एकूण गटाचे किंमतीनुसार शासकीय अनुदान व स्वहिस्सा मर्यादा खालीलप्रमाणे राहील .
अ.क्र. | प्रवर्ग | २ जनावरांचा गट (रक्कम रुपयात) |
1 | शासकीय अनुदान अनुसूचीत जाती ७५ टक्के | ६३,७९६ |
1 | स्वहिस्सा अनुसूचीत जाती २५ टक्के | २१२६५. ३३ |
2 | शासकीय अनुदान सर्वसाधारण ५० टक्के | ४२,५३१ |
2 | स्वहिस्सा सर्वसाधारण ५० टक्के | ४२,५३१ |
अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे –
- * फोटो ओळखपत्राची सत्यप्रत (अनिवार्य)
- * सातबारा (अनिवार्य)
- * ८ अ उतारा (अनिवार्य)
- * अपत्य दाखला (अनिवार्य) / स्वघोषणा पत्र
- * आधारकार्ड (अनिवार्य )
- * ७-१२ मध्ये लाभार्थी चे नाव नसल्यास कुटुंबाचे संमती पत्र, अथवा दुसऱ्यांची जमीन भाडे तत्वावर करारनामा (असल्यास अनिवार्य)
- * अनुसूचीत जाती/जमाती असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत (असल्यास अनिवार्य)
- रहिवासी प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य )
- दारिद्र्य रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य)
- बँक खाते पासबुक सत्यपत्र (असल्यास अनिवार्य)
- रेशनकार्ड / कुटुंब प्रमाणपत्र (एकाच कुटूंबातील एकच व्यक्तीला लाभ घेता येईल.) (असल्यास अनिवार्य)
- दिव्यांग असल्यास दाखला (असल्यास अनिवार्य )
- बचत गट सदस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र किंवा बचत गटाच्या बँक खात्याच्या पासबुकाची पहिल्या पानाची साक्षांकित प्रत
- वय – जन्मतारखेचा पुरावा सत्यप्रत
- शैक्षणिक पात्रतेचा दाखला.
- रोजगार ,स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव नोंदणीकार्डची सत्यप्रत
- प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित प्रत