PM Kisan- पी एम किसान ई केवायसी मध्ये या जिल्ह्याने मारली बाजी?

Pm Kisan Ekyc Top District


PM Kisan – केंद्र सरकारने पी एम किसान योजनेच्या केवायसी साठी मुदतवाढ दिली होती. पी एम किसान हि केंद्र सरकारची एक महत्त्वकांक्षी योजना आहे. (Pradhan Mantri Kisan Sanman Nidhi Yojana) प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांची ई केवायसी पूर्ण करण्याच्या प्रक्रियेत भंडारा जिल्ह्याने बाजी मारली, जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकवर आहे. त्यानंतर नाशिक द्वितीय आणि वाशिम तृतीय क्रमांकावर आहे हा विषय नेमका काय आहे तेच आपण पाहणार आहोत.

नंदुरबार जिल्हा सध्या सातव्या क्रमांकावर या प्रक्रियेत पुणे, नागपूर, ठाणे आधी जिल्हे बरेच मागे पडले असून रत्नागिरी जिल्हा शेवटच्या क्रमांकावर आहे. राज्यातील 1 कोटी 6 लाख 80 हजार 48 लाभार्थ्यांपैकी अध्यापही 33 लाख 41 हजार 826 लाभार्थ्यांची ई केवायसी बाकी आहे. प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजना (PM Kisan Ekyc) अंतर्गत निकषात बसणाऱ्या लाभार्थ्यांना वर्षाला 6 हजार रुपये प्राप्त होतात. या योजनेच्या असंख्य लाभार्थ्यांनी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांना पुढील लाभ प्राप्त होण्यासाठी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे बंधनकारक करण्यात आले. 

त्यासाठी 7 सप्टेंबर ही डेडलाईन म्हणजे अंतिम तारीख शासनाकडून देण्यात आली होती. मात्र हि तारीख वाढून आता १४ सप्टेंबर केली आहे. विहित मुदतीत ही केवायसी प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्या लाभार्थ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान ( PM Kisan Ekyc ) योजनेचा पुढील लाभ दिला जाणार नसल्याचं केंद्र सरकारने स्पष्ट केले. ज्या शेतकऱ्यांची केवायसी पूर्ण झालेली नाही असे शेतकरी पीएम किसान योजने पासून वंचित राहतील. म्हणून केवायसीला मुदतवाड द्यावी अशी मागणी ही शेतकरी आणि शेतकरी गट यांच्याकडून करण्यात आलेली आहे. 


हे पण वाचा – Soybean Rate: सोयाबीन कधी विकायचं ते कसं ठरवाल?


तुम्हाला आमची ही माहिती कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा..

Leave a Comment