Soybean Rate: सोयाबीन व कापसाला सध्या काय दर मिळतोय?

देशात सध्या कापूस बाजारात चढउतार सुरू आहे. त्यामुळे उद्योगाकडून अजून मोठी खरेदी सुरू झालेली नाही.

उद्योग कापूस खरेदीसाठी दर स्थिर होण्याची वाट बघतोय. कापसाचे दर फिरवल्यानंतर मोठे उद्योग कापूस खरेदीत उतरतील.कापसाला प्रतिक्विंटल किमान 7500 ते 10000 रुपये दर मिळतोय. उद्योगांकडून कापूस खरेदी वाढल्यानंतर कापसाला सरासरी 9 हजार रुपयांचा दर मिळू शकतो त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊन कापसाची विक्री करावी असं आवाहन जानकरांनी केलंय.
  • सोयाबीन बाजार स्थिती 

राज्यात आणि देशातील अनेक भागांमध्ये सध्या सोयाबीन पीक काढणीला आले आहे. पावसामुळे काढणीच्या कामाचा हेळंबा होतोय. पावसामुळे शेतात हार्वेस्टर घालण्यास शेतकरी इच्छुक दिसत नाहीत. सध्या पावसाचा जोर कमी असला तरी, लगेच काढणी केल्यास पिकाचं नुकसान होऊ शकते, त्यामुळे शेतकरी कोरड्या वातावरणात काढण्याचे काम करत आहेत. 

सोयाबीन अवस्थेचा हंगाम सुरू होण्यापूर्वी सोयाबीनचे दर सुधारलेले असतात. खाद्यतेल बाजारातील परिस्थितीनुसार सोयाबीनचाही बाजार बदलत गेला. यंदा हंगामाच्या आधी सोयाबीन नरमल. मागील हंगामात सोयाबीनला सरासरी 7 हजार रुपये दर मिळाला मात्र शेवटच्या तीन महिन्यांमध्ये दाराने 5000 रुपयांची दर पातळी गाठली. त्यामुळे बाजारात सोयाबीन आवक वाढल्यानंतर दरात आणखी घसरण होऊ शकते असा अंदाज काही जाणकारांकडून वर्तवला जात आहे.

जाणकारांच्या मते सोयाबीनला सरासरी 5 हजार रुपये दर मिळू शकतो. सध्या बाजारात सोयाबीनची प्रत आणि ओलावा यानुसार 4600 ते 5100 रुपये दर मिळतोय यंदा बाजारात आवक वाढली तरी दर यापेक्षा जास्त कमी होणार नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊन टप्प्याटप्प्याने सोयाबीनची विक्री केल्यास फायदेशीर ठरेल असं हे जाणकारांनी सांगितले.

  • टोमॅटो बाजारभाव 

बाजारात टोमॅटो दरातील तेजी कायम आहे. पाऊस आणि बदलत्या वातावरणामुळे टोमॅटो पिकाच मोठं नुकसान झालंय त्यामुळे बाजारातील आवश्यकता कमी आहे. राज्यातील पुणे, मुंबई आणि नागपूर या बाजार समितीमधील आवक ही सरासरी 1000 क्विंटल पेक्षा अधिक आहे. मात्र इतर बाजारांमधील आवक हे 50 क्विंटल पेक्षाही कमी होते सध्या टोमॅटोला प्रतिक्विंटल 2 हजार ते 3 हजार पाचशे रुपये दर मिळतोय टोमॅटोचे दर पुढील काही दिवस टिकून राहतील असं भाजीपाला व्यापाऱ्यांनी सांगितलं.

Leave a Comment