RTE Admission 2023: आरटीई प्रवेश प्रक्रियेमध्ये भ्रष्टाचार, प्रवेश प्रक्रियेमध्ये श्रीमंतांचा डल्ला

RTE Admission: आरटीई म्हणजे शिक्षण हक्क कायद्यांतर्गत गरीब प्रवर्गातील दुर्बल व वंचित घटकांमधील विद्यार्थ्यांना चांगल्या इंग्लिश शाळेमध्ये शिक्षण घेता यावे यासाठी 25 टक्के आरक्षण दिले जाते. परंतु या सगळ्यामध्ये एक मोठा भ्रष्टाचार झाला आहे.

गरीब वंचित दुर्बल या घटकांमधील प्रत्येक मुलांना उच्च शिक्षण व दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी आरटीई RTE Admission म्हणजेच शिक्षण हक्क कायदा (Right To Education Act) तयार केला आहे. या कायद्याअंतर्गत चांगल्या शाळेमध्ये गरीब वंचित विद्यार्थ्यांना 25% आरक्षण जाते. यासाठी ऑनलाईन लॉटरी पद्धतीने विद्यार्थ्यांची निवड केली जाते. परंतु यावर्षी श्रीमंत व धन दांडग्यांनीच गरिबांच्या हक्कावर घाला घातलेला आहे.

वकील, बिल्डर, डॉक्टर, व्यावसायिक अशा वेगवेगळ्या क्षेत्रामधील पैसा वाल्या श्रीमंत व्यक्तींना आरटीई अंतर्गत आपल्या मुलाचा प्रवेश दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे. आरटीई अंतर्गत एका शाळेमध्ये प्रवेश घेतलेल्या बोगस विद्यार्थ्यांची यादीच zee 24 तास मीडियाने प्रसिद्ध केली आहे. यातील काही पालकांनी खोटे पत्ते तसेच बोगस इनकम सर्टिफिकेट काढून आपल्या पाल्याचा प्रवेश मिळवला आहे.

RTE Admission आरटीई अंतर्गत प्रवेश घेण्यासाठी महत्त्वाच्या अटी

  • आपण जर पाहिले तर आरटीई अंतर्गत आर्थिक दुर्बल घटकांमधील कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा कमी असणे गरजेचे आहे.
  • वंचित घटकांमधील मुलांना आर्थिक उत्पन्नाची अट नाही.
  • तुमच्या विद्यार्थ्यांना इंग्लिश शाळेमध्ये प्रवेश घ्यायचा आहे तो विद्यार्थी शाळेच्या जवळच राहणार असावा.

rte admission maharashtra ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर लॉटरी पद्धतीने निवड झाल्यानंतर प्रत्येक तालुक्यामध्ये असलेली कमिटी पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद मार्फत निवड यादी काढून ज्या विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे त्यांचे सर्व कागदपत्रे तपासले जातात. आणि त्यानंतर निवड यादी शाळेला पाठवली जाते. ऑनलाइन पद्धतीने फॉर्म भरले जात असले तरी पण ही प्रक्रिया लॉटरी पद्धतीने पूर्ण होते या सर्व अटी आणि शर्तींना मागे सरकून गरीब ऐवजी श्रीमंतांच्या व्यक्तींच्या मुलांनीच आरटीई अंतर्गत प्रवेश घेतल्याच्या चर्चा सध्या समोर आली आहे.

RTE Admission कसा झाला भ्रष्टाचार

श्रीमंत व्यक्ती एक लाखापेक्षा कमी उत्पन्नाचे खोटे दाखले काढून घेतात त्यानंतर बनावट रेंट एग्रीमेंट करून खोटे रहिवासी दाखले मिळून घेतात. या कागदपत्राच्या आधारावर विद्यार्थ्याला प्रवेश मिळून देण्यात येतो. खोटी माहिती देऊन आणि शासकीय अधिकाऱ्यांना हाताशी घेऊन श्रीमंत लोक गरिबांचे मुलांचे शिक्षण हिरावून घेत असल्याचे यामध्ये स्पष्ट झाले आहे.

RTE Lottery: आरटीई लॉटरी प्रवेश पत्र असे करा डाउनलोड | Rte Admit Card Download

या भ्रष्टाचाराच्या रॉकेटमध्ये फक्त श्रीमंत व्यक्तीस नाही तर अधिकारी आणि शिक्षण सम्राटही सहभागी असल्याचे दिसून येत आहे. गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवणाऱ्या अशा या माफियांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावी. तरच खऱ्या अर्थाने गरीब व गरजू दुर्बल घटकांमधील मुलांना शिक्षणाचा अधिकार मिळेल.

1 thought on “RTE Admission 2023: आरटीई प्रवेश प्रक्रियेमध्ये भ्रष्टाचार, प्रवेश प्रक्रियेमध्ये श्रीमंतांचा डल्ला”

Leave a Comment