Solar-MSKVY: मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना, जलयुक्त शिवार व घरकुल योजना ‘मिशन मोड’ वर राबविल्या जाणार, देवेंद्र फडणवीस

Solar-MSKVY नवीन तंत्रज्ञानाच्या वापरातून महसुली कामकाज जलद व पारदर्शी करावे. जलयुक्त शिवार,घरकुल व मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी (Saur Krushi Vahini Yojana(SKVY) योजनांच्या अंमलबजावणीला प्राधान्य देऊन त्या युद्ध पातळीवर राबवा, अशा सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी लोणी येथील राज्यस्तरीय महसूल परिषदेच्या समारोपात दिल्या.

Solar-MSKVY ( Mukhyamantri Saur Krushi Vahini Yojana)

Solar-MSKVY शेतकऱ्यांना दिवसा विजयी उपलब्ध व्हावी यासाठी राज्यामध्ये मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना राबवली जाते. याच योजनेला अंमलबजावणीसाठी प्राधान्य देत मिशन मोडवर राबवण्यासाठी सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांनी महसूल प्रशासनाला दिल्या आहेत.

राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाच्या माध्यमातून लोणी या ठिकाणी दोन दिवसीय राज्यस्तरीय महसूल प्रदर्शन चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून महसूल विभागाला या सूचना देण्यात आले आहेत.

राज्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी 75 हजार रुपये प्रति हेक्टर भाड्याने देण्यासाठी व या जमिनीवर सोलार चे प्रोजेक्ट उभारण्याकरता मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना Solar-MSKVY ही राबवली जाते. या योजनेची अंमलबजावणी होत असताना शेतकऱ्यांच्या जमिनी विकासाला भाड्याने देत असताना महसूल विभागाचा खूप मोठा वाटा आहे. यासाठी या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेला प्राधान्य देत ही योजना मिशन मोडवर राबवावी असे प्रकारच्या सूचना महसूल विभागाला देण्यात आलेले आहेत.

याचबरोबर जलयुक्त शिवार घरकुलाची कामे या योजना सुद्धा प्राधान्य द्यावे अशा प्रकारच्या सूचना देखील उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत. राज्यामध्ये शेती करण्यासाठी सध्या आठ हजार मेघा वाईट वीज पुरवठा लागतो. त्यापैकी चार हजार मेघा बाईट वीज ही मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी Solar-MSKVY योजनेच्या माध्यमातून दिली जाऊ शकते. या धोरणामुळे शेतकऱ्यांसाठी जो दिवसा सिंचनाचा प्रश्न आहे यामुळे शेतकऱ्यांचा हा प्रश्न सुटू शकतो. त्यामुळे या योजनेला प्राधान्य द्यावे त्यासाठी अशा प्रकारच्या सूचना या कार्यक्रमांमध्ये देण्यात आले आहेत.

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना काय आहे हे पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

5 thoughts on “Solar-MSKVY: मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना, जलयुक्त शिवार व घरकुल योजना ‘मिशन मोड’ वर राबविल्या जाणार, देवेंद्र फडणवीस”

Leave a Comment