला हेल्पलाइन नंबर

या संदर्भातील एक शासन निर्णय घेऊन कोणत्या जिल्ह्यामध्ये किती नुकसान झालेले आहे. किती शेतकरी नुकसानी पासून बाधित आहेत. याच्यासाठी जिल्हा निहाय किती निधी वितरित केला जाईल. याची सविस्तर माहिती शासन निर्णय घेतल्यानंतर दिली जाईल. शासन निर्णय घेतल्यानंतर या निधीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा दिला जाईल. ( Nuksan Bharpai Maharashtra)

Nuksan Bharpai नुकसान भरपाई 2023

Ativrushti Nuksan Bharpai शेतकरी बांधवांनो राज्यांमधील विविध जिल्ह्यांमध्ये सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर 2022 मध्ये शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप देखील मदतीचा वितरण करण्यात आलेले नाही. या शेतकऱ्यांना देखील लवकरच मदतीचे वितरण करून त्यांना देखील दिलासा देण्याचा प्रयत्न केला जाईल.

तर शेतकरी बांधवांना अशाप्रकारे अवकाळी व गारपीट संदर्भातील हे एक महत्त्वाचे अपडेट होते याची माहिती आपल्याला नक्की उपयोगी पडेल अशी आशा करतो. याचा शासन निर्णय किंवा याच्या संदर्भातील अजून दुसरी काही माहिती मिळाल्यानंतर याची माहिती सुद्धा आपण घेण्याचा प्रयत्न करू धन्यवाद.

1 thought on “Nuksan Bharpai 2023: अवकाळी पाऊस व गारपीट मुळे झालेल्या 1 लाख 99 हजार हेक्टर बाधित क्षेत्राचे पंचनामे पूर्ण, जिल्हा निहाय प्रस्ताव मंजूर”

Leave a Comment