Onion Subsidy: या शेतकऱ्यांना मिळणार नाही कांदा अनुदान – विखे पाटील

Onion Subsidy: कांद्याला चांगला भाव नसल्यामुळे राज्य सरकारने प्रतिक्विंटल 350 रुपये अनुदान शेतकऱ्यांसाठी जाहीर केले. अनुदान मिळण्यासाठी अर्ज देखील ज्या ठिकाणी कांदा विक्री केलेला आहे त्या ठिकाणी अर्ज करण्यासाठी सुरू आहेत. (Onion Subsidy) कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पीक पाहणी अहवालामध्ये कांदा पिकाची नोंद आपल्या 7/12 वर ( Land Record) असणे अशी अट घालण्यात आली होती.

या अटीमुळे अनेक शेतकरी अनुदानापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. याबाबत सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना विचारले असता, त्यावेळी अनुदानासाठी 7/12 वरती कांद्याची नोंद असणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राधाकृष्ण विखे पाटील सोलापूर मध्ये गेले असता त्यावेळी पत्रकार यांच्याशी त्यांनी संवाद साधला होता.

राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पिकाची नोंदणी सातबारा वरती नसलेल्या शेतकऱ्यांना Onion Subsidy अनुदान मिळणार नसल्याचे या पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केले. काल दिनांक 8 एप्रिल रोजी सोलापूरमध्ये पत्रकार परिषद मध्ये राधाकृष्ण विखे पाटील बोलत होते की, कांदा अनुदान वाटप करण्यामध्ये बोगसगिरी होण्याची जास्त शक्यता असल्यामुळे नियम अटी रद्द केल्यास या अनुदानाचा लाभ शेतकऱ्यांना ऐवजी व्यापारी व दलाल हेच घेतील अशी भीती यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली. Kanda Anudan

सातबारा वरती कांदा नोंद असणे आवश्यक

मागील वर्षांमध्ये कांद्याचे भाव खूप कमी झाले होते भाव कमी असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. सोलापूर मधील कृषी उत्पन्न बाजार समितीसह जिल्ह्यामधील 7 बाजार समितीमध्ये 1 ते 31 फेब्रुवारी या 2 महिन्यांमध्ये 63 लाख 55 हजार 180 क्विंटल कांद्याची विक्री झालेली आहे. या विक्रीमुळे जिल्ह्यामधील 1 लाख शेतकऱ्यांना 222 कोटी 43 लाख 15 हजार 100 रुपयाचे अनुदान (Onion Subsidy) देण्यात येणार आहे.

परंतु बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या 7/12 वर कांदा लागवडीची नोंद नाही. ज्या शेतकऱ्यांकडे कांदा विक्रीची पावती आहे असे शेतकरी अनुदानापासून वंचित राहणार आहेत. यामुळे 7/12 ( Land Record) वर कांदा पिकाची नोंद ही आट रद्द करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. याबाबत राधाकृष्ण विखे पाटील यांना विचारले असता, सातबारा वर कांदा पिकाची नोंदणी असल्याशिवाय अनुदान देता येणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले.

Onion Subsidy: कांदा अनुदान अर्ज डाउनलोड करा

कांदा अनुदानात फसवणूक होण्याची शक्यता

कांदा अनुदान Onion Subsidy वाटप करत असताना फसवणूक होण्याची शक्यता राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली आहे. कांदा अनुदानाचे नियम अटी या जर रद्द केल्यास शेतकऱ्यांना ऐवजी व्यापारी व दलालच कांदा अनुदानाचा फायदा घेतील असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले. यामुळे सातबारा वर कांदा नोंद असणे बंधनकारक आहे. जर तुम्ही नोंदणी न केल्यास तुम्ही सरकारचा शेतसारा बुडवत आहात असे राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.

Onion Subsidy: कांदा अनुदानासाठी या तारखेपर्यंत येथे करा अर्ज, जाणून घ्या सविस्तर माहिती 

2 thoughts on “Onion Subsidy: या शेतकऱ्यांना मिळणार नाही कांदा अनुदान – विखे पाटील”

Leave a Comment