RTE Admission: RTE प्रवेशाची मुदत पुन्हा वाढवली ! परिपत्रक जाहीर

RTE Admission: मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षणाचा अधिकार अंतर्गत म्हणजेच आरटीओ अंतर्गत प्रवेश प्रक्रियेमध्ये शिक्षण विभाग अंतर्गत ऑनलाइन सोडते द्वारे निवड झालेल्या यादीतील बालकांना प्रवेशासाठी 8 मे ची मुदत दिली होती ती आता वाढवण्यात आली आहे. कागदपत्राची पडताळणी 15 मी पर्यंत करून प्रवेश निश्चित करण्याचे आवाहन शिक्षण विभागामार्फत केले आहे.

5 एप्रिल रोजी सोडत प्रक्रिया राबवण्यात आली होती. व 13 एप्रिल रोजी RTE Admission च्या पोर्टलवर निवड यादी प्रसिद्ध झाल्यानंतर पालकांना त्यांच्या मोबाईल वरती एसएमएस आले होते परंतु बऱ्याच पालकांना मेसेज आले नव्हते. पोर्टलच्या तांत्रिक अडचणीमुळे अलॉटमेंट लेटर आणि हमीपत्र डाऊनलोड करण्यासाठी बालकांना अडचणी येत होत्या काहींना मेसेज प्राप्त झाले नसल्याने पोर्टलवर खात्री करण्यासाठी तांत्रिक अडथळा निर्माण झाला.

24 एप्रिल रोजी शिक्षण विभागाने प्रवेशासाठी असलेले 8 मे पर्यंत मुदत वाढवली होती परंतु प्रवेशास अडचणी आल्यामुळे हे लक्षात घेऊन आता 15 मे 2023 पर्यंत पुन्हा एकदा मुदत वाढवण्यात आली आहे. ज्या पालकांच्या मुलांचा अजून देखील प्रवेश झाला नाही त्या पालकांनी प्रवेश बाबतच्या तक्रारी व अपील अर्जासोबत सुनावणी करून पालकांनी बालकांचा प्रवेश घ्यावे असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.

RTE Admission 2023-24: मुदतवाढ परिपत्रक डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment