Shikshak Bharti 2023 : खुशखबर राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती होणार

Shikshak Bharti शिक्षक भरतीच्या प्रतीक्षा मध्ये असणाऱ्या उमेदवारांसाठी खुशखबर आहे. राज्यामध्ये पुढील दोन महिन्यांमध्ये तीस हजार शिक्षकांची भरती ( 30000 Shikshak Bharti )होणार आहे. याबाबत राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी याबाबतची माहिती आज सभागृहात दिली.

त्या शिक्षक भरती Shikshak Bharti बाबत तयारी सुरू असून लवकरच सविस्तर माहिती दिली जाणार असल्याची माहिती ही गिरीश महाजन यांनी दिली आहे. राज्यामधील मराठी शाळांची खूप बिकट परिस्थिती आहे पटसंख्या कमी असल्याकारणाने ठिकठिकाणी शाळा बंद होत आहेत. डीएड पात्रता धारक शिक्षक उपलब्ध असूनही गेल्या बऱ्याच वर्षापासून शिक्षक भरती होत नव्हती. या कारणामुळे आता लवकरच राज्यामध्ये तीस हजार शिक्षकांची मेगा भरती होणार आहे. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी काल दिनांक 2 फेब्रुवारी विधानसभेत एका प्रश्नाचे उत्तर देताना याबाबत सविस्तर अशी माहिती दिली. त्यानंतर आज दिनांक 3 फेब्रुवारी रोजी मंत्री गिरीश महाजन यांनी सहभागृहात याबाबत माहिती दिली.

आमदार राजेश इकडे आणि इतरांनी विधानसभेमध्ये कालच्या दिवशी या शिक्षक भरती Teacher Recruitment संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. झिरो 23 संख्या असणाऱ्या शाळा बंद होत असलेला विरोध तसेच शिक्षक उपलब्ध असतानाही भरती न झाल्यामुळे डीएड आणि डीएडच्या विद्यार्थी बेरोजगार तरुणांना भटकंती करावी लागत आहे. सेवा कालावधी संपलेले शिक्षक नेमणूक झाल्यामुळे बेरोजगार तरुणांमध्ये खूप मोठा आक्रोश निर्माण झाला आहे असे प्रश्न चार अंकी प्रश्नाच्या निमित्ताने उपस्थित करण्यात आले होते याच प्रश्नांना लेखी प्रतिउत्तर देताना शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी राज्यांमध्ये लवकरच तीस हजार शिक्षकांची पदे भरली जातील अशी यावेळेस सभागृहामध्ये माहिती दिली.

सभागृहामध्ये मंत्री दीपक केसरकर यांनी गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यामध्ये देखील याबाबत विधानसभेमध्ये माहिती दिली होती. त्यामुळे येत्या नववर्षात राज्यात तीस हजार शिक्षक

आणि शिक्षक तर कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येईल. अर्थ खात्याने शिक्षकांच्या असण्याची टक्के भरतीला मंजुरी दिली असून त्यापैकी 50 टक्के पद तातडीने भरण्यात येणार असल्याची घोषणा सभागृहामध्ये त्यावेळी मंत्री दीपक केसरकर यांनी केली. शिक्षक भरती Shikshak Bharti नंतर महाराष्ट्रातील कोणती शाळा बंद करणार नसून 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद होणार असल्याचा निव्वळ अफवा आहेत असाही खुलासा मंत्री दीपक केसरकर यांनी यावेळी सभागृहामध्ये केला.

Talathi Bharti तलाठी भरती मध्ये झाले हे मोठे बदल; पहा कोणते बदल झाले?

Shikshak Bharti एकही शाळा बंद होणार नाही

20 पेक्षा कमी संख्या असलेल्या शाळां बंद करता येणार नाही. तसा शासनाचा विचार नसल्याचेही दीपक केसरकर यांनी सांगितले हीच पेक्षा कमी विद्यार्थी असलेल्या शाळांचे सर्वेक्षण करण्यात येणार असून यामुळे सरकारी शाळा बंद करणारा असा अनेकांचा समज झाला होता मात्र ज्या शाळेत एक विद्यार्थी असेल अशा शाळेत देखील त्या ठिकाणी योग्य शैक्षणिक वातावरण मिळू शकेल हा मुद्दा आहे त्यामुळे मुलांचा हिताचा विचार करावा लागणार आहे तसेच त्यांना दर्जेदार शिक्षण देणे ही सरकारची प्राथमिकता असल्याचे यावेळी दीपक केसरकर म्हणाले. Shikshak Bharti

या अगोदरच अंगणवाडी मदतनीस अंगणवाडी सेविकांच्या वीस हजार पदाची देखील घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती त्याच्या पाठोपाठच आता लवकरच तीस हजार शिक्षकांची भरती देखील होणार आहे त्यामुळे शिक्षक भरतीची प्रतीक्षा असणाऱ्या तरुणांना आनंदाची बातमी आहे.

Leave a Comment