PM Awas Yojana अंतर्गत सर्वांचे घराचे स्वप्न पूर्ण होणार, मोदी सरकारचा महत्वाचा निर्णय …!

PM Awas Yojana

देशातील गरीब, दुर्बल आर्थिक घटकातील लोकांना हक्काचा निवारा मिळावा, यासाठी केंद्र सरकारमार्फत ‘पीएम आवास योजना’ राबवली जाते.. विधवा, अनुसूचित जाती-जमाती (SC/ST)च्या लोकांनाही योजनेचा लाभ मिळतो. घराच्या बांधकामासाठी सबसिडी, तसेच पाणी, शौचालय, वीज आदी सुविधा या योजनेअंतर्गत दिल्या जातात.

 पीएम आवास योजने’च्या लाभार्थींसाठी महत्वाची बातमी आहे. मोदी सरकारने या योजनेला (PM Awas Yojana) दोन वर्षांसाठी मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार, आता या योजनेचा लाभ 31 डिसेंबर 2024 पर्यंत घेता येणार आहे.. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

122 लाख घरे मंजूर 

पीएम किसान योजनेअंतर्गत एकूण 122 लाख घरांना मंजुरी देण्यात आलीय.. पैकी 65 लाख घरांचे बांधकाम पूर्ण झालं असून, उर्वरित घरांचे बांधकाम लवकरच पूर्ण होईल.. तब्बल 40 लाख घरांचे प्रस्ताव उशिरा (योजनेच्या शेवटच्या दोन वर्षांत) राज्ये / केंद्रशासित प्रदेशांकडून पाठवण्यात आले.. त्यामुळे ही घरे पूर्ण करण्यासाठी आणखी दोन वर्षे लागणार असल्याने योजनेचा कालावधी 31 डिसेंबर 2024 पर्यंत वाढवल्याचे सांगण्यात आले.

हे पण वाचा : प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण घरकुल योजनेची लाभार्थ्यांची यादी ऑनलाईन कशी पहावी? 

पीएम आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारने उत्पन्नाचे 3 स्लॅब तयार केले आहेत. पहिली कॅटगरी म्हणजे, ज्या लोकांचे उत्पन्न 3 लाखांपेक्षा कमी आहे, दुसरी कॅटगरी म्हणजे ज्यांचे उत्पन्न 3 ते 6 लाखांच्या दरम्यान आहे. तर तिसरी  कॅटगरी म्हणजे ज्यांचे उत्पन्न 6 ते 12 लाखांच्या दरम्यान आहे.

घरांच्या बांधकामासाठी केंद्र सरकार लाभार्थ्यांना तीन हप्त्यांमध्ये पैसे देते. त्यातील पहिला हप्ता 50 हजार रुपये, दुसरा हप्ता 1.50 लाख रुपये, तर तिसरा हप्ता 2.50 लाख रुपयांचा आहे.

असा करा योजनेसाठी अर्ज

  • सर्वात आधी pmaymis.gov.in ला भेट द्या.
  • त्यानंतर ‘Citizen Assessment’ हा पर्याय निवडा.
  • नंतर तुमचा आधार क्रमांक टाकून ऑनलाइन फॉर्म भरा.
  • हा अर्ज सबमिट करा व त्याची प्रिंट काढून सोबत ठेवा.


Leave a Comment