PM-Kisan Samman Nidhi – किसान सन्माननिधी योजनेत 1 एप्रिल पासून वाढ, वार्षिक 6 हजार ऐवजी येणार एवढी रक्कम?

केंद्र सरकार शेतकऱ्यांना लवकरच मोठी खुशखबर देणार आहे.

चालू अर्थसंकल्पामध्ये केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर देऊ शकते. आपल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची रक्कम वाढण्याची घोषणा लवकरच करू शकतात, असा दावा सूत्रामार्फत केला जात आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Samman Nidhi Yojana) या योजनेअंतर्गत दरवर्षी लाभार्थ्याला सहा हजार रुपयांचा लाभ मिळतो. यामध्ये लवकरच वाढ होण्याची अपेक्षा असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. शेतकऱ्यांना अवेळी पाऊस तसेच अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक टंचाई भासते. या कारणामुळे सरकार शेतकऱ्यांसाठी हा निर्णय घेऊ शकते.

3 हपत्या ऐवजी शेतकऱ्यांना मिळणार 4 हप्ते

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (pm kisan samman nidhi) योजनेमध्ये आतापर्यंत चार महिन्याला एक हप्ता असे वार्षिक तीन हप्ते शेतकऱ्यांना दिले जातात त्या ऐवजी आता ही रक्कम एक एप्रिल पासून वाढवण्यात येणार आहे. म्हणजेच शेतकऱ्यांना आता 3 महिन्याला 2 हजार रुपयांचा एक हप्ता दिला जाऊ शकतो असेही सांगण्यात येत आहे. म्हणजेच या PM-Kisan Samman Nidhi योजनेअंतर्गत आता शेतकऱ्यांना तिमाही 2000 रुपये दिले जातील.

चालू स्थितीवर सध्या शेतकऱ्यांना 4 महिन्याला 2000 रुपये त्यांच्या खात्यावरती वर्ग केले जातात. परंतु यामध्ये बदल झाल्यास शेतकऱ्यांना दर 3 महिन्याला 2000 रुपये दिले जातील. म्हणजेच शेतकऱ्यांना आता वार्षिक 6000 रुपये ऐवजी 8000 रुपये वार्षिक त्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM-Kisan Samman Nidhi Yojana) तेरावा हप्ता अजूनही प्रलंबित आहे परंतु 13 हप्ता (pm kisan samman nidhi 13 kist) हा जानेवारी 2023 मध्ये येणे अपेक्षित आहे.


प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची रक्कम वाढवल्यास जानेवारीमध्ये आता पडल्यानंतरही शेतकऱ्यांना एप्रिलमध्ये त्यांच्या खात्यात पुन्हा 2000 रुपयांचा हप्ता येणे अपेक्षित राहील.

Leave a Comment