Old Pension Scheme: नेमकी काय आहे जुनी पेन्शन योजना व नवीन पेन्शन योजना, राज्यामधील कर्मचारी संपामुळे हा होणार तोटा

Old Pension Scheme: आराध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यासोबत मीटिंग नीसफळ ठरल्याने राज्यामधील 19 लाख सरकारी आणि निमसरकारी कर्मचारी मंगळवारपासून बेमुदत संपावर गेली आहेत (Maharashtra government employees on strike for Old Pension Scheme). या संपामध्ये सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचा सहभाग आहे.

जुन्या पेन्शन लागू ( Old Pension Scheme ) करण्यासाठी सर्व कर्मचारी आक्रमक झालेले आहे. जुनी पेन्शन योजना ( Old Pension Scheme Maharashtra ) लागू करावी अशी सर्व कर्मचाऱ्यांची मागणी आहे आणि ती त्यांनी लावून धरली आहे. परंतु राज्य सरकार ही योजना लागू करण्यासाठी राज्य सरकारने नकार दिला आहे त्यामुळे कर्मचारी संपाचे हत्यार उचलले आहे.

नेमकी काय आहे जुनी पेन्शन योजना? ( Old Pension Scheme )

जुनी पेन्शन योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना पगाराची निम्मी रक्कम पेन्शन म्हणून मिळायची म्हणजेच जर एखाद्या कर्मचाऱ्यांचा पगार 30 हजार रुपये पगार असेल तर त्या कर्मचाऱ्याला 15 हजार रुपये पेन्शन मिळायची ही रक्कम ठोक मिळत नव्हती. ( What is the amount of old age pension in Maharashtra?)

New Pension Scheme नवीन पेन्शन योजना काय आहे?

नवीन पेन्शन योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना पगाराची 2.5 टक्के रक्कम पेन्शन म्हणून मिळते. जर एखाद्या कर्मचाऱ्यांचा पगार निवृत्ती वेळी 30 हजार रुपये असेल तर मिळणारी पेन्शन 2200 असते ठोक रक्कम मिळत नाही.

खालील पाच राज्यांमध्ये जुनी पेन्शन योजना लागू ( Old Pension Scheme )

  • हिमाचल
  • पंजाब
  • पश्चिम बंगाल
  • राजस्थान
  • झारखंड

खालील राज्यात (New Pension Scheme) नवीन पेन्शन योजना

  • महाराष्ट्र
  • गुजरात
  • मध्य प्रदेश
  • हरियाणा

कर्मचाऱ्यांच्या या संपामुळे हा होणार तोटा

राज्यामधील या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संपामुळे राज्यांमधील शाळा, कॉलेज, रुग्णालय सरकारी कार्यालयांना मोठा फटका बसू शकतो. सध्या या संपाच्या काळामध्ये महाविद्यालयातील शिक्षक बारावी बोर्ड पेपर तपासणीवर बहिष्कार टाकण्यावर देखील ठाम आहेत. या बहिष्कार मुळे पेपर तपासणीवर त्याशिवाय बोर्डाचा निकाल वेळेवर लागणार नाही त्यास विलंब होऊ शकतो. त्याशिवाय शिक्षकेतर कर्मचारी सुद्धा संपावर असल्यामुळे बोर्ड परीक्षेच्या नियोजनामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. राज्यांमधील सर्व जिल्यामधील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ही कर्मचारी आंदोलन सुरू आहे.

Join WhatsApp Group
Telegram Group

Leave a Comment