PM Kisan Yojana: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा या पध्दतीने करा अचूक अर्ज,100% मिळणार लाभ

PM Kisan Yojana: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून दरवर्षी शेतकऱ्यांना सहा हजार रुपये दिले जातात. हे सहा हजार रुपये तीन टप्प्यांमध्ये दोन हजार रुपये प्रमाणे प्रत्येकी चार महिन्याला दिले जातात. यासाठी तहसील कार्यालय मार्फत अर्ज करणे खूप महत्वाचे आहे. कारण जिल्हास्तरावर उपजिल्हाधिकारी व राज्यामधील कृषी आयुक्तांकडून यासाठी मान्यता मिळाल्यावर या योजनेचा लगेच लाभ सुरू होईल.

राज्यामधील १ कोटी पेक्षा जास्त पात्र शेतकऱ्यांना दर साली ६००० रुपये हे ४ महिन्याच्या अंतरावर २००० रुपय प्रमाणे या किसान सन्मान निधी PM Kisan Yojana योजने अंतर्गत दिले जातात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी १ फेब्रुवारी २०१९ च्या अगोदर जमीन नावावर असणे महत्वाचे आहे. त्या नंतर जमीन घेतलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही.

बऱ्याच शेतकऱ्यांना या pm Kisan Yojana बद्दल माहिती नव्हती त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी उशीर केला. अजून पण बरेच शेतकरी अर्ज करीत आहेत. बहुतांश शेतकऱ्यांनी आपले सरकार सेवा केंद्र ( CSC) मधून किंवा स्वतः आपल्या मोबाईल द्वारे अर्ज केले आहेत. पण या द्वारे अर्ज केल्या नंतर लाभ घेण्यासाठी खूप वाट पाहावी लागते.

जर आपण स्वतः मोबाईल वरून किंवा CSC सेंटर वरून अर्ज केला असेल तर त्या अर्जाची तपासणी ही तलाठी कार्यालय मार्फत होते. ही पडताळणी झाल्या नंतर तो अर्ज वरिष्ठ कार्यालय कडे पाठविला जातो. परंतु जर आपण तहसील कार्यालय मार्फत अर्ज केला तर तो अर्ज लगेच काही दिवसा मध्ये जिल्हास्तरावर पुढे पाठविला जातो. त्यामुळे ही गोष्ट लक्षात घेता शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयातून pm Kisan Yojana प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनासाठी अर्ज करावा.

Pm Kisan Yojana प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना लाभ कसा घ्यावा?

१ फेब्रुवारी २०१९ पूर्वी नावे जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांनी आपला ७१२, ८अ, रेशन कार्ड आणि आधार कार्ड, बँक पासबुक घेऊन तहसील कार्यालय मध्ये pm Kisan Yojana चे काम पाहणाऱ्या अधिकाऱ्याकडे जमा करावीत.तहसील कार्यालय मार्फत pm Kisan Yojana ची नोंदणी केली जाते. तहसील, जिल्हा आणि त्यानंतर राज्य पातळीवर यासाठी मंजुरी मिळाली की लगेच शेतकऱ्याला याचा लाभ सुरू होतो.

Pm Kisan Yojana: पी एम किसान योजनेचा 14 हप्ता कधी येणार? केवायसी पूर्ण केली का?

आपले बँक खाते आधार शी सलग्न असणे आवश्यक

Pm Kisan Yojana प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी आपले बँक खात्याला आधार कार्ड लिंक असणे खूप महत्वाचे आहे. राज्यामध्ये १४ लाख ३२ हजार शेतकऱ्यांनी अजूनही आपल्या बँक खात्याला आधार लिंक केलेले नाही. या कारणामुळे त्या शेतकऱ्यांना १३ हप्ता मिळणार नाही. अशा शेतकऱ्यांच्या यद्याही गाव निहाय तलाठी कार्यालय मार्फत दिल्या आहेत.

शेतकऱ्यांना बँक खात्याला आधार लिंक करण्याची सवलत १ ते १२ फेब्रुवारी पर्यंत गावा मधील पोस्ट ऑफिस मार्फत सुरू असणार आहे. आधार कार्ड, मोबाईल नंबर या आधारे भारतीय पोस्ट ऑफिस महणजेच इंडिया पोस्ट पेमेंट बँक मार्फत पोस्टमन मार्फत आपले खाते उघडावे. त्यानंतर लगेच ४८ तासात आपले बँक खात्याला आधार कार्ड लिंक होईल. PM Kisan Yojana