Pm Kisan Yojana: पी एम किसान योजनेचा 14 हप्ता कधी येणार? केवायसी पूर्ण केली का?

Pm Kisan काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान योजना (Pm Kisan Yojana) चा 13 हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला आहे. तेरावा हप्त जमा केल्यानंतर शेतकऱ्यांना आता 14 व्या हप्त्याची प्रतीक्षा लागलेली आहे. कारण की 13 हप्ता हा खूप उशिरा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग केला होता.

शेतकऱ्यांच्या खात्यावरती 14 वा हप्ता जमा करण्याची केंद्र सर्वकारकडून पूर्ण तयारी झालेली आहे. त्यामुळे लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 14 हप्ता जमा केला जाणार आहे. 2019 च्या निवडणुकीच्या अगोदरच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (Pm Kisan Yojana) योजनेचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला. प्रधानमंत्री किसान सन्मान योजना अंतर्गत दरवर्षी केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 6 हजार रुपये जमा करत असते, हे प्रत्येकी 4 महिन्याला 2 हजार रुपये प्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होतात.

यावर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी केंद्र सरकार बरोबर राज्य सरकार देखील शेतकऱ्यांना आता सहा हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात असल्याची घोषणा केली त्यासाठी निधीही वितरित केला आहे. यामुळे आता शेतकऱ्यांना वार्षिक 12 हजार रुपये मिळणार आहेत. केंद्र शासनाने 27 फेब्रुवारी रोजी प्रधानमंत्री किसान सन्मान योजना तेरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला होता. केंद्र सरकारने 16000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खाते मध्ये जमा केले असल्याचा दावा केलेला आहे.

प्रधानमंत्री किसान योजनेचा चौदावा हप्ता (PM Kisan Yojana 14th Installment Date) खात्यामध्ये जमा होण्यासाठी शेतकऱ्यांना केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक आहे. जर शेतकऱ्यांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण केले नाही तर 14 वा हफ्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार नाही.

PM Kisan: योजनेचा हप्ता खात्यात आला नाही? लगेच करा हे काम

अशी करा पीएम किसान योजनेची केवायसी

pm kisan yojana kyc प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत संकेतस्थळ https://pmkisan.gov.in/ आपल्या मोबाईल अथवा कॉम्प्युटरमध्ये ओपन करा. त्या ठिकाणी उजव्या बाजूला ekyc चा हा एक ऑप्शन त्या ठिकाणी आपल्याला दिसेल. त्यावर क्लिक करून आपला मोबाईल क्रमांक व आधार क्रमांक त्या ठिकाणी टाकायचा आहे. मोबाईल नंबर व आधार क्रमांक टाकल्यानंतर आपल्याला एक ओटीपी येईल तो त्या ठिकाणी टाकून आपली केवायसी प्रक्रिया पूर्ण करायची आहे. जर आपण ही केवायसी प्रक्रिया पूर्ण केले नाही तर आपल्याला 14 वा हप्ता मिळणार नाही. आपली केवायसी करण्यासाठी आपल्या आधारला आपला मोबाईल क्रमांक जोडलेला असणे आवश्यक आहे.

1 thought on “Pm Kisan Yojana: पी एम किसान योजनेचा 14 हप्ता कधी येणार? केवायसी पूर्ण केली का?”

Leave a Comment