PM Kisan Maandhan Yojana : आता शेतकऱ्यांना दरमहा मिळणार 3,000 रुपये पेन्शन, कसे ते पहा


PM Kisan Maandhan Yojana


PM Kisan Maandhan Yojana :  केंद्र सरकारकडून देशातील शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या जातात. या योजना मधून एक योजनेचे नाव ( PM Kisan Maandhan Yojanaपीएम किसान मानधन योजना आहे.


वृद्ध शेतकऱ्यांसाठीची ही पेन्शन योजना आहे. शेतकऱ्यांना वृद्धापकाळात आर्थिक मदत देण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या या योजनेचा फायदा शेतकऱ्यांना मिळणार आहे.

या योजनेंतर्गत 60 वर्षांनंतर शेतकऱ्यांना दरमहा 3 हजार रुपये पेन्शन मिळणार आहे. यामुळे वयाच्या 60 वर्षांनंतर ज्यांना शेतीची कामे करता येत नाहीत अशा शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळणार आहे.


PM Kisan Maandhan Yojana विषयी जाणून घ्या


देशातील शेतकऱ्यांना वृद्धापकाळा मध्ये पेन्शन देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत शेतकर्‍यांना वयाच्या 60 वर्षांनंतर दर महिन्याला 3000 हजार रु. व 36,000 रुपये वार्षिक पेन्शन दिली जाते.


या योजनेचा लाभ कसा घ्यावा ?


PM Kisan Maandhan Yojana पी एम किसान मानधन योजनाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. 18 ते 40 वयोगटातील शेतकरी यासाठी अर्ज करू शकतात. ऑनलाईन अर्ज केल्या नंतर, शेतकऱ्यांना त्यांच्या वयानुसार प्रीमियम म्हणून दरमहा काही पैसे द्यावे लागतील. शेतकऱ्यांच्या वयानुसार ही रक्कम निश्चित केली जाते. यामध्ये शेतकऱ्यांना दरमहा 55 ते 200 रुपये पर्यंत प्रीमिअम जमा करावे लागतात.


अशा प्रकारे करा रजिस्ट्रेशन

PM Kisan Maandhan Yojana मध्ये रजिस्ट्रेशन करण्यासाठी जवळच्या CSC केंद्राला भेट द्यावी लागेल. या ठिकाणी आपले वार्षिक उत्पन्न आणि आपल्या जमिनीशी निगडीत सर्व कागदपत्रे सादर करावी लागतील. यासोबतच ज्या बँक खात्यात पैसे हवे आहेत त्या खात्याची माहिती द्यावी लागेल. ही सर्व माहिती दिल्यानंतर एक अर्ज मिळेल जो आधार कार्डशी लिंक करावा लागेल. अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आपल्याला पेन्शन क्रमांक आणि पेन्शन कार्ड दिले जाईल.

अशा प्रकारे करा ऑनलाइन अर्ज


PM Kisan Maandhan Yojana पी एम किसान मानधन योजना मध्ये सहभागी होण्यासाठी आपण ऑनलाइन अर्ज पण करू शकतात. या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइट https://maandhan.in ला भेट देऊन अर्ज करावा. पी एम किसान मानधन M Kisan Maandhan Yojana या योजनेचा फॉर्म भरावा लागेल आणि सर्व आवश्यक कागदपत्रांची माहिती द्यावी लागेल. त्यानंतर फॉर्म जमा करावा लागेल. प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर, पेन्शन क्रमांक आणि पेन्शन कार्ड मिळेल. पी एम किसान मानधन योजना (M Kisan Maandhan Yojana) अधिक माहितीसाठी, तुम्ही 1800-267 6888 या टोल फ्री क्रमांकावर पण संपर्क साधा.


अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://maandhan.in/


Leave a Comment