Pik Vima 2022 – शेतकऱ्यांना मोठा दिलासा खरीप पिक विमा 2022 साठी 700 कोटीचा निधी मंजूर

Pik Vima 2022 : मित्रांनो खरीप पिक विमा 2022 च्या संदर्भातील एका अतिशय दिलासादायक महत्त्वाचे अपडेट आहे. यामुळे खरीप पिक विमा 2022 चा प्रश्न सुटण्यासाठी मदत होणार आहे.

Pik Vima 2022 पिक विमा साठी बऱ्याच साऱ्या जिल्ह्यांमध्ये आधीसूचना काढण्यात आले होत्या, आधी सूचना काढलेले जिल्ह्यामधील काही जिल्ह्यांमध्ये वाटप झाले होते तर काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अद्याप देखील पिक विमाचे (Crop Insurance) वाटप बाकी होते. याचप्रमाणे राज्यामध्ये जे क्लेम करण्यात आले आहे त्या क्लेमपैकी जवळजवळ 10 ते 12 लाख क्लेम केलेल्या शेतकऱ्यांचा पिक विमाचे अद्याप देखील वाटप बाकी होतं. अशा परिस्थितीमध्ये कृषी विभागाच्या माध्यमातून पाठपुरावा केला असता शेतकऱ्यांच्या माध्यमातून याच्यासाठी विचारणार केली असता, पिक विमा (Crop Insurance) कंपनीकडून राज्य शासनाचा केंद्र शासनाचा निधी अद्याप देखील वितरित झाला नसल्याबाबत ची माहिती देण्यात येत होती. या प्रश्नाला आता एक तोडगा निघालेला आहे.

13 जानेवारी 2023 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय घेऊन या योजनेकरता 724 कोटी 50 लाख पेक्षा जास्त निधी Pik Vima 2022 वितरित करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून या अगोदर सुद्धा 872 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली होती. त्यानंतर प्रतीक्षा लागली होती फक्त उर्वरित निधीची.

मित्रांनो याच उर्वरित हप्ता वितरित करण्यासाठी 13 जानेवारी 2023 रोजी एक शासन निर्णय घेऊन पिक विमा ज्या Pradhan Mantri Fasal Bima Yojana कंपन्यांच्या माध्यमातून ही योजना राबवली जात आहे अशा भारतीय कृषी विमा कंपनी (AIC), आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, बजाज अलीयांझ जनरल इन्शुरन्स कंपनी, एचडीएफसी एग्रो जनरल इन्शुरन्स कंपनी व युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी असे या पाच कंपन्यांच्या माध्यमातून जी पिक विमा योजना राबवली जाते या पाचही कंपन्यांना 724 कोटी रुपयाचा या निधीचे वितरण करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे.

महाराष्ट्र मध्ये क्लेम झालेले आधीसूचना काढलेले जे शेतकरी आहेत असे शेतकऱ्यांच्या पिक विमा Pik Vima 2022 वाटपासाठी पिक विमा Crop Insurance कंपनीच्या माध्यमातून साधारणपणे 24 ते 50 कोटी रुपये पेक्षा जास्त रक्कम वितरित करावे लागेल. अशा प्रकारची माहिती शासनाला दिलेली होती आणि याच पार्श्वभूमी पिक विमा कंपनीच्या माध्यमातून साधारणपणे 1500 ते 1600 कोटी रुपयांचा निधीचे वाटप करण्यात आले होते. अद्याप 500 ते 600 कोटीपेक्षा जास्त रुपयाच्या रकमेच्या शेतकऱ्यांना या ठिकाणी वाटप अपेक्षित होतं. याच पार्श्वभूमी वर या निधी वितरण झाल्यामुळे पिक विमा कंपनीकडे निधीची उपलब्धता झाल्यामुळे या शेतकऱ्यांना पिक विमा Crop Insurance मिळण्यासाठी मदत होईल अशी अपेक्षा आहे.

शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Pik Vima 2022 GR

Leave a Comment