Pm Kisan Yojana : पीएम सन्मान निधी योजने च्या अपात्र लाभार्थ्यावर चालणार न्यायालयामध्ये खटले

Pm Kisan Yojana : पीएम सन्मान निधी योजने च्या अपात्र लाभार्थ्यावर चालणार न्यायालयामध्ये खटले

PM Kisan Yojana

शेतकऱ्यांना शेती करताना शासनाकडून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (Pm Kisan Yojana) योजनेअंतर्गत दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात. हे सहा हजार रुपये प्रत्येक चार महिन्याला दोन हजार रुपये प्रमाणे दिले जातात. शेतकऱ्यांना अडचणीच्या काळामध्ये शासनाकडून मदत मिळावी या उद्देशाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (Pm Kisan Yojana) सुरू करण्यात आली.

परंतु या योजनेमध्ये श्रीमंत तसेच टॅक्स भरणाऱ्या शेतकऱ्यांचा (Pm Kisan tax Pay Farmer) देखील समावेश झाल्यामुळे इतर शेतकऱ्यावर याचा खूप मोठा दुष्परिणाम झाला आहे. त्यामुळे आता अशा अपात्र आणि टॅक्स भरणाऱ्या शेतकऱ्यांवर जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून न्यायालयात खटले चालवण्यात येणार आहेत.

याच्यासाठी तालुका निहाय तसेच गाव निहाय प्रक्रिया देखील सुरू आहे यामध्ये महाराष्ट्रातील भरपूर असे कर भरणारे शेतकरी यांचा समावेश आहे.

गेल्या बऱ्याच वर्षापासून शेतकरी नैसर्गिक आपत्ती व नापिकी या संकटापासून त्रस्त आहे. शेतकऱ्यांना या योजनेतून शासनाकडून मदतीचा हात मिळावा या हेतूने पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना केंद्र शासनाने मागील काही दिवसांपासून सुरू केली आहे. या योजनेमध्ये पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यास तीन हप्त्यांमध्ये प्रत्येकी दोन हजार रुपये याप्रमाणे वर्षाला सहा हजार रुपये असे केंद्र सरकारकडून त्यांच्या खात्यावरती जमा केले जातात.

परंतु प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ कर भरणाऱ्या तसेच जास्तीत जमीन असलेल्या शेतकऱ्यांनी लाभ घेतल्यामुळे हे सर्व शेतकरी आता प्रशासनाच्या रडारवर आली आहेत. त्यामुळे सरकार आता अशा शेतकऱ्यांना अपात्र ठरवून त्यांना नोटीस पाठवायला देखील सुरू केले आहेत आणि संबंधित शेतकऱ्याकडून रक्कम परत वापस घेण्याची प्रक्रिया देखील सुरू आहे. Pm Kisan Yojana

PM Kisan Yojana: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा या पध्दतीने करा अचूक अर्ज,100% मिळणार लाभ

Pm Kisan Yojana: अशा पाठविल्या जातील अपात्र शेतकऱ्यांना नोटीसा

Pm Kisan Yojana प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून तालुका निहाय तहसीलदारांना त्यांच्या भागातील अपात्र शेतकऱ्यांच्या नावाने नुकत्याच काही दिवसापूर्वी मेलद्वारे नोटीसा पाठवण्यात आले आहेत. त्या नोटिसाची प्रिंट काढून त्यावरती सल्लागार सेवा प्राधिकरणाची सही व शिक्का घेऊन त्या नोटीसा तहसीलदार मार्फत संबंधित अपात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना तलाठ्याच्या माध्यमातून लवकरच देण्यात येणार आहेत. त्यामुळे अपात्र असणारे शेतकरी प्रशासनाच्या रडारवर आली आहेत आणि याबाबतची प्रकरणे आता न्यायालय मध्ये चालणार आहेत याच्या अंमलबजावणीचे निर्देश जिल्हा प्रशासनाने नुकतेच जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना उमेदवारी दिली आहेत.

Pm Kisan Yojana : परभणी जिल्ह्यातील कर भरणाऱ्या शेतक-यांची संख्या

  • मानवत – 484
  • सोनपेठ – 491
  • पालम – 537
  • पाथरी – 651
  • पूर्णा – 677
  • गंगाखेड – 733
  • सेलू – 952
  • परभणी – 1170
  • जिंतूर – 1219

PM Kisan Yojana शेतकऱ्यांकडून वसूल होणारी रक्कम

तालुका रक्कम


गंगाखेड 100.8

जिंतूर 148.62

मानवत 66.24

पालम 77. 4

परभणी 155.92

पाथरी 95.44

सेलू 125.3

पूर्णा 92.84

सोनपेठ 71.8


एकूण रक्कम लाखात 933.3

2 thoughts on “Pm Kisan Yojana : पीएम सन्मान निधी योजने च्या अपात्र लाभार्थ्यावर चालणार न्यायालयामध्ये खटले”

Leave a Comment