Pm Kisan Yojana 13th Installment पीएम किसान सन्मान निधी योजनेचा १३ हप्ता कधी येणार

जॉईन व्हॉट्सॲप ग्रुप

Pm Kisan Yojana प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये केंद्र सरकार दरवर्षाला सहा हजार रुपये जमा करते. हे सहा हजार रुपये प्रत्येक चार महिन्याला दोन हजार रुपये प्रमाणे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जातात हे आपल्याला माहीतच असेल. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे आतापर्यंत 12 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत.

परंतु आता सर्व शेतकरी तेरावा हप्ता कधी कधी खात्यामध्ये जमा होणार आहे याची वाट पाहत आहे. परंतु शेतकरी बांधवांना लवकरच तेरावा हप्ता शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होणार आहे याच्याच विषय सविस्तर माहिती आपण आज या टॉपिक मध्ये पाहणार आहोत.

कधी येणार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा तेरावा हप्ता Pm Kisan Yojana 13th Installment

Pm Kisan Yojana 13th Installment शेतकरी बांधवांनो प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही शेतकऱ्यांसाठी राबवलेली एक महत्त्वाची योजना आहे. मित्रांनो जर आपण तेरावा हप्त्याची वाट पाहत असाल, तर आपण आपली ई केवायसी सीएससी केंद्र मार्फत केली आहे की नाही याची खात्री करून घ्यावी. तसेच जर आपली इकेवायसी झाली असेल तर आपला खाते क्रमांक हे आधारशी संलग्न आहे की नाही हे पण तपासून पहावे. जर या दोन्ही बाबी आपल्या पूर्ण नसतील तर आपल्याला तेरावा हप्ता हा आपल्या बँक खात्यामध्ये जमा होणार नाही. पी एम किसान सन्मान निधी योजनेचा 13 हप्ता हा जानेवारी महिन्यामध्ये येणे अपेक्षित होते परंतु हा हप्ता 15 फेब्रुवारी 2023 रोजी सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे.

परंतु मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी आपले बँक खाते आधारशी संलग्न केले नाही अशा शेतकऱ्यांना इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमध्ये खाते उघडण्यासाठी सूचनाही जिल्हा पातळीवरती दिलेले आहेत. त्यामुळे 2 फेब्रुवारीपासून आपल्या गावातील पोस्टमन किंवा पोस्टमास्टर यांच्याकडे जाऊन पोस्ट ऑफिस मध्ये जिल्हा पातळीवरून तसेच तहसील कार्यालय मार्फत अपात्र किंवा इकेवायसी तसेच आधार संलग्न न केलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या दिलेले आहेत. तरी शेतकरी बांधवांनी आपल्या गावातील पोस्टमन कडे जाऊन या यादीमध्ये आपले नाव आहे की नाही हे तपासून पाहिजे आहे जर त्या यादीमध्ये नाव असेल तर त्या ठिकाणी जी कागदपत्रे लागतात ती कागदपत्रे देऊन आपलं इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमध्ये खाते उघडावे. Pm Kisan Yojana 13th Installment

हे खाते उघडल्यानंतरच आपल्याला तेरावा हप्ता हा 15 फेब्रुवारी रोजी आपल्या खात्यामध्ये जमा होईल. Pm Kisan Yojana 13th Installment पोस्ट पेमेंट बँकेचे खाते उघडण्याची मोहीम ही 2 फेब्रुवारीपासून ते 12 फेब्रुवारी पर्यंत सुरू राहणार आहे याचीही काळजी शेतकऱ्यांनी घ्यायची आहे. तेरावा हप्ताह 15 फेब्रुवारी 2023 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे अशी माहिती वरिष्ठ शाखा प्रबंधक इंडिया पोस्ट पेमेंट बँक उस्मानाबाद मधील चंद्रकांत झेंडे यांनी दिलेली आहे. ही माहिती लोकमतच्या पेपरमध्येही दिली गेली होती त्याचे कात्रण खालील प्रमाणे

Shettale Yojana 2023 : शेततळे अनुदान योजना सर्व माहिती, अनुदान, कागदपत्र, ऑनलाईन अर्ज पहा सर्व माहिती.

तर मित्रांनो वरील माहिती नक्कीच आपल्याला आवडली असेल अशाच माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा तसेच इतर शेतकऱ्यांना ही माहिती शेअर करण्यास विसरू नका.

Pm Kisan Yojana 13th Installment
जॉईन व्हॉट्सॲप ग्रुप

1 thought on “Pm Kisan Yojana 13th Installment पीएम किसान सन्मान निधी योजनेचा १३ हप्ता कधी येणार”

Leave a Comment