Ration Card Update: अशी चूक करू नका ? नाहीतर राशन कार्ड होईल रद्द , पहा नवा नियम

Ration Card: आपल्याकडे राशन कार्ड (Ration Card) असेल तर हि बातमी तुमच्या करता आहे. सरकार वेळोवेळी राशन कार्ड मध्ये सुधारणा करत असते. राशन कार्ड मध्ये काही गडबड असेल तर राशन कार्ड पण बंद केले जाते. जर तुम्ही राशन कार्ड चा वापर धान्य घेण्यासाठी करत नसाल तर तुमचे राशन कार्ड रद्द केले जाऊ शकते. ( National Food Security Scheme)  अंतर्गत रेशन कार्ड धारकांना धान्य पुरवले जाते या मध्ये सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत ( Public Distribution System) कुटुंबाच्या सदस्य नुसार हे राशन अत्यंत स्वस्त दरात गरीब कुटुंबाना पुरवले जाते.  गरीब कुटुंबाना आर्थिक मदत हा सरकारचा उद्देश आहे.

का होऊ शकते राशन कार्ड (Ration Card) रद्द ?

आपल्या भारत देश मध्ये बोगस राशन कार्ड काढण्याच्या संख्येत  महारष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच कार्ड चा वापर न करण्यात पण महाराष्ट्राचे प्रमाण अधिक आहे. रेशन विभागात तुम्ही किती राशन घेता व केव्हा घेता तसेच तुमच्या कुटुंबात किती सदस्य आहेत याची माहिती राशन कार्ड वरती मिळते. PDS अर्थात ( Public Distribution System) च्या नियामानुसार तुम्हाला धान्य तेव्हाच मिळणार जेव्हा तुच्या कडे राशन कार्ड असेल.

परंतु अशी बरेच प्रकरण आहेत कि ज्यांनी अधिक काळा पासून रेशन कार्ड वरून धन्य घेतले नाही त्याची सर्व राशन कार्ड हे रद्द करण्यात आली आहेत. त्यानुळे आपण कधीही राशन घेण्यासाठी जाताल त्या वेळेस आपल्या बोटाचे ठसे घेण्यासाठी रेशन दुकानदाराला सांगावे आणि आपली धान्य किती घेतले याची पावती पण घ्यावी.

हे वाचा : तुमच्या हक्काचे रेशन किती मिळते ? माहित नसेल तर तुमच्या मोबाईल वर पाहू शकता.

नियमानुसार एखाद्या वेक्तीने मागील सहा महिने धान्य घेतले नसेल तर नियमानुसार त्याला स्वस्त धान्याची गरज नाही किंवा तो कार्ड (Ration Card) धारक स्वस्त दरातील राशन घेण्यास पात्र नाही असा त्याचा अर्थ होतो. गरीब कुटुंबाना दोन वेळेच्या अन्नाची सोय व्हावी या साठी स्वस्त धान्य दिले जाते परंतु प्रत्येक महिन्याला दिल्या जाणाऱ्या या सुविधाचा बरेच राशन कार्ड धारक याचा लाभ घेत नाही असे सरकारच्या लक्षात आले आहे. या कारणामुळे सहा महिन्या पेक्षा जास्त काळ राशन न घेतलेल्या वेक्तीचे राशन कार्ड रद्द केले जाणार आहे. हा नियम बिहार, झारखंड, दिल्ली तसेच महाराष्ट्रातील अहमदनगर या जिल्यात हा निर्णय घेतला आहे. 

वरील लेख आपल्या मित्रांना तसेच नातेवाईकांना पाठवण्यास विसरू नका. किंवा आपल्या काही प्रश्न असल्यास, कमेंट करून नक्की कळवा… धन्यवाद

अशाच पद्धतीच्या नवनवीन पोस्ट साठी खाली दिलेल्या आमच्या राज्यस्तरीय WhatsApp  तसेच Telegram ग्रुप ला जॉईन करा..🙏👇

👉 जॉईन WhatsApp group 
👉 जॉईन Telegram Group

1 thought on “Ration Card Update: अशी चूक करू नका ? नाहीतर राशन कार्ड होईल रद्द , पहा नवा नियम”

Leave a Comment