Pm Kisan: या शेतकऱ्याच्या खात्यावर येणार 4000 रुपये, पाहा कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार लाभ?

Pm Kisan पंतप्रधान किसान योजनेचा तेरावा हप्ता २७ फेब्रुवारीला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला. मात्र, अजूनही काही शेतकरी आहेत ज्यांच्या खात्यात पैसे आलेले नाहीत.

Pm Kisan जर तुम्ही EKYC केले असेल आणि तुम्ही लाभार्थी असाल तर काळजी करण्याची गरज नाही, हे पैसे सरकारकडून तुमच्या खात्यात जमा केले जातील. नोंदणी करताना तुमच्याकडून काही चुका झाल्या असतील किंवा तुम्ही चुकीचे बँक खाते निवडले असेल, तरीही तुमचा हप्ता येणार नाही किंवा थांबवला जाणार नाही. तुम्ही pmkisan.gov.in या वेबसाइटला भेट देऊन हे तपासू शकता. त्याशिवाय एक टोल फ्री क्रमांक आहे.

4000 रुपये कसे आणि कशाचे मिळणार?

योजनेचा भाग होण्यासाठी शेतकऱ्याला नोंदणी करावी लागेल. अर्ज करताना तुम्ही पीएम किसान Pm Kisan पोर्टलवर राज्य/केंद्रशासित प्रदेश सरकारचे नाव अपलोड केले असेल, तर तुमच्या खात्यात हप्ते म्हणून 2000 जमा केले जातील. ज्या शेतकऱ्यांचे दोन हप्ते अडकले आहेत. त्यांना दोन्ही हप्त्याचे मिळून 4 हजार रुपये येणार आहेत.

12 व्या हप्त्याचे 2 आणि 13 व्या हप्त्याचे दोन हजार रुपये येणार आहेत. फॉर्म भरताना काही चूक झाली असेल तर ती लवकरात लवकर दुरुस्त करावी लागेल. त्यामुळे तुमच्या खात्यावर पूर्ण हप्ता जमा होईल. कोणत्याही कारणास्तव शेतकऱ्याचे नाव शासनाकडून नाकारले गेले तर तो पात्र ठरणार नाही.

Pm Kisan कसं करायचं स्टेटस चेक?

वेबसाइटवर गेल्यानंतर उजव्या बाजूला फार्मर्स कॉर्नरवर क्लिक करा. यानंतर, लाभार्थी स्थिती पर्यायावर क्लिक करा, त्यानंतर एक नवीन पेज सुरू होईल. आता तुमचा आधार क्रमांक, मोबाईल नंबर टाका. यानंतर तुम्हाला तुमच्या स्टेटसची संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment