Pocra Yojana 2022: पोकरा योजना अनुदान वितरीत, लवकरच होणार खात्यात जमा ! पहा शासन निर्णयपोकरा योजने अंतर्गत (Pocra Yojana 2022) अनुदानासाठी अर्ज केलेल्या पात्र झालेल्या परंतु अध्याप देखील अनुदानाचा वितरण न झालेल्या राज्यातील हजारो शेतकऱ्यांसाठी दिलासा दायक महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय दि. 4 ऑक्टोबर 2022 रोजी घेण्यात आलेला आहे. ज्यामुळे पोखरा योजने करता सन 2022-23 या वर्षाकरिता 200 कोटी रुपये निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे.

 मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय हा घेण्यात आलेला आहे. कारण आपण जर पाहिलं तर पोखरा योजनेच्या अंतर्गत सन  2022-23 या वर्षाकरिता एकूण 421 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली होती. ज्याच्या पैकी 407 कोटी रुपयांचा निधी यापूर्वीच वितरित करण्यात आलेल्या आहे आणि तो खर्चही झालेला आहे. त्याच्यामुळे आता उर्वरित निधी वितरित होणार की, याच्यासाठी वाढीव निधीची तरतूद होणार अशा प्रकारचे प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. 


बऱ्याच लाभार्थ्यांनी अर्ज केले होते ते पात्रही झाले होते त्यांना अद्याप देखील अनुदानाचा हिस्सा वितरण झालेलं नव्हतं ते अनुदानासाठी कृषी कार्यालयाचे हेलपाटे मारत होते. अशा प्रकारचे शेतकऱ्यांना या शासन निर्णयाच्या (Pocra Yojana) माध्यमातून मोठा दिलासा मिळणार आहे.

याच संदर्भातील हा 4 ऑक्टोबर 2022 रोजी चा शासन निर्णय घेण्यात आला आहे तो आपण खाली शेवटी  दिलेल्या लिंक वरून डाउनलोड करून पाहू शकता.

सन 2022-23 मध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पासाठी ( Pocra Yojana 2022 Gr) रुपये 200 कोटी निधी वितरित करण्याबाबत ज्याच्यामध्ये आपण पाहू शकता हवामान बदलास संवेदनशील असलेले विदर्भ आणि  मराठवाड्यातील एकूण 5142 गावांमध्ये ही योजना राबवली जाते. ज्याच्यामध्ये फेब्रुवारी 2022 मध्ये नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यामधील 62 गावांचा समावेश करण्यात आलेला आहे. तसेच एकूण या योजने करता सन 2022-23 मध्ये 421.86 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली होती. ज्याच्या पैकी 407.56 कोटी एवढा निधी खर्च पडलेला आहे. आणि याच निधी करता अतिरिक्त हा 200 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. 

ज्याच्यामध्ये आपण पाहू शकता या योजने करता बाह्य हिस्सा 140 कोटी रुपये आणि राज्य शासनाच्या हिस्साचा 60 कोटी रुपये, असे 200 कोटी रुपये निधी या योजने करतात सन 2022-23 करता वितरीत  करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे.

त्याच्यामुळे या योजने अंतर्गत पात्र झालेल्या परंतु अद्याप अनुदान न मिळालेल्या, याचबरोबर नव्याने पात्र होणाऱ्या लाभार्थ्यांना अनुदान वितरणासाठी या निधीची खूप मोठे मदत होणार आहे.


अशा प्रकारचे हे पोखरा योजने संर्भातील महत्वाची माहिती होती.


हे पण वाचा: Irrigation Scheme : ठिबक सिंचन योजनेचा कोणत्या राज्यांना निधीचा हप्ता मंजूर ?


वरील पोखरा संदर्भातील शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

शासन निर्णय 

1 thought on “Pocra Yojana 2022: पोकरा योजना अनुदान वितरीत, लवकरच होणार खात्यात जमा ! पहा शासन निर्णय”

Leave a Comment