Soybean Rate: सोयाबीन कधी विकायचं ते कसं ठरवाल?

 

Soyabean Rate


     यंदा देशातील सोयाबीनचा पेरा काहीसा कमी होऊन सुद्धा दर (Soybean Rate) मात्र नरमलेत. मागील दोन महिन्यात सोयाबीन जवळपास 30 टक्क्यांनी घसरले. त्याला काही घटक कारणीभूत आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यकीय दरातील तेजी जवळपास विरली आहे. पामतेल्याचे दर एप्रिल महिन्यात 7800 हजार रुपये प्रति टन होते ते आता 3400 रुपयांपर्यंत घसरलेत. सोयाबीन तेलाचे ही दर कमी झालेत निर्यात पडताळ नसल्याने सोयाबीन निर्यातही कमी राहिली. त्यामुळे सोयाबीनचा साठा वाढत जाऊन गेले. खाद्य तेलाचे दर तेजीत होते त्यामुळे सोयाबीनचे गाळप झालं मात्र सोयाबीन निर्यात कमी झाल्याने मिल्स कडे साठा आहे. 

      दर वाढण्याच्या अपेक्षेने काही शेतकऱ्यांनी सोयाबीन साठवून (storing soybeans) ठेवले. तसंच खाद्यतेलाचे दर कमी झाल्यानंतरच्या टप्प्यात गाळपही मंदावल. गाळप कमी झाल्याने देशात 20 लाख टनांच्या दरम्यान शिल्लक सोयाबीन असल्याचा अंदाज उद्योगातून व्यक्त होतोय. मात्र हा आकडा अवास्तव असून 10 टक्क्यांच्या दरम्यान म्हणजेच 10 ते 12 लाख टन सोयाबीनचा साठा असू शकतो असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे केंद्र सरकारने यंदा 20 लाख टन पाम तेलाच्या शुल्कमुक्त आयातिला परवानगी दिली. या सवलती अंतर्गत सोयातेल आयात सुरू आहे. त्याचा दबाव सोयाबीन दारावर आलाय आता काही ठिकाणी नव सोयाबीन बाजारात येतेय. सध्या सोयाबीन पिकाची स्थिती चांगली असून उत्पादकताही जास्त राहील असा अंदाज सोयाबीन प्रक्रिया उद्योजकानी ( Soybean processing entrepreneurs)व्यक्त केला. सोयाबीन उत्पादनाबाबत ठोसपणे ऑक्टोबर महिन्यात सांगता येईल. 


     त्यामुळे देशात यंदा हंगामात सोयाबीनच्या पुरवठ्याची स्थिती काय राहील याचे चित्र ऑक्टोबर मध्ये स्पष्ट होईल असं शेतीमाल बाजार अभ्यास राजेंद्र जाधव यांनी सांगितलं. 


राजेंद्र जाधव नेमकं काय म्हणतात ते पाहूया..


      खाद्य तेलाचे कमी झालेले दर सोयाबीन निर्यातीत घट सोया तेल आयातीत वाढ या घटकांचा बाजारावर सध्या दबाव आहे. असं असलं तरी मागणी पुरवठ्याचं गणित बघता सुरुवातीच्या टप्प्यात सोयाबीनला प्रति क्विंटल किमान 5 हजार रुपये (Soybean Price)दर मिळू शकतो. मात्र जास्तीत जास्त दर किती राहू शकतो हे ऑक्टोबर मध्ये उत्पादनांचा चित्र स्पष्ट झाल्यानंतर सांगता येईल.


हे पण वाचा – पीक पाहणी व्हर्जन २ ॲप मधील नवीन सुधारणा.

 

     सध्या काही बाजारांमध्ये नव्या सोयाबीनचे आवक होत आहे  मात्र या मलाच ओलावा अधिक आहे. तर बाजारावर काही घटकांचा दबाव आणि उद्योगाकडून शिल्लक साठा आणि उत्पादनाबाबतच्या केल्या जाणाऱ्या बातम्या त्यामुळे सोयाबीनला सध्या सरासरी 5 हजार रुपये प्रतिक्विंटल चा दर मिळतोय. सुरुवातीच्या टप्प्यात शेतकऱ्यांनी हा किमान दर लक्षात घेऊन विक्रीचे नियोजन करावे, तर ऑक्टोबर मध्ये उत्पादना विषयाचे आकडे स्पष्ट झाल्यानंतर जाणकारांचा अंदाज लक्षात घेऊन विक्री करावी. सध्या बाजारात सोयाबीन पीक आणि उत्पादनाचे विविध तर्क लावले जात आहेत तसंच काही अफवा ही आहेत. याला शेतकऱ्यांनी बळी न पडता बाजारातील किंमत पातळीवर नजर ठेवूनच विक्रीचा निर्णय घ्यावा असं आवाहन जाणकारांनी केले. सोयाबीनच्या दरातील चढउताराबद्दल प्रचंड घडामोडी घडत आहेत आणि आम्ही त्या तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत त्यांनीच समजून घ्या. जाणकार काय सांगताय ते नीट लक्षात घ्या आणि मगच सोयाबीन कधी आणि कोणत्या किमतीला विकायचं याचा निर्णय घ्या.


Leave a Comment