Punjab Dakh Havaman Andaj: या कारणामुळे पंजाब डख यांचा हवामान अंदाज चुकला, सोशल मीडियावर पंजाब डख यांची बदनामी सुरू

Punjab Dakh Havaman Andaj: पंजाबराव डख एक प्रसिद्ध हवामान अभ्यासक आहेत. त्यांचे नेहमीच हवामान अंदाज अचूक ठरत असतात परंतु गेल्या काही दिवसापासून त्यांच्या अंदाजाबद्दल उलट सुलट चर्चा सुरू झालेली आहे. मागील दिलेल्या पंजाबराव डख यांच्या हवामान अंदाज विषयी उलट सुलट चर्चा सुरू झालेले आहेत आणि त्यांच्यावर शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे आरोप देखील करण्यात आले आहे. punjab dakh havaman andaj live

मागील काही दिवसापूर्वी पंजाबराव यांनी 10 ते 15 जून दरम्यान वेगवेगळ्या भागात भाग बदलत पाऊस पडेल असा हवामान अंदाज दिला होता. पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज आल्यानंतर शेतकऱ्यांनी नेहमीसारखाच त्यांच्यावर विश्वास ठेवून खत बियाण्याची खरेदी खरेदी केली होती परंतु त्यांनी सांगितलेल्या अंदाजानुसार पाऊस पडलाच नाही. यामुळे शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाल्याची ओरड सध्या सुरू आहे. या कारणामुळे सोशल मीडियामध्ये सध्या पंजाबराव डख यांचे समर्थक आणि विरोधकांमध्ये चांगलीच भांडण सुरू आहे. Punjab Dakh Havaman Andaj

पंजाब डख यांनी या दिलेल्या चुकीच्या अंदाजामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून व्यापारी मात्र मलामाल झाले अशी शेतकऱ्यांमध्ये ओरड सुरू आहे. यासंबंधी पंजाबराव डख यांनी त्यांच्या फेसबुक पेजवरून यासंदर्भात एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये पंजाबराव डख यांनी अरबी समुद्रामध्ये बिपरजॉय नावाचे चक्रीवादळ तयार झाल्यामुळे बाष्प नाहीसे झालं आणि पाऊस लांबणीवर गेला असे स्पष्टीकरण व्हिडिओमध्ये दिले. परंतु पाऊस लावणी वर गेला असताना सोशल मीडियाच्या माध्यमातून मराठवाड्यामधील शेतकऱ्यांमध्ये समर्थक आणि विरोधक एकमेकांना भांडताना दिसत आहेत. punjab dakh havaman andaj today

काय म्हणाले पंजाबराव डख व्हिडिओमध्ये Punjab Dakh Havaman Andaj

पंजाब डख यांनी त्यांच्या फेसबुक पेज शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये असे म्हणाले की, 16 जुन रोजी चक्रीवादळ गुजरातच्या किनाऱ्यावर जाणार आहे. हे वादळ त्या ठिकाणी बाष्प ओढून घेऊन तयार झाल्यामुळे मान्सून कमी होणार आहे. अशीच परिस्थिती 2015 साली पहावयास मिळाली आणि या चक्रीवादळामुळे बाष्प वाहून गेले होते. हीच परिस्थिती 2019 आली देखील पाहायला मिळाली असे देखील डख म्हणाले.

जमिनीमध्ये ऑल कमीत कमी अर्धा फूट गेली तरच पेरणी करावी असे आव्हान देखील पंजाबराव डख यांनी केले. चक्रीवादळ जर मुंबईच्या किनाऱ्याला धडकले असते तर नक्कीच पाऊस झाला असता असा अंदाज देखील पंजाब डख यांनी व्यक्त केला जमिनीमध्ये चांगली ऑल आल्याशिवाय आपली पेरणी करू नये असे देखील त्यांनी सांगितले. शेवटी अंदाज आहे वारे बदलले की अंदाज बदलला जाईल. निसर्गामधील झालेले बदल आणि बदलत्या हवामानाचे परीक्षण करूनच पंजाबराव डख हे हवामान अंदाज व्यक्त करत असतात.

punjab dakh havaman andaj whatsapp group link

https://www.facebook.com/watch/?v=1395049401283967

Leave a Comment