RTE Lottery 2023: आरटीई ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचा निकाल जाहीर, पुढे काय? असा पहा निकाल

RTE Lottery: rte नुसार दुर्बल वंचित घटकांमधील मुलांना संबंधित निकषानुसार विविध इंग्रजी शाळेमध्ये 25 टक्के प्रवेश देण्यात येतो. शैक्षणिक वर्षे 2023-24 साठी ची आरटीई प्रवेश प्रक्रियेची ऑनलाइन निकाल (RTE Lottery) बुधवारी दिनांक 5 एप्रिल 2023 रोजी पुणे मधील महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद येथे जाहीर करण्यात आला.

सोडतीमध्ये तयार करण्यात आली आलेली निकालाची यादी व प्रतीक्षा यादी RTE Lottery List ही https://rte25admission.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rteindex या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच निवड झालेल्या विद्यार्थ्यांना व प्रतीक्षा यादी मधील बालकांच्या पाल्यांना एसेमेसद्वारे देखील कळविण्यात येणार आहे. (RTE Lottery LIST 2023) पहिल्या फेरीचे प्रवेश हे 13 ते 25 एप्रिल निश्चित केले जाणार आहेत. तरी पालकांनी आपल्या पाल्यांच्या प्रवेशासाठी पडताळणी समिती व शाळेशी संपर्क साधून आपल्या मुलाचा शाळेचा प्रवेश निश्चित करावा असे आवाहन शिक्षण खात्यामार्फत केले आहे.

ऑनलाइन सोडती मध्ये निवड झालेल्या मुलांच्या वडिलांनी आर टी ई संकेतस्थळावरून प्रवेश पत्राची प्रिंट काढावी. त्यानंतर कागदपत्राच्या मूळ आणि झेरॉक्स प्रति घेऊन पडताळणी व प्रवेश केंद्रावर जावे कागदपत्राची पडताळणी झाल्यानंतर विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित केले जाणार आहेत. प्रवेश पत्र आणि पडताळणी केलेले कागदपत्र घेऊन पालकांनी निवडलेल्या शाळेमध्ये जावे. निवड झालेल्या शाळेमध्ये या व्यतिरिक्त कोणतेही अतिरिक्त कागदपत्र शाळा आपल्याला मागणार नाहीत असे स्पष्ट करण्यात आलेले आहे. तरी सर्व पालकांनी याची नोंद घेऊन आवश्यक ती कारवाही वेळेत पूर्ण करावी असे आवाहन शिक्षण खात्यामार्फत करण्यात आले आहे.


13 एप्रिल 2023 पासून कागदपत्राची पडताळणी केल्यानंतर शाळेत प्रवेश निश्चित केला जाणार आहे. पालकांनी ऑनलाईन अर्ज करतेवेळी जो मोबाईल क्रमांक दिला होता त्या मोबाईल क्रमांकावर 12 एप्रिल पासून प्रवेशाचे मेसेज पाठवण्यात येणार आहेत.

यावर्षी आरटीई अंतर्गत राज्यांमधील 8828 शाळा ंमध्ये 1 लाख 1969 जागेसाठी 3 लाख 64 हजार विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरले होते.

जिल्हा निहाय RTE Lottery निवड झालेल्या अर्जाची संख्या खालील प्रमाणे

 • अहमदनगर 364 शाळेसाठी 2825 विद्यार्थ्यांची निवड
 • अकोला 190 शाळेसाठी 1946 विद्यार्थ्यांची निवड
 • अमरावती 236 शाळेसाठी 23 05 विद्यार्थ्यांची निवड
 • छत्रपती संभाजीनगर 537 शाळेसाठी 4 हजार 73 विद्यार्थ्यांची निवड
 • भंडारा 89 शाळेसाठी 763 विद्यार्थ्यांची निवड
 • बीड 225 शाळेसाठी 827 विद्यार्थ्यांची निवड
 • बुलढाणा 227 शाळेंसाठी 2246 विद्यार्थ्यांची निवड
 • चंद्रपूर 186 शाळेसाठी 1503 विद्यार्थ्यांची निवड

RTE Lottery List

 • धुळे 93 शाळेसाठी 1006 विद्यार्थ्यांची निवड
 • गडचिरोली 66 शाळेसाठी 462 विद्यार्थ्यांची निवड
 • गोंदिया 131 शाळेसाठी 864 विद्यार्थ्यांची निवड
 • हिंगोली 75 शाळेसाठी 539 विद्यार्थ्यांची निवड
 • जळगाव 282 शाळेसाठी 3122 विद्यार्थ्यांची निवड
 • जालना 284 शाळेसाठी 2273 विद्यार्थ्यांची निवड
 • कोल्हापूर 325 शाळेसाठी 3270 विद्यार्थ्यांची निवड
 • लातूर 240 साठी 1669 विद्यार्थ्यांची निवड
 • मुंबई 272 शाळेसाठी 5202 विद्यार्थ्यांची निवड
 • मुंबई 65 शाळांसाठी 1367 विद्यार्थ्यांची निवड
 • नागपूर 653 शाळेसाठी 6577 विद्यार्थ्यांची निवड
 • नांदेड 232 शाळेसाठी 2251 विद्यार्थ्यांची निवड
 • नंदुरबार 45 शाळेसाठी 340 विद्यार्थ्यांची निवड

RTE Maharashtra Lottery Result 2023-24

 • नाशिक 401 शाळेसाठी 4854 विद्यार्थ्यांची निवड
 • उस्मानाबाद 107 शाळेसाठी 877 विद्यार्थ्यांची निवड
 • पालघर 266 शाळेसाठी 5483 विद्यार्थ्यांची निवड
 • परभणी 155 शाळेसाठी 1056 विद्यार्थ्यांची निवड
 • पुणे 936 शाळेसाठी 15655 विद्यार्थ्यांची निवड
 • रायगड 264 शाळेसाठी 4256 विद्यार्थ्यांची निवड
 • रत्नागिरी 92 शाळेसाठी 929 विद्यार्थ्यांची निवड
 • सांगली 226 शाळेसाठी 1886 विद्यार्थ्यांची निवड
 • सातारा 217 शाळेसाठी 821 विद्यार्थ्यांची निवड
 • सिंधुदुर्ग 49 शाळेसाठी 287 विद्यार्थ्यांची निवड
 • सोलापूर 295 शाळेसाठी 2320 विद्यार्थ्यांची निवड
 • वर्धा 111 शाळेसाठी 1111 विद्यार्थ्यांची निवड
 • वाशिम 99 शाळेसाठी 786 विद्यार्थ्यांची निवड
 • यवतमाळ 194 शाळेसाठी 1940 विद्यार्थ्यांची निवड

एकूण शाळा – 8828
एकूण विद्यार्थ्यांची निवड – 101969

एकूण ऑनलाईन भरलेले अर्ज – 364390
शाळा – 8828
प्रवेश क्षमता – 101969

RTE Maharashtra Lottery Result 2023 Link – येथे क्लिक करा

अशी पहा RTE Lottery 2023 List

 • प्रथम आपल्याला https://rte25admission.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rteindex या वेबसाईटवर जावे लागेल.
 • वेबसाईट ओपन झाल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला मूळ निवड यादी या पर्यायावर ती करावे लागेल.
 • त्यानंतर शैक्षणिक वर्ष 2023-24 व जिल्हा निवडावा लागेल.
 • त्यानंतर गो (GO) बटन दिसेल त्या बटन वर क्लिक करावे लागेल.
 • थोडा वेळ थांबल्यानंतर आपल्यासमोर आपल्या जिल्ह्याची पीडीएफ लिस्ट (Rte Lottery Pdf List) दाखवली जाईल.
 • त्या लिस्टमध्ये आपल्या विद्यार्थ्यांचा रजिस्ट्रेशन नंबर आणि नाव आपल्याला दिसेल.

Leave a Comment