Post Office Scheme: पोस्ट ऑफिस योजना, फक्त व्याजातून 2 लाख रुपये कमवा, जाणून घ्या योजनेविषयी सविस्तर माहिती

Post Office Scheme: तुम्हाला जर गुंतवणूक करायची असेल तर पोस्ट ऑफिस ची ही योजना तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय असू शकते जाणून घेऊया सविस्तर माहिती.

Post Office Scheme: तुम्ही तुमच्या कमावलेल्या कष्टाच्या पैशासाठी सुरक्षित आणि विना टेन्शन गुंतवणुकीसाठी पर्याय शोधत असाल आणि तुम्हाला खात्रीपूरक परतावा मिळवायचा असेल तर पोस्ट ऑफिस ची ही योजना तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. पोस्ट ऑफिसच्या बऱ्याच साऱ्या योजना आहेत विशेष म्हणजे महिला आणि ज्येष्ठ करिता अनेक योजना पोस्ट ऑफिस मार्फत राबविल्या जातात. यामध्ये चांगला परतावा देखील आपल्याला मिळतो.

अशीच एक पोस्ट ऑफिस ची योजना म्हणजे ज्येष्ठ नागरिक बचत योजना ( Post Office Scheme SCSS) या पोस्ट ऑफिसच्या ज्येष्ठ नागरिक बचत योजनेमध्ये आपल्याला 8.2% वार्षिक व्याज मिळते. ज्येष्ठ नागरिक बचत योजना अशा व्यक्तीसाठी आहे ज्या व्यक्तींचे वय 60 वर्षापेक्षा अधिक आहे. सध्या ज्येष्ठ नागरिक बचत योजनेअंतर्गत 8.2% व्याज मिळते. तुम्हाला जर एक रकमी या योजनेमध्ये पैसे गुंतवणूक करून व्याजाद्वारे दोन लाख रुपये मिळवण्याची एक संधी आहे.

Post Office Scheme SCSS: पोस्ट ऑफिस जेष्ठ नागरिक बचत योजना असा घ्या लाभ

 • योजनेमध्ये एकरकमी रक्कम पाच लाख रुपये जमा करा
 • ठेव 5 वर्ष कालावधी
 • व्याजदर 8.2%
 • मॅच्युरिटी रक्कम 7,05,000
 • मिळालेले व्याज रक्कम 2,05,000

ज्येष्ठ नागरिक बचत योजनेचे फायदे

 • ज्येष्ठ नागरिक बचत योजना ही केंद्र सरकार द्वारे समर्पित एक लहान बचत योजना आहे. ज्येष्ठ नागरिक बचत योजना ही एक सुरक्षित पर्यायांपैकी एक पोस्ट ऑफिस ची महत्त्वाची योजना मानली जाते.
 • इन्कम टॅक्सच्या 80 C अंतर्गत या योजनेमध्ये गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारास दरवर्षी दीड लाख रुपयांपर्यंतची करा मध्ये सूट मिळवता येईल.
 • आठ पॉईंट दोन टक्के व्याजदर दरवर्षी मिळेल. ही झोप कि इतर घटकांच्या दृष्टीने व गुंतवणुकीच्या पर्यायापेक्षा खूपच चांगली आहे.
 • ज्येष्ठ नागरिक बचत योजना ही देशांमधील कोणत्याही शाखेत हस्तांतरित केली जाऊ शकेल.
 • या योजनेअंतर्गत प्रत्येक तीन महिन्याला व्याज दिले जाते.
 • प्रत्येक महिन्याच्या एप्रिल जुलै ऑक्टोबर आणि जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुमच्या खात्यामध्ये या योजनेचे व्याज जमा केले जाते.

Bal Jeevan Bima Yojana: फक्त 6 रुपये गुंतवा आणि 1 लाख मिळवा, पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना

Post Office Scheme SCSS ज्येष्ठ नागरिक बचत योजनेचे खाते कसे उघडावे?

 • कोणत्याही पोस्ट ऑफिस किंवा सरकारी किंवा खाजगी बँकेत यासाठी एक फॉर्म भरून खाते उघडावे लागेल.
 • या फॉर्म सोबत 2 पासपोर्ट आकाराचे फोटो व आधार कार्ड ओळखीचा पुरावा आणि इतर केवायसी कागदपत्रासहित झेरॉक्स सादर करावे लागतील.
 • बँकेमध्ये खाते उघडण्याचा एक महत्त्वाचा फायदा असा आहे की, जमा केलेले व्याज थेट बँक शाखेमधील ठेवीदारांच्या बचत बँक खात्यामध्ये जमा केले जाते.

Leave a Comment