Shettale Anudan: शेततळे योजनेसाठी राज्य सरकारकडून अनुदान निधी मध्ये कपात.

Shettale Anudan राज्यात सिंचनांचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकारने जलयुक्त शिवार योजना राबवली. जालयुक्त शिवारात अब्जावधी रुपयांचा खर्च करण्याची तयारी दाखवणाऱ्या राज्य शासनाने कोरडवाहू भागातील शेतकऱ्यांना वरदान ठरणाऱ्या शेततळे योजनेला Shettale Anudan निधी देण्यास आखडता हात घेतलाय. यंदा योजनेवर 100 कोटी रुपये खर्च अपेक्षित असताना केवळ सहा कोटी रुपये आत्तापर्यंत देण्यात आले आहेत. त्यामुळे हे शेतकरी नाराज आहे.

Shettale Anudan: तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारामुळे फेब्रुवारी 2017 मध्ये मागेल त्याला शेततळे ही योजना Shettale Anudan राज्यभर लागू केली गेली. मात्र तळ बांधण्यासाठी शेतकऱ्यांना केवळ पन्नास हजार रुपये अनुदान घोषित झालं ते तोकडे होतं. मात्र योजना उपयुक्त असल्याने शेतकऱ्यांनी एक लाख 49 हजार 599 तळी उभारली त्यासाठी शासनानं 700 कोटी रुपयांच्या आसपास अनुदान दिलं. शेतकऱ्यांनी मागेल त्याला शेततळे योजनेत 15x15x3 मीटर आकाराच्या छोट्या तळ्यापासून 30x30x3 मीटर आकाराची मोठी शेततळी देखील बांधली. जून 2022 मध्ये शासनाने योजनेत चांगला बदल करत अनुदानाची रक्कम 75 हजार रुपयांपर्यंत नेली. या योजनेचा समावेश आता मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेत केला गेलाय. Shettale Anudan

त्यातून सोळा प्रकारच्या तळ्यांना अनुदान देण्यास मुभा देण्यात आली आहे यामुळे शेतकऱ्यांना कमाल 34x34x3 मीटर आकारापर्यंत तळी बांधता येऊ शकतात. योजनेत Shettale Anudan बदल करताना शासनाने निधी देताना मात्र हात आखडता घेतला. 2022-23 या वर्षात या योजनेसाठी 100 कोटी रुपयांची तरतूद केली होती. प्रत्यक्षात ही रक्कम शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली नाहीये. शासनाने केवळ सहा कोटी रुपये दिलेत आम्ही 94 कोटी रुपयांची मागणी केली आहे. आणि ती लवकर मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे काही शेतकऱ्यांना अनुदान देणं शक्य होईल, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली आहे. Shettale Anudan

Shettale Anudan

शेततळे साठी कृषी खात्याकडे ऑनलाईन अर्ज केल्यानंतर पूर्वसंमती दिली जाते. त्यानंतर तीन महिन्यात खुदाई पूर्ण करावी लागते मुदतीत खुदही न केल्यास शेतकऱ्यांचा अर्ज आपोआप रद्द होतो. अर्ज रद्द झाल्यास 75 हजार रुपयांचा अनुदान मिळण्यात अडचणी येतात. त्यामुळे अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांनी आधीच पुरेशी तयारी करावी असं काही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. Shettale Anudan

तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा ताजा अपडेटसाठी आमचा व्हॉट्सॲप ग्रुप ला देखील जॉईन करायला विसरू नका.

Leave a Comment