Pm Kisan Yojana: पीएम किसान योजनेचे हाप्ते मिळाले नसेल तर येथे करा तक्रार.

Pm Kisan Yojana केंद्र शासनाकडून शेतकऱ्यांसाठी खूप सारे योजना राबवल्या जातात यामधीलच एक योजना म्हणजेच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना 27 फेब्रुवारी 2023 रोजी या योजनेचा तेरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आला.

केंद्र शासनाच्या या महत्त्वाच्या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 16,400 कोटी रुपयांची रक्कम वितरित करण्यात आलेली आहे जर आपणही या योजनेचे लाभार्थ्यांचा आणि आपल्या खात्यामध्ये या योजनेचे पैसे जमा झाले नसतील तर काळजी करण्याची गरज नाही.

प्रधानमंत्री किसान सन्मान योजना Pm Kisan Yojana: अंतर्गत आपल्याला लाभ मिळाला नसेल तर त्याबाबत आपल्याला तक्रार दाखल करता येणार आहे. यासाठी शेतकरी बांधवांनी हेल्पलाइन नंबर ( Pm Kisan Yojana HelpLine Number) वर कॉल करून आपल्या तक्रार नोंदवू शकता. तसेच या योजने संबंधित शेतकऱ्यांना कोणतीही माहिती हवी असेल किंवा आपल्या काही अडचणी असतील तर आपण pm kisan helpline number maharashtra हेल्पलाइन नंबर आहे, त्या नंबर वरती कॉल करून आपली तक्रार मांडू शकता. सोमवार ते शुक्रवार या वारांमध्ये शेतकऱ्यांना आपली तक्रार करता येईल जर आपल्याला या योजनेचा बारावा किंवा तेरावा हप्ता बाबत काही तक्रार असेल तर आपण पीएम किसान योजनेचा खालील दिलेल्या हेल्पलाइन नंबर वरती कॉल करून तक्रार करू शकता.

PM Kisan Yojana चा हेल्पलाइन नंबर – 155261 किंवा 1800115526 (टोल फ्री) किंवा 011-23381092 (pm kisan toll free number) वर संपर्क साधता येईल किंवा [email protected] या ईमेल आयडी वर देखील आपली अडचण मेल करू शकता. (pm kisan helpline number maharashtra)

PM Kisan Yojana: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा या पध्दतीने करा अचूक अर्ज,100% मिळणार लाभ

Pm Kisan Yojana आपल्याला हप्ता मिळाला की नाही अशा प्रकारे तपासा

  • शेतकरी बांधवांनी सर्वप्रथम पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर म्हणजेच https://pmkisan.gov.in/ या संकेतस्थळावर जावे.
  • या संकेतस्थळावर गेल्यानंतर फार्मर कॉर्नर Farmer Corner हा एक पर्याय आपल्यासमोर दिसेल त्यावर क्लिक करावे
  • त्यानंतर आपल्याला Beneficiary Status हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करावे.
  • त्यानंतर आपल्यासमोर एक नवीन पेज उघडेल येथे आपला आधार क्रमांक किंवा बँक खाते क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक हा पर्याय निवडून काही विचारलेला तपशील भरायचा आहे आणि गेट डाटा या पर्यायावर क्लिक करून आपण आपल्या हप्त्याचे स्टेटस बघू शकता.

2 thoughts on “Pm Kisan Yojana: पीएम किसान योजनेचे हाप्ते मिळाले नसेल तर येथे करा तक्रार.”

Leave a Comment