PM Kisan: योजनेचा हप्ता खात्यात आला नाही? लगेच करा हे काम

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा (PM Kisan Yojana) 13 वा हप्ता येऊन 19 दिवस झाले आहेत. शेतकऱ्यांच्या खात्यावर 16 हजार कोटी रुपये या एवढी रक्कम जमा करण्यात आले आहेत.

मात्र बऱ्याच शेतकऱ्यांना १३ वा हप्ता आत्तपर्यंत मिळू शकलेला नाही. १३ वा हप्ता जमा करण्यापूर्वी केंद्र सरकारे अपात्र शेतकऱ्यांची यादी करून त्यांना योजनेतून काढून टाकण्याचा निर्णय घेतला होता. (pm Kisan Yojana) मात्र अनेक शेतकऱ्यांना कागदपत्रांची योग्य पूर्तता न झाल्याने १३ वा हप्ता मिळू शकलेला नाही.

आज आम्ही तुम्हाला १३ वा हप्ता मिळाला नसेल तर काय करायचे याबाबत माहिती देणार आहोत. पीएम किसान योजनेसाठी अर्ज करताना बँक खाते, आधार क्रमांकाची अचूक माहिती न भरल्यामुळे तुमचे पैसे जमा होण्यास व्यत्यय येण्याची शक्यता असते. तुम्ही भरलेली माहिती बरोबर आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी आम्ही खाली दिलेल्या स्टेप्स फॉलोअ करा. तसेच जर माहिती भरताना तुमच्याकडून काही चूक झाली असल्यास ती दुरुस्त करा. माहिती दुरुस्त केल्यानंतर तुमची अडकलेली रक्कम एक आठवड्यामध्ये शेतकऱ्यांना हस्तांतरित केली जाते.

Pm Kisan toll-free number

लाभार्थी यादीत सामील झाल्यानंतरही, 13व्या हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यात पोहोचले नसल्यास, तुम्ही [email protected] या ईमेल आयडीवर संपर्क साधू शकता. तुम्ही पीएम किसान योजनेच्या हेल्पलाइन क्रमांक- 155261 किंवा 1800115526 (टोल फ्री) किंवा 011-23381092 वर संपर्क साधू शकता. तुमच्या सर्व समस्या दूर होतील.

1 thought on “PM Kisan: योजनेचा हप्ता खात्यात आला नाही? लगेच करा हे काम”

Leave a Comment