Shettale Yojana 2023 : शेततळे अनुदान योजना सर्व माहिती, अनुदान, कागदपत्र, ऑनलाईन अर्ज पहा सर्व माहिती.

Shettale Yojana मित्रांनो शेततळे हे शेतकऱ्यांसाठी बारा महिने जलसिंचनाचे साधन म्हणून एक स्रोत तयार झालेले आहे. शेततळ्याच्या साह्याने शेतकरी शेती सोबतच मत्स्यपालन शेळीपालन हे असे जोडधंदे करत आहेत. हे शेततळ्याचे शेतकऱ्यांना खूप मोठ्यांमध्ये मदत होत आहे. तर मित्रांनो शेततळ्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा, कागदपत्र काय लागतात, अनुदान किती दिले जाते या सर्वां विषयी माहिती घेण्याचा प्रयत्न आज आपण या टॉपिक मध्ये करणार आहोत.

Shettale Yojana मागेल त्याला शेततळे यापूर्वी ही योजना राबवली जात होती. यामागील त्याला शेततळे योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 50 हजार रुपये पर्यंत अनुदान दिले जात होते. राष्ट्रीय कृषी विकास योजना या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ही मागील त्याला शेततळे योजना दिली जात होती. त्यानंतर एकात्मिक फलोत्पादन विकास योजना या अंतर्गत या शेततळ्यांचा समावेश करण्यात आला होता. त्यानंतर मित्रांनो मुख्यमंत्री कृषी शाश्वत योजना अंतर्गत या शेततळे योजनेचा समावेश करून शेततळ्यासाठी जास्तीत जास्त 75 हजार रुपयापर्यंत अनुदान देण्यासाठी सुरुवात केली आहे. आणि याच योजनेअंतर्गत शेततळ्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करावा असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे.

27 जानेवारी 2023 रोजी या योजनेची लॉटरी लागली. योजने मधून 15X15X3 पासून जास्तीत जास्त 34X34X3 पर्यंत साईज मध्ये शेतकरी ऑनलाईन अर्ज करू शकतात. साधारणपणे शेतकऱ्यांकडून दहा गुंठ्यासाठी 30X30 किंवा 25X25 एवढी साईज घेतली जाते. या सत्र योजनेसाठी जास्तीत जास्त अनुदान हे 75 हजार रुपये दिले जाते. Shettale Yojana

जसे शेतकरी या योजनेसाठी साईज कमी घेतील तशी त्या योजनेची अनुदानाची रक्कम कमी होत जाते. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कमीत कमी 25 हजार रुपयांपासून ते जास्तीत जास्त 75 हजार रुपये पर्यंत अनुदान दिले जाते. Shettale Yojana

Shettale Yojana: शेततळे योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

Shettale Yojana: आवश्यक कागदपत्र

  1. तलाठी सही किंवा डिजिटल स्वाक्षरी असलेला अद्यावत सातबारा.
  2. तलाठी सही किंवा डिजिटल स्वाक्षरी असलेला अद्यावत आठवतारा.
  3. स्थळदर्शक नकाशा.
  4. चतुर सीमा.
  5. वैद्य जात प्रमाणपत्र (अनुसूचित जाती अनुसूचित जमाती शेतकऱ्यांसाठी).
  6. शेतकऱ्यांकडे त्यांच्या नावावर किमान 0.60 हेक्टर जमीन असणे आवश्यक आहे.

तर मित्रांनो अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारानुसार वेगवेगळ्या पद्धतीने या क्षेत्रासाठी अनुदान दिले जाते. आणि या शेततळे योजनेसाठी मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी अर्ज करावेत याच्यासाठी लक्षण खूप मोठा आहे असे कृषी विभागाचे म्हणणे आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी योजनेसाठी अर्ज करावा.

Shettale Yojana
Shettale Yojana

Shettale Yojana: शेततळे योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

2 thoughts on “Shettale Yojana 2023 : शेततळे अनुदान योजना सर्व माहिती, अनुदान, कागदपत्र, ऑनलाईन अर्ज पहा सर्व माहिती.”

Leave a Comment